Skip to main content

लेक होती घरामध्ये--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 09/03/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेक होती घरामध्ये दारी गजबज होती लेक सासरी गेली अन सुनी झाली ही ओवरी लेक नटते थटते हौस पुरविते आई आत्ता संक्रांतीची मेंदी कशी रंगतच नाही गौर पुजतसे माय जणु लेकच साजिरी दोन दिवस पाहुणी लेक येतसे माहेरी बाप कणखर मोठा जीव गुंते लेकीपाशी सारा मानमरातब ठेवी लेकीच्या दाराशी लेक सुखात सासरी सुखी माहेरी माउली काय भाग्य त्या लेकीचे सासरी आईची सावली
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3540
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अप्रतिम भावस्पर्शी चित्र...!!

लेक सुखात सासरी सुखी माहेरी माउली काय भाग्य त्या लेकीचे सासरी आईची सावली हे भाग्य सगळ्या लेकिंना लाभो.

किती भावस्पर्शी लिखाण !!!

फार सुंदर! सगळ्याच ओव्या भारी आहेत :) दोन दिवस पाहुणी.. या ऐवजी, दोन दिसांची पाहुणी.. असे चालेल का? मुमुक्षु

In reply to by सहज

सुंदर !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सासरी गेलेल्या प्रत्येकी साठी आहे ही कविता. आवडली. लेक नटते थटते हौस पुरविते आई आत्ता संक्रांतीची मेंदी कशी रंगतच नाही इथे मेहंदी रंगतच नाही.... असं का? लेक जटते थटते हौस पुरविते आई सक्रांतसणाची घाई हलव्यात रंगून जाई... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

एवढी भावस्पर्शी कविता वाचून मन भरून आल आणि खरच माहेरची आठवण आली. त्यातल्या त्यात संक्रान्तीच्या मेंदीने तर खूपच रंग भरला! अप्रतिम कविता! क्रान्ति

अगदी आतून आलेलस, सहज !!

बाप कणखर मोठा जीव गुंते लेकीपाशी सारा मानमरातब ठेवी लेकीच्या दाराशी याओळी मनात घर करतात...