Skip to main content

वरील पैकी कोणीही नाही

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 14/04/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1651
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

असावे ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

पन ईकडे खासदार / आमदार यांना सुध्दा परत बोलाविण्याचा अधीकार असावा म्हनजे काय होइल कि हे लोकप्रतीनिधी व्यवस्तीत काम करतील ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

नसावे ला मत दिले आहे. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

का नसावे?

In reply to by महेश हतोळकर

या पर्यायाचा उपयोग आहे की नाही हे माहीत नाही पण त्या पर्यायाला फार काही अर्थ आहे असे वाटत नाही. मी जेव्हापासून पहात आहे तेव्हापासून (सुमारे ३० वर्षांपासून) आमच्या मतदारसंघात किमान १० उमेदवार उभे असतात. त्यातले मुख्य पक्षांचे २-३ उमेदवार सोडले तर बाकीच्या अपक्ष उमेदवारांबद्दल मला काहीही माहीत नसते. मग मी 'कोणीही नाही' हे कशाच्या आधारावर म्हणायचे. ऊमेदवाराचे चारित्र्य/लायकी हे पक्षीय लोकशाहीत कितपत महत्त्वाचे हा एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ मला भाजप या पक्षाची ध्येयधोरणे मान्य नाहीत. त्यामुळे माझ्या मतदारसंघात भाजपतर्फे कितीही चांगल्या चारित्र्याचा उमेदवार उभा असला तरी मी त्याला मत देणार नाही. उलट ज्यांना काँग्रेसची धोरणे पसंत नाहीत त्याने काँग्रेसतर्फे महात्मा गांधी उभे राहिले तरी त्यांना मत देता कामा नये. कारण उमेदवार चांगला म्हणून आपण चुकीची (आपल्या मते) धोरणे मान्य करणार काय हा प्रश्न आहे. (यातून मग उमेदवार असावेच कशाला? नुसते पक्षच का नको? असा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर माझ्याकडे नाही) घाटपांडे साहेबांनी सांगीतल्याप्रमाणे आधीची चर्चा वाचली. त्यात हा मुद्दा आढळला नाही.खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

मी देखिल नसावे ला मत दिले "असावे" हा पर्याय देताना, प्रत्येक मतदार "सर्वज्ञ आहे" "समजुतदार आहे", तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे "सत्शील आहे" असे जे गृहित धरले जाते, तेच मुळात चूक आहे. जशी प्रजा, तस्साच राजा! यात शन्का ती काय? मग कशाला ही नस्ती उठाठेव? आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

जोवर 'कुणीही नाही' पर्यायाला सर्वात जास्त मते मिळाल्यास ती निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा कायदा होत नाही तोवर या पर्यायाला काहीच अर्थ नाही. प्राप्त परिस्थितीत या पर्यायाला कायद्याने काहीच किंमत नाही. ज्यांना कोणाही उमेदवाराला मत द्यायचे नाही त्यांनी मस्तपैकी सुट्टी एंजॉय करावी.मतदान केंद्राकडे फिरकायचेच कशाला?

In reply to by विसुनाना

मतदान करावे, वाटल्यास मत बाद करावे, पण दूर राहू नये, कारण - तुम्ही न फिरकल्यास तुमच्या नावाने खोटे मतदान करणार्‍यांचे फावते व तसे ते खात्रीने होतेच - या गोष्टीची विविध पक्षांतील समाजकंटक वाटच पहात असतात. जितके मतदाते मतदानापासून दूर राहतात तितके भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी सोकावतात हे ध्यानी असूदे. वाईट नेते सत्तेवर येतात कारण चांगले मतदार मत देत नाहीत. - दिगम्भा

In reply to by दिगम्भा

मतदान करावे, वाटल्यास मत बाद करावे, पण दूर राहू नये
दिगम्भा साहेब मतदान यंत्रात बाद मतची सुविधा(?) नाही. पुर्वी मतपत्रिकेत दोन उमेदवारांच्या मधेच शिक्का मारुन मत बाद करता येत होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by विसुनाना

