"मराठी अमेरिकन्स" हा लेख/चर्चा वाचत असताना एक लिहायचा ठरवलेला पण बाकी व्यस्तपणामुळे लिहायचा राहीलेला चर्चा प्रस्ताव परत डोक्यात आला.
दोन एक आठवड्यांपुर्वी मी ५-६ दिवसांसाठी भारतात गेलो होतो. या वेळेस काँटीनेंटल एअरलाईनचे नॉनस्टॉप न्यू अर्क (नेवार्क) न्यू जर्सी ते मुंबई असे विमान पकडायचे होते. बॉस्टन ते न्यू अर्क हे पण काँटीनेंटलने प्रवास केला त्यात काही विशेष आढळले नाही. म्हणजे "कस्टमर सर्व्हीस" वगैरे नेहमीप्रमाणे होती. वेगळे काहीच नव्हते. वरकरणी का होईना पण मैत्रीपूर्ण आणि मदत करणारी सेवा होती.
मुंबईला येणार्या विमानाच्या गेट जवळ मी जेंव्हा आलो, तेंव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सोडल्यास बाकी भारतीयच होते. सगळा गजबजाट चालू होता, जसा कुठल्याही जागा भरलेल्या विमानाच्या बोर्डींगपाशी असेल असाच. मात्र बोर्डींगची वेळ आली आणि ती बाई (अभारतीय, कदाचीत साउथ अमेरिकेतील असावी) निवेदन करू लागली. निवेदन कसले, गर्जनाच होत्या त्या! त्यात कधीही ऐकल्या नाहीत अशा सुचना ती देत होती. उ.दा.
हे सगळे ऐकताना माझे डोके फिरले. माझ्याजवळ दोन गोरे अमेरिकन्स उभे होते ते पण हसत होते. मी त्यांना म्हणले देखील की मला एकदम किंडर्गार्टनमधे असल्यासारखे वाटत आहे...माझी काही चूक नसताना असले बोलणे मी का ऐकायचे असा प्रश्न पडला होता आणि म्हणूनच मला नंतर त्यासंदर्भात तक्रार कराविशी वाटली आणि करणार आहे.
मात्र नंतर जेंव्हा मी पाहीले तेंव्हा लक्षात काय आले? इतके सांगूनही काही देशबंधू त्याच चुका करत होते. एका पेक्षा जास्त बॅग घेणे, मधे घुसणे मग तेथील स्टाफने तिकीट सीट क्रमांक पाहून मागे जायला सांगितले की मग ऐकणे इत्यादी. अगदी माझ्यापुढेपण घुसले, तेच भारतात आल्यावर कस्टमच्या तेथे.
मग विमानातपण तेच पट्टे बांधायला , टेकऑफ/लँडींगच्या वेळेस खुर्च्या रेललेल्याच, आणि हवेत टर्ब्युलन्स आहे म्हणून तात्पुरते जागीच बसा म्हणले की उठून तेंव्हाच रेस्टरूम/टॉयलेट वापरयला जाणार...
मग वाटले की ही बाई कदाचीत असे दरोज बघत असावी आणि त्यामुळे तसे बोलायला लागली तर त्यात काय चूक? अर्थात माझ्या लेखी तरी देखील चूक होतीच कारण जर कोणी नीट वागत नसेल तर त्यांना शक्यतोवर तसे नक्की झाल्यावर व्यक्तीगत सांगणे महत्वाचे (उ.दा. सीट नंबर जाहीर होण्याआधी कोणी घुसले तर त्यांना बाजूस होयला सांगता येते आणि ते ते करत होतेच). जेंव्हा एक विमान ज्यात सुमारे चारशे सीट्स आहेत ज्या केवळ भारतीयांनी भरून त्या विमानास जवळपास अर्धामिलीयन्स डॉल्सर्सच्या वर रेव्हेन्यू मिळवून दिला त्यांना असे सुनवण्याचा हक्क कोणाला आणि का? त्यात जे माझ्यासारखे इतरही होते जे नियमाप्रमाणे वागत होते त्यांनी असले का ऐकायचे?असे जर इतर कुणाबद्दल झाले तर ते ऐकून घेतील असे वाटते का? तरी देखील कुणालाच काही वाटत होते असे वाटले नाही..
तर यात आता मी कुणाची तक्रार करणे बरोबर आहे? आगाऊपणे सुचना देणार्या काँटीनेंटलच्या कर्माचारी महीलेबद्दल, किमान नियम न पाळणार्या भारतीयांबद्दल का तसे नियम पाळणार्या अथवा न पाळणार्या भारतीयांना या वागणूकीसंदर्भात काहीच न वाटणार्या मनोवृत्