इब्लीस चाचा आणि इतर काही गोष्टी.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
4 Mar 2009 - 9:23 pm

रविवारची सकाळ.चाचा आरामात पेपर पहात बसले होते.
चाची आली .चाचांना म्हणाली ,
"काय हो पेपर बरे वाचताय सकाळी"
"दुसरा काय ऑप्शन आहे गं आपल्याला.चाळीतली माणसं आपण .सकाळी दरवाजा खुल्ला ठेवावा लागतो ना. "
चाचा चाचीकडे डोळ्यात इश्क आणून म्हणाले.
चाची खमकी ."पेपर बघताय निस्ते ,चष्मा बरा लागत नाही "
चाचानी एक मोठ्ठा दर्दभरा सुस्कारा सोडला.
"आजकाल पेपरात बघण्यासारखंच असतंय ग.आणि तू मिड डे बंद केल्यापासून ....."चाचानी आणखी एक सुस्कारा सोडला.
"अहो काही लाज , शरम ,कुलकी मर्यादा काही आहे की नाही ..किती म्हणून पेपर बंद करायचे, आधी तो चावट पारशी करंजीया आणि त्याचं ब्लिट्झ. चाचीचा पट्टा सुरु झाला.
"खुदा जानता है...."चाचाचे डोळे लुकलुकले."आम्हाला ह्या चाळीत पेंटहौस कुठे परवडायला"आमचा बि.के.करंजीया आणि हेफनर अंकल काही फरक नाही गं"
चाची आता सिरीयसली चाचाला म्हणाली."अहो आता तरी चष्मा लावा.आणि बाथरुमकडे चला."
चाचा लाजून ह्यॅह्यॅ करून हसले.."आज बरा मूड. ह्यॅह्यॅह्यॅह्यॅ..."
चाची संतापून लाल झाली.चाचाचं बखोट धरून त्यांना दरादरा ओढत बाथरुम मध्ये गेलीआणि म्हणाली "ऐका ...कान देउन ऐका"
चाचा बावचळले " काय ऐकू ....
"ऐका नीट काहीतरी च्चुर पुर च्चुर पुर आवजा येताय की नाय....."चाची म्हणाली.
आता चाचांचा मानसीक तोल गेला .
"क्काय घंटा ऐकू येणार? तूच बोलतेयस सारखी.."सात्वीक संताप धोक्याच्या पातळीवर जातोय हे चाचीच्या लक्षात आलं .
"बरं बाई .गप्प बसते मी.ऐकू आलं की सांगा..."
चाचा पाच मिनीटं ऐकत होते.
पाच मिनीटानी चाची म्हणाली "अहो ऐकलंत का काय ते.."
चाचानी मान डोलावली ."बाथरुमच्या माळ्यावर उंदीर आहेत."
"धन्य हो आपकी,दहा मिनीटं लागली का आवाज ऐकायला."चाचा म्हणाले.
"अरे भागवान पहील्याच मिनीटात ऐकलं काय ते ...पण घरात शांतता जरा बरी वाटत होती."
एव्हढं बोलल्यावर परीस्थीती हाताबाहेर जाणार होती .
पण चाची चतुर, चाचाला कामाला लावायचं म्हणजे थोडी नरमी दाखवायला पायजे हे तिला जात्याच माहीती होतं.
"आता माझं ऐका .स्टूल घ्या ,वर माळ्यावर चढा.अडगळ हलवा आणि हाकला त्या उंदरांना.मेली रात्रभर झोप नाही या आवाजानी "चाचीनी काम सांगायच्या आवाजात रिक्वेश्ट केली.
"मला कसा नाही ऐकू आला आवाज.चाच्यानी गाफील विधान केलं.
"जळ्ळी झोप तुमची.तत्काल मध्ये झोपता रात्री" चाचीनी चाचाला पकडीत धरलं.
आणि मग..
चाचीनी ऍल्युमिनीयमची प्रदर्शनात घेतलेली शिडी आणली.
"आता चढा वर ...चाचीनी फर्मान सोडलं"
चाचाचे पाय लटपटायला लागले.
ते म्हणाले "अगं मला वर्टीगोचा त्रास आहे माहीत्येय ना तुला "तूच चढ वर आणि त्यांना हाकल खाली उंदरांना . मग मी बघतो एकेकाला "
चाचीनी कपाळाल हात लावला.
"इतर वेळी होत नाही वर्टीगो तुम्हाला.रात्रभर झोप नाही मला ."
"अगं उंदरांना काय रात्र आणि काय दिवस . ती काय माणसं आहेत."
"असं कर. तू चढ आणि मी तुला ढकलतो मागून "चाचानी सल्ला दिला.
चाचांचा कावा चाचीनी ओळखला.
चतुर चाची म्हणाली "छान हो छान .बायकोला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडू नका."
"माझ्या बहीणीच्या नवर्‍यानी एकदा असंच केलं होतं ."
"काय केलं होतं त्यांनी "
चाचानी उत्सुकतेनी विचारलं .
मग चाचीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.चाचा पेपरचा वारा घेत गोष्ट ऐकत राहीले.