मतदान न करणे आणि 'वरील पैकी कोणीही नाही' असे मत व्यक्त करणे यात असलेला मुल्यात्मक फरक हा कसा नोंदवणार? मी मतदान करीत नाही याचा अर्थ असाही होउ शकतो कि मी इतका उदासीन आहे की उमेदवार योग्य कि अयोग्य हा विचार करण्याच्या फंदात सुद्ध मी पडत नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निवडणूक रद्द होण्याचा बडगा नसेल तर नुसते 'मूल्यात्मक नकारार्थी मतदान' याला कोणताही पक्ष काहीच किंमत देणार नाही. कदाचित पुणे!!! येथे त्याला किंमत असेल. पण इतरत्र? नाहीतरी आता कोणती मूल्ये कोण उराशी बाळगतो? (लै मिटर पडलं. )

चा॑गला विषय चर्चेला घेतला त्याबद्दल धन्यवाद.. मी पहिल्या पर्याला मत दिले आहे.जर मला कुठलाही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मला लोकशाही पध्दतीने,गुप्तता राखुन तसे दाखविण्याचा अधिकार असावा असे माझे मत आहे. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

असावे या पर्यायाला मत दिले आहे पण त्याने काही साध्य होईल असे वाटत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत प्रांतीय पक्षांना बंदी असावी अशा मताचा मी आहे. असे केले तर मोठे राजकीय पक्ष सुध्दा चांगले उमेदवार उभे करण्याची शक्यता जास्त आहे. माझे मत निराशावादी वाटेल कदाचित, पण आपला देश आज अशा स्थितीत आहे की त्याची तुलना पत्त्यातल्या 'पेशन्स् 'या खेळाशी करता येईल. अशी एक वेळ येते की पाने अडकून बसतात आणि संपूर्ण डाव मोडून नव्याने चालू करण्याशिवाय उपाय रहात नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

नसावेला मत दिले आहे. कारण? वरील कौलातहि "फरक पडत नाहि", "मत देऊ इच्छित नाहि" हे/असे पर्याय का नाहित? या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच निकालात नि:संदिग्धता आवश्यक आहे. ऋषिकेश

दुसर्‍या एका संकेतस्थळावर प्रकाश घाटपांडे यांच्या चर्चेला मी उत्तर दिले होते, ते येथे देत आहे: - - - "वरीलपैकी कोणीही नाही" हा पर्याय मला बहुपक्षीय लोकशाहीत पटत नाही. निवडणूक-अधिष्ठित लोकशाही म्हणजे "विस्कळित न होणारे राज्यशासन" आणि "लोकांची अनुमती" यांच्यामधला समतोल आहे. अराजकापेक्षा कुठलेतरी राज्य असणे बरे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी तसेच नंतर कुठलेतरी शासन स्थापित असलेच पाहिजे, अशी घटनेची तरतूद हवीच. असा "कोणीच नको" पर्याय असला आणि एखाद्या निवडणुकीत तो पर्याय जिंकला तर काय करावे? अराजक नको, तर आधी चालू असलेलेच शासन कामचलाऊ म्हणून पुढे चालू ठेवावे काय? म्हणजे लोकांची संमती नसून चालू! तसे नको. कुठल्याही निवडणुकीत कोणतेतरी सरकार निवडून आलेच पाहिजे अशा प्रकारेच निवडणूकीची प्रक्रिया उभारली पाहिजे. (सामान्य आयुष्यातील उदाहरण घेऊ. आपण आज घरीच राहू, की सिनेमाला जाऊ, की चौपाटीवर जाऊ, की देवळात जाऊ, की ...? "काहीच नाही - घरीसुद्धा राहायचे नाही" हे उत्तर चालणार नाही - काही नाही तर "फुटपाथवर झोपून राहू" किंवा असा कुठलातरी नवीन पर्याय द्यावाच लागेल.) बहुपक्षीय लोकशाहीत "हल्लीचे पर्याय नको" म्हणणार्‍याला नवीन पक्ष काढायचे स्वातंत्र्य आहे. तरी लेखाचा एक गर्भित मुद्दा पटण्यासारखा आहे. सर्व उमेदवारांचा तिटकारा येऊन लोक निवडणुकीत मत द्यायला गेलेच नाही तर त्या लोकशाही राष्ट्राला मोठाच प्रश्न आहे. येणार्‍या शासनाला लोकांची संमती गृहीत धरता येत नाही. म्हणूनच काही देशांत मत देणे सक्तीचे केले जाते. पण यातही तोटे आहेत. लोकशाहीची कातडी पांघरलेली हुकुमशाही राज्ये सुद्धा याच सक्तीद्वारे "हुकुमशहा लोकनियुक्त आहे" असा आव आणतात. लहान राज्यांत - स्वित्झरलँडमध्ये वगैरे - एक-एक मताने फरक पडतो. प्रचंड लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये हा प्रश्न आहे - आपल्या मताने फरक पडतो, असे असे त्या अब्जापैकी एका व्यक्तीला कसे निश्चित पटावे? भारतात, अमेरिकेत (फ्लोरिडामधली ऍल गोर याने हरलेली निवडणूक आठवावी) क्वचित मोठा फरक पडतो, पण तो आकडेशास्त्रीय - जे मतपत्र फाटून बाजूला पडले ते आपलेच मत की लाखापैकी दुसर्‍या कोणाचे? आपल्या वैयक्तिक योगदानाबद्दल निश्चित खात्री पटत नाही. मला वाटते सैद्धांतिक पातळीवर या प्रश्नाचे उत्तर देणे फार कठिण आहे.

