Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रावण मोडक on Sat, 03/14/2009 - 00:44
  • Log in or register to post comments
  • 7144 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 03/14/2009 - 00:56

Permalink

मुक्तलेखन

मुक्तलेखन आवडले. शेवटची नोंद वाचून चरकलो. खिन्न वाटले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 03/14/2009 - 11:16

In reply to मुक्तलेखन by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

असेच म्हणतो. लेख छान लिहिला आहे. नोंदी वाचनीय. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 03/14/2009 - 01:17

Permalink

मोडकगुरुज

मोडकगुरुजी, अश्यातश्याच नोंदी आवडल्या. शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.. अजूनही काही नोंदी असल्यास अवश्य लिहा... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 03/14/2009 - 01:55

Permalink

बापरे!!

शेवटचा परिच्छेद... मी ही चक्रावले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 03/14/2009 - 02:00

Permalink

नोंदी

आवडल्या. पुरेशा बोलक्या आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 03/14/2009 - 06:01

In reply to नोंदी by नंदन

Permalink

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 03/14/2009 - 08:31

In reply to +१ by घाटावरचे भट

Permalink

+२

हेच बोलतो --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 03/14/2009 - 07:08

Permalink

नोंदी आवडल्या . ..

मोडकसाहेब. तुमच्या नोंदी आवडल्या. तुम्ही भेट दिलेला हा भाग आजही खुप मागासलेला आहे. भॉगोलिक परीस्थीती , निष्कीय राज्यकर्ते ह्यामुळे आजही आवश्यक सुविधा इथे पोहचत नाहीत. शेवटची नोंद थोडी निराश करुन गेली. शहरातल्या लोकांच्या घरात दिवे लागावे म्हणुन अजुन किती लोकांना आपल्या घरातले दिवे मालवुन देशोधडीला लागावे लागेल कुणास ठाउक. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 03/14/2009 - 07:34

Permalink

डायरी

मोडकसाहेब तुमची निरिक्षणे, नोंदी सहीच. थँक्युचा भाग मस्त! तुम्हाला जेव्हा रास्त वाटेल तेव्हा नक्की आवाहन करा यथाशक्ती मिपाकर चांगल्या योजनेत नक्की सहभागी होतील. वेळोवेळी तुमच्या नोंदी वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 03/14/2009 - 07:54

Permalink

नोंदी

नोंदी आवडल्या. शेवटची गावाची नोंद वाचून वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 03/14/2009 - 08:25

Permalink

मन विषण्ण करणारे अनुभव!

मोडकसाहेब आपले अनुभव मन विषण्ण करणारे आहेत. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Sat, 03/14/2009 - 11:11

Permalink

भान सुटलेला विकास

नोंदी अगदी मूलगामी आहेत. मोबाईल आहे - डिश टीव्ही आहे. रस्ते नाहीत- प्राथमिक आरोग्य केंद्रे नाहीत - शाळेतले शिक्षक कागदावर - वीज नाही. गावातले धनी राजकारणात शिरतात - ग्रामपंचायती, पंचायत समित्यांवर निवडून येतात. विकासकामाचा पैसा आपल्या घराकडे वळवून आणखी धनी होतात. मोठ्या प्रकल्पात मूलभूत सुविधा बुडून जातात. चलन फुगवटा होतो - सामान्य माणसाची सांपत्तिक स्थिती दरिद्रीच राहते. दूरदूरच्या खेड्यांचा-वाड्यांचा असा विकास होतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sat, 03/14/2009 - 13:34

In reply to भान सुटलेला विकास by विसुनाना

Permalink

+१ विसुनाना!

अगदी अगदी पटलं. बाकी श्रावणराव, आपण उत्तम पध्दतीनं सांगितली 'महाराष्ट्रातल्याच आफ्रिकेची ' कैफियत. आम्हाला मॉल दूर/बंद असेल तर चिडचिड होते...का तर आता चार दुकानं फिरावं लागणार म्हणुन. आम्हाला राग येतो शहरातले गतीरोधक किंचित उंचावले तर...त्रास होतो पावसानं रस्त्यात पडणार्‍या खड्ड्यांचा...... साला, तुम्ही सांगितलेले प्रकार वाचुन असं वाटतंय, की ह्या सगळ्या आम्हाला त्रास होणार्‍या गोष्टी ह्या लोकांना मिळाल्या तर स्वर्गाहून काही फार वेगळं वाटायचं नाही त्यांना! इट इज द डिफरन्स बिट्वीन इंडिया & भारत :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 03/14/2009 - 18:13

In reply to +१ विसुनाना! by धमाल मुलगा

Permalink

+१

श्रावणकाका, लेख आवडला. जी.एम.आर.टी.ला गेले की एक प्रकारची खिन्नता का येते हे आता नीट समजतंय. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 03/15/2009 - 09:34

In reply to +१ विसुनाना! by धमाल मुलगा

Permalink

आंतरिक लढा

इट इज द डिफरन्स बिट्वीन इंडिया & भारत
खर आहे या फरकाचे लढ्यात रुपांतर होत आहे. मांग के कुछ मिलता नही तो छिनके लेंगे या दिशेने वाटचाल आहे. वेळीच संवेदनशील व कृतीशील झालो नाही तर असंतोषाचे बळी होण्याची वेळ दुर नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 03/15/2009 - 00:17