एकदा काय झालं.....
बन्नो आणि तिचा शोहर गेले होते लग्नाला.
दुपारी लग्नाचं जेवण झाल्यावर बन्नो सासूला म्हणाली "मै जाती घर अभीच. ये छोडेंगे मेरेकू घर और फिर जाएंगे दुकानपर"
जोडी निघाली घरी.
सासू सासर्‍याला डोळा मारून म्हणाली "अबी अगले साल नक्कीच्य..अपूनबी जाते थे ना ऐसेच घर"
पण सासर्‍याला काही कळलंच नाही. पान चघळता चघळता त्याला झोप लागली होती.
बन्नो घरी पोहचली आणि नवरा निघाला दुकानावर."मर्द जात एक जैसी बुद्दु "असं म्हणत बन्नो साडी बदलायला बेडरुम मध्ये गेली.
तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली आणि बन्नो नी दार उघडलं बघते तर काय नवरा घरी परत.
"अरे वो बँकवाला आयेगा दोपरको दिमाग खराब करनेकू" असं म्हणत तो सोफ्यावर आडवा झाला.
बन्नो साडी बदलणार आणि हा सांड आला की पाठीमागून धक्का मारत.
"बिचारी झुमके निकाल रही थी.झुमका पण पडला हातातून आणि त्याची फिरकी कुठे हरवली भगवान जाने.."
"सॉरी सॉरी "बोलत लागला तिला चाचपायला.
ई..ई..कहा हात लगाते हो.बन्नो ओरडली .
"अरे फिरकी गिरेगी तो पैले इधरीच स्टॉप है ना उसको" शोहर म्हणाला.
बन्नो लाजून लाल झाली.नही है रे बाबा इधर कूच..."असं म्हणत निर्‍या झाडायला लागली तर हा मदतीला पुढे.
सब मर्द जात बेशरम...चाची चाचाकडे बघत म्हणाली.पण चाचाला काहीच ऐकू गेलं नाही.
त्याच्या डोळ्यापुढे इश्ट्मन कलर फिलम दिसत होती.
तरीही मिळेना फिरकी तेव्हा बन्नो घाबरली .
सासूनी दिलेले झुमके.बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं .
ती शोहरला म्हणाली.. सच्ची ..सच्ची देखो जी. दिख नही रही किधरभी.
"अरे इधरीच गिरी होगी "असं म्हणता म्हणता त्याचे डोळे चकाकले.
मै क्या बोलता ..प्लंगके निचे गयी होगी घूम फिरके.
बन्नो भाबडी.बिचारी म्हणाली "चलो ढूंडोना पलंग के निचे.."
हा गेलाच तर पलंगाखाली आणि बन्नोलाही बोलावलं पलंगाखाली.
"देख ..देख ...उध्धरीच चमकताय कुछ..असं म्हणत हो गया चालू.."
चाचीनी स्टोरीत एक पॉज घेतला.चाचा फूल टू फिलम मध्ये
बन्नो बिचारी अडकली पलंगाखाली .
ओरडून म्हणाली "अरे कुछ तो शरम करो..बेहया..बदमाश."
तो म्हणतो कसा "देखो डार्लींग रात को पलंगपे कौन होता है?
काय बोलणार बिचारी .लाल गुलाबी होत म्हणाली" हम होते है.."
"बडी सयानी है तू "असं म्हणत तो म्हणाला "सही जवाब.."
रात हम पलंगके उप्पर होते है तो दोपहरको रात होती है पलंगके निच्चू .....
संध्याकाळी अब्बाजीनी सूनेच्या हातात फिरकी ठेवली आणि म्हणाले "उदरीच गिर गयी पंडालमे.मै देनेवालाही था फिर सोचा दोपहरको ढुंडने दो फिरकी मिया बिबीको..आणि त्यांना
अचानक खोकल्याची उबळ आली.
"असं तोंड उघडून काय बघताय माझ्याकडे "असं चाचीनी विचारल्यावर चाचा भानावर आले..
म्हणाले "याद आया मेरेकू. हम गये थे बारसेमें."
चाचीचा जीव भांड्यात पडला."तर आता चढा तुम्हीच शिडीवर आणि बघा त्या उंदरांना नाहीतर पुढच्या महीन्यात होईल बाळंतपण."
बाळंतपण म्हटल्यावर चाचा म्हणाले बाळंतपणावरून मला पण एक स्टोरी आठवली आता तू ऐक...
चाचानी सुरुवात केली........................