दै. सकाळचे संपादक श्री यमाजी मालकर यांना अशा प्रकारची चर्चा मराठी संकेतस्थळांवर चालू असल्याचे मी सांगितले. त्यावर त्यांचे म्हणणे होते कि अशी चर्चा होण्याबरोबरच सांख्यिकी आधारावर( सॅम्पल मर्यादित असले तरी) जर किती टक्के लोकांना हे बटन असावे / नसावे असे वाटते ही अधिक उपयुक्त माहिती होईल. म्हणुन जास्तीत जास्त लोकांनी मत व्यक्त करावे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे नवीन पक्ष काढायची मुभा प्रत्येकाला आहेच. आजतागायत अनेक व्यक्ती चांगल्या म्हणून आपण पाहिल्या आहेत. मेधा पाटकर, अण्णा हजारे, अरूण भाटिया, शेषन, किरण बेदी वगैरे. त्या सर्वांना एक पक्ष स्थापणे शक्य नव्हते का? त्यांच्या एकत्र न येण्यात वैयक्तिक अहंकार हे कारण असेल असे मला वाटत नाही. दुसरे म्हणजे आपण यांच्या सारखी चांगली माणसे सर्व ५४२ मतदार संघातून सुटी सुटी निवडून दिली तरी ही माणसे काय मुद्द्यांवर सरकार स्थापन करणार आणि देशाचा गाडा कशा प्रकारे हाकणार हा प्रश्न उरतो. कारण ही सर्व माणसे काही देश चालवण्याच्या कलेत प्रवीण आहेत हे आज तरी आपल्याला ठाऊक नाही पण ती देश चांगला चालवतील असे आपण समजतो आहोत कारण ती चांगली माणसे आहेत. कदाचित राज्य नोकरशहाच चालवतील पण ही स्वच्छ माणसे सत्तेवर आहेत म्हणून भ्रष्टाचार होणार नाही. पण भ्रष्टाचार संपला की देशाची प्रगती आपोआप होईल असे आहे? म्हणून त्यांनी पक्ष म्हणून एकत्र येऊन आपली धोरणे स्पष्ट केल्याशिवाय त्यांना सुट सुटे त्यांच्या चारित्र्याच्या आधारावर निवडून देणे अयोग्य वाटते. आज आपण सद्ध्याच्या राजकारण्यांवर नाराज आहोत कारण ते भ्रष्टाचाराखेरीज सत्तेसाठी नको त्या लोकांचे (मुसलमानांचे, मागासवर्गीयांचे आणि परप्रांतीयांचे) लांगूलचालन वगैरे करतात असे आपल्याला वाटते. पण या सर्व मुद्द्यांवर या सार्‍या चांगल्या माणसांची धोरणे आपल्याला आवडत नाहीत तशीच आहेत अशी माझी खात्री आहे. मग आपल्याला नक्की काय हवे आहे? हे सारे मुद्देसूद वगैरे नसून लाउड थिंकिग स्वरूपाचे आहे. खराटा (रंग माझा वेगळा)