आयला.. फारच छान लिहिलयं. वाचताना मला ही थोडी भिती वाटली. तुमची काय अवस्था झाली असेल ते समजू शकतो.
एकदा असेच मी रात्री घरी एकटा झोपलो असताना मध्येच जाग आली आणि पाहीले तर कोणीतरी माझ्या रुमचा दिवा लावला होता. मला जाम भिती वाटली. पहिल्यांदा वाटले की चोरबिर आले असावेत पण बेडरूमचा दरवाजा बंद होता त्यामुळे नक्की काय ते समजत नव्हते. तेवढ्यात एक पाल दिव्याच्या बटणापासून थोड्या दुर अंतरावर बघितली आणि पालीमुळे दिवा लागला असावा अशी समजूत करून घेतली.
दुसराही असाच एक प्रसंग-होतो.रात्री बेडरूम मध्ये एकटाच झोपलो होतो. जवळच एक खुर्ची होती. झोप तशी लागतच होती आणि अचानक कोणीतरी खुर्चीवर बसल्यावर आवाज येतो ना तसा एक आवाज झाला. मला दरदरून घाम फुटला. तोंडातून एक शब्द फुटेना. (दातखिळ बसणे यालाच म्हणतात काय?). जवळजवळ ३-४ मिनीटे अशाच अवस्थेत होतो. (हा इतका कालावधी सुद्धा खुप मोठा वाटतो.). नंतर कसे काय कोणास ठावूक तोंडातून दत्तगुरूंचे नाव बाहेर आले आणि एकदम मोकळे वाटले. २ मिनीटांनी ऊठलो आणि दिवा लावला. खुर्चीत कोणीच नव्हते (कसे कोण असणार?) . आज हे लिहिताना मला हसू येतेय पण त्यावेळी माझी फारच तंतरलेली होती.
अजूनही मी कधी एकटा झोपणार असलो तर माझ्या बेडरूम मध्ये एकही खुर्ची ठेवत नाही.
खादाडमाऊ
मागील महीन्यात माझ्या सोबत पण असेच काही झाले होते, मामाच्या फार्म हाऊस वर रात्री पार्टी करुन मस्त पैकी झोपलो होतो, फार्म हाऊस हा शहरा बाहेर व जवळ पासची वस्ती देखील तीन-चार किलो मिटर दुरवर... रात्री झोपलो होतो व अचानक जाग आली कारण कोणी तरी स्त्री माझ्या कानात काही तरी बोलून गेली असे मला वाटले ... मग काय... दरदरुन घाम फुटला, शरीर जागचे हलेना, तोंड उघडेना.... अशीच काही मिनिटे गेली... फटाक करुन उठलो बाहेर गॅलरी मध्ये आलो व मस्त पैकी जोराने श्वास घेतला व त्या बाईचा शोध घेण्यासाठी परत बेडरुम मध्ये आलो, इकडे तिकडे पाहिले काहीच दिसले नाहि, बेड खाली पण शोधले पण काहीच दिसले नाही... परत बेड वर आलो तोच उशी खाली ठेवलेला फोन वाजला, एक मैत्रिण होती व म्हणाली " अरे एवढ्या रात्री फोन करायला तुला काय झाले, बरं फोन केलास तो केलास व बोलत ही नव्हतास.... "
=)) मला जाम हसू फुटले... च्यामायला झोपेत फोनवर हात पडला असेल व त्यामुळे लास्ट डायल मधील फोन पुन्हा लागला... व ती ने तो उचलला असेल, माझ्या फोन मध्ये जरा आवाज जास्तच आहे, लाऊडस्पिकर ऑन करण्याची गरज नाही एवढा जास्त... तर तीच बया माझ्या कानात बोलत होती व मला वाटले भुत आहे...... =))
राजे,
कानात बाई बोलली म्हणून शोध घ्यायला उठलात..जर एखादा बुवा ( बु..वा...) बोलला असता तर तसेच पडून राहिला असता. (ह.घ्या.)
मला जरी अजून एकही भुत दिसले नाही तरी एखाद्या तरूण बाईचेच भुत पहिल्यांदा दिसावे असे वाटते.
बाकी इकडे युरोपात बरेचश्या मुली भुतासारख्याच दिसतात. कदाचित गोर्या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?
खादाडमाऊ
लेख आणि प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत.
( ह्या लेखाला किमान ५० प्रतिक्रिया निश्चित येतील. ) :)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
मला जसा कोणीतरी खुर्चीवर बसल्याचा भास झाला..तसाच एकालाही सारखा होत होता..त्याने मुद्दामून त्याची चित्रफित बनवून घेतली. ती आपण खालील दुव्यावर बघु शकता..
सुचना खरोखरच्या भुताची चित्रफित असल्याने आपापल्या जबाबदारीवर चित्रफितीतील खुर्ची कडे बघावे...थोडी थोडी हलल्याचा भास होईल..
http://www.youtube.com/watch?v=QfZItov1BUo&feature=rec-HM-fresh+div
खादाडमाऊ
लेख ओके ओके वाटला !!
राजेंचा अणुभव (की येडचापपणा बे ? ) एक णंबर्स !!
असो .. मी ऑफिसातून लेट घरी यायच्या वाटेवर कॉलणीतलं एक कुत्र माझ्या वर लै भुंकायचं .. त्याची मला लै भिती वाटायची म्हणून मी लांबच्या वाटेने यायचो ... पण दुसरीकडेही कुत्र्याचा त्रास सुरू झाला .. मग मी एक दिवस हातात दगड घेऊन चालू लागलो .. कुत्र जसं भुंकायला लागलं तसं त्याच्या दिशेने एक सॉलीड दगड फेकला गेला, तो इतका अचुक होता की क्लियर डोक्यात बसला , कुत्र गप्प गार झालं ते उठलंच नाही.. म्हंटलं कुत्र खपलं की काय .. मला कुत्र्याची हत्या झाल्याचं वाईट वाटलं पण नाही , दुसर्या दिवशी ते पुन्हा दिसलं .. पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) मला प्रचंड आणंद झाला होता .. असो
लेख ओके ओके वाटला !!
सहमत आहे. हा लेख मी आणखीन रोचक बनवु शकलो असतो हे नक्की. असो...
पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता
=)) हे भारी.. बाकी दगड नक्की कसा व केवढा मारलात ते सांगितले तर बरे होईल. आजकाल सगळीकडे फार त्रास वाढला आहे भटक्या कुत्र्यांचा. मीसुद्धा बेंगलोर मधे ऑफिसवरुन घरी येताना ज्या रस्त्याने कुत्रे नाहीत असा रस्ता शोधत यायचो..
तोसुद्धा एक गमतीदार लेख होईल.
अजुन कुणाचे असे अनुभव असतील तर नक्की लिहा.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
=)) =))
पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता
=)) =))
कदाचित गोर्या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?
भाग्यश्रीशी सहमत.
मीही वाचताना घाबरले. मधेच वाचन थांबवून घरात एकदा फिरून आले, मगच पुढची गोष्टं वाचली.
लहानपणी मी फारच भित्री होते (आता तितकी नाही ;)).
पुजेतली सुपारी माझ्याच धक्क्याने अंगावर पडल्यावर मी इतकी घाबरले आणि ओरडले की घरदार जमा झाले होते.
रेवती
प्रतिक्रिया
जबरदस्त..
मागील
अरे वा..
राजे
राजे,
राजे.. ज्याम हसले..
१०२%सहमत.
मस्त!
+१
खुर्चीवर भुत
भ्यालो ना मी . .
खासच.
लेख ओके
टारझन साहेब
ह. ह. पु. वा.
छान आहे लेखन..
लेख मस्त
भाग्यश्री
लै भारी रे!