(मराठीत नर्म शृंगारीक कथा लिहावी असा विचार बरेच दिवस डोक्यात घोळत होता.रशीयन बोक्याच्या कथा कधीतरी वाचल्या होत्या.थोडसं धैर्य करून ही चावट कथा लिहीली आहे. आवडते का बघा.)

कथा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 9:32 pm | विनायक प्रभू

कथेमे कथा
क्या बात है.

चकली's picture

4 Mar 2009 - 9:37 pm | चकली

कथा आवडली..सिनेमा स्टाइल आहे

चकली
http://chakali.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी सिनेमा इश्टाईल, आणि सिनेम्याटीक लिबर्टीपण:
"बिचारी झुमके निकाल रही थी.झुमका पण पडला हातातून आणि त्याची फिरकी कुठे हरवली भगवान जाने.."

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मेघना भुस्कुटे's picture

4 Mar 2009 - 11:23 pm | मेघना भुस्कुटे

आयला! आहे खरा सायंटिश्ट दिमाग! रामदासकाकांच्या गोष्टीत तुला असल्या चुका शोधायची शुद्ध राहते, म्हणून तू खरी सायंटिश्ट.
काका, गोष्ट आवडली.
(पण दोयुग्माची गोष्ट कधी लिहिणार?)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 9:52 pm | बिपिन कार्यकर्ते

ओ रामदासचिच्चा........ क्या रंगीन तुम तो.... क्या ष्टोरी लिक्खी मियाँ..... एकदमीच मार डाला....

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

5 Mar 2009 - 1:37 am | घाटावरचे भट

ऐसेच बोल्ता मियां....

अवलिया's picture

5 Mar 2009 - 8:29 am | अवलिया

अपुन बी यहीच बोल्ता है

--अवलिया

संदीप चित्रे's picture

5 Mar 2009 - 8:01 pm | संदीप चित्रे

तुम्हारी कथा आवडी बोले ते आवडीच एकदम

कल्पना मोठी गमतीदार आहे.

सहज's picture

5 Mar 2009 - 6:59 am | सहज

एकदम आवडली कथा.

अवांतर - बिल्ला क्रमांक २२ला दिलेली सुपारी आठवली. वाचताय का मालक?

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2009 - 9:46 am | पिवळा डांबिस

झालं!!!
भेटले!!!!!!
मिपावरचे "आनंद साधले"!!!!!!!!!

"सॉरी सॉरी "बोलत लागला तिला चाचपायला.
ई..ई..कहा हात लगाते हो.बन्नो ओरडली .
"अरे फिरकी गिरेगी तो पैले इधरीच स्टॉप है ना उसको" शोहर म्हणाला.
आयला!! मस्त!!!!!!!!!!!!!!
:)
(आयला, ही बन्नो बाई आहे का पुरण-पाव!!! आपल्या शोहरलाच असं म्हणते!!!!!:))

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2009 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे

भारीच कथ्थुकली.
ह्यो चाचा लईच चावट दिसतोय. हॅहॅहॅ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दत्ता काळे's picture

5 Mar 2009 - 11:05 am | दत्ता काळे

मस्तच ! एक नंबर कथा!

दत्ता काळे's picture

5 Mar 2009 - 11:07 am | दत्ता काळे

चाच्यांची पुढची गोष्ट ऐकायची उत्सुकता आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2009 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

एकदम 'भरो मांग मेरी भरो' आठवले. मस्त खुसखुशीत लिखाण ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 2:49 pm | विजुभाऊ

बरोबर बरोबर रे परा.

मिपावरचे "आनंद साधले"!!!!!!!!!
- बरोब्बर आहे.

प्रसंग डोळयासमोर उभा केलात, फार सुंदर.

अमोल नागपूरकर's picture

5 Mar 2009 - 4:09 pm | अमोल नागपूरकर

बहोत खूब चाचाजान !

उदय ४२'s picture

6 Mar 2009 - 4:14 pm | उदय ४२

साधले हो तुम्हाला!
रामदासाने अशी कथा लिहावी....मना सज्जना..!

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2013 - 7:07 pm | टवाळ कार्टा

वरणभात श्टाईल ....थोडा मसाला येऊध्या की ;)

NAKSHATRA's picture

27 Jan 2021 - 6:22 pm | NAKSHATRA

खुपच छान

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Feb 2021 - 5:44 pm | चेतन सुभाष गुगळे

हा इब्लिस म्हणजे तोच का तो नंदूरबारचा खाटीक?