नमस्कार मिपाकर खव्वयांनो,
मी एक पाककृती लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत आहे, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते.
साहित्यः
पाव किलो खजूर,
अर्धी वाटी दाण्याचे कुट,
५० ग्रॅम काजु,
५० ग्रॅम बदाम,
५० ग्रॅम पिस्ते,
चिमुटभर केशर,
पाव वाटी गुलकंद
२-३ वेलदोड्यांची पुड स्वाद आणि सुवासाकरिता.
कृती:
सर्वप्रथम खजुरातील बिया काढून घ्याव्या. कढईमध्ये तूप गरम करुन सोललेले खजूर परतून घ्या. आता हे खजूर वेगळे काढा. थोडेसे काजू व पिस्ते बारीक काप करुन बाजुला काढून पुन्हा थोडं तूप गरम करुन उरलेले काजू, बदाम, पिस्ते खरपूस भाजून परतून घ्या.
हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर त्यात दाण्याचे कुट, वेलदोडा पुड घालुन मिक्सरमधुन बारीक करून घ्यावे. ह्या मिश्रणात गुलकंद मिसळून तुपाचा हात लाऊन त्याचे लहान लहान लाडु वळावेत. हे लाडू काजू-पिस्त्यांच्या कापामध्ये घोळवा.
टिपः
सगळे जिन्नस भाजून घातल्यामुळे लाडु भरपूर दिवस टिकतात.
वाचने
14942
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
काँग्रॅच्युलेशन
+१
In reply to काँग्रॅच्युलेशन by विनायक प्रभू
+२
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
धम्याने
In reply to काँग्रॅच्युलेशन by विनायक प्रभू
म्हणजे ...
कुंदन भाउ
छान
पण फोटू
In reply to छान by सुनील
धन्यवाद
In reply to छान by सुनील
वावा!!!
हा
In reply to वावा!!! by घाशीराम कोतवाल १.२
क्या बात है
सहमत
In reply to क्या बात है by आनंदयात्री
मस्त
मस्तच हो
In reply to मस्त by भडकमकर मास्तर
असेच
In reply to मस्तच हो by मृगनयनी
अग्दी!
In reply to असेच by आनंदयात्री
+१
In reply to मस्तच हो by मृगनयनी
मस्तच!
मस्तच!
छान
धन्यवाद जागुजी
In reply to छान by जागु
बापरे!!!
काय
अजुन यक
पाकृ नविनच
मस्तग.
जबरदस्त!!
काय ग
In reply to जबरदस्त!! by प्राजु
कोणाचा फोटो?
In reply to जबरदस्त!! by प्राजु
खुपच छान
आईच्ची ज्जय!
भारी
In reply to आईच्ची ज्जय! by धमाल मुलगा
हा हा हा ...
In reply to आईच्ची ज्जय! by धमाल मुलगा
अरे वा!! आता
प्रकाटाआ
In reply to अरे वा!! आता by ऋचा
बेष्ट... लाड
बायको
मस्त रेसिपी..
धन्यवाद