In reply to भान सुटलेला विकास by विसुनाना

Permalink

विसुनाना आणि इतर सारे समंजसजनहो,

सहज आठवलं म्हणून एक लिंक देतोय. भान सुटलेलाच नव्हे आता तर हा 'बेभान' करणारा विकास होऊ पाहतोय. मणिबेलीत बार! मणिबेली हे सरदार सरोवराच्या पाणलोटात 'बुडालेले' महाराष्ट्रातील पहिले गाव. आजही या गावात किमान शंभर उंबरा आहे. माणसं आहेत, शेती करताहेत. गुजरात ड्राय स्टेट म्हणून हा बार महाराष्ट्रात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 03/14/2009 - 18:35

Permalink

नोंदी..

नोंदी आवडल्या,वास्तवाची जाणीव करून देणार्‍या ह्या नोंदी.. शेवटची नोंद खिन्न करुन गेली. बिपिनशी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sat, 03/14/2009 - 19:07

Permalink

सही!

खूपच लक्षणीय नोंदी! शेवटची मात्र खरच विचार करायला लावणारी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 03/14/2009 - 20:33

Permalink

खरय

कागदावरच्या या सरकारी शाळा राज्याच्या, देशाच्या विकासविषयक निर्देशांकात भर टाकत असतात हे मात्र नक्की.
होय ! वास्तव व कागद यात कितीही तफावत असली तरी प्रशासन कागद हेच वास्तव वा प्रमाण मानून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करते. त्यामुळे त्याची परिणामकारकता ही फक्त कागदावरच राहते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 03/14/2009 - 23:13

Permalink

धन्यवाद...

धन्यवाद... चांगल्या नोंदी आहेत... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Sun, 03/15/2009 - 08:11

Permalink

संवेदनशील

संवेदनशील लेखन!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on Sun, 03/15/2009 - 08:50

Permalink

डोळे

डोळे उघडायला लावणारे लेखन. वरती सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे- तुम्हाला जेव्हा रास्त वाटेल तेव्हा नक्की आवाहन करा यथाशक्ती मिपाकर चांगल्या योजनेत नक्की सहभागी होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sun, 03/15/2009 - 09:32

In reply to डोळे by प्राची

Permalink

+१

हेच म्हणतो ! लेख अतिशय परिणामकारक !
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Sun, 03/15/2009 - 09:45

Permalink

विदीर्ण अनुभव

खूप चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध केलेत. अजून आपल्याला किती दूरचा 'पल्ला' गाठायचा आहे, याची जाणीव करुन दिलीत. धन्यवाद. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 03/15/2009 - 15:41

Permalink

धन्यवाद...

सर्वांनाच. शेवटची नोंद चटका लावणारी, चक्रावणारी वाटते... खरे आहे, सत्य तसे असतेच. ह्या सगळ्या आम्हाला त्रास होणार्‍या गोष्टी ह्या लोकांना मिळाल्या तर स्वर्गाहून काही फार वेगळं वाटायचं नाही त्यांना... कोसो दूर आहेत त्यापासून ते. तिथं संघर्ष सुरू आहे तो रोजच्या जगण्याचाच. याच काळातला एक अनुभव - मुलांसाठी एक खेळ घेतला. समोर वस्तू मांडल्या होत्या, चार रांगात. पहिल्या रांगेत बिस्कीट, चॉकलेट अशी बक्षीसे. दुसऱ्या रांगेत पेन्सील, खोडरबर, वगैरे. तिसऱ्या रांगेत असंच त्यासारखं काही तरी आणि चौथ्या रांगेत छोट्या बॅटरी, पेन अशा वस्तू. रिंग फेकायची आणि वस्तू जिंकायची. पहिल्या साधारण दीड तासात वीसेक बॅटरी मुलांनी जिंकल्या. रिंग फेकण्याआधी अर्थातच कशावर फेकणार हे विचारायचो. मुलांकडून (अर्थात, मुलींकडूनही) येणारं उत्तर बॅटरी किंवा पेन असं असायचं. त्यावरच त्यांचं लक्ष्य कारण ती सर्वांत उपयुक्त वस्तू. बिस्किटं, चॉकलेट अशीच देऊन टाकली मुलांना. या फरकाचे लढ्यात रुपांतर होत आहे. मांग के कुछ मिलता नही तो छिनके लेंगे या दिशेने वाटचाल आहे. कसले छिनके लेंगे? वीस वर्षं पाहतोय, ते फक्त मागणे घेऊन बसले आहेत. अहिंसेवरची पक्की निष्ठा हा त्यांचा आपणच ठरवलेला वीकनेस आहे की काय असे वाटू लागते आता. या कामाविषयी अनेकांनी चौकशी केली आहे. जीवनशाळा याविषयी लिहितो लवकरच. म्हणजे माझ्या लेखातून सुटलेले सारे दुवे वाचकांच्या लक्षात येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 03/16/2009 - 19:03

Permalink

अस्वस्थ

अस्वस्थ करणार्‍या नोंदी ! जीवनशाळांबद्दल वाचायला आवडेल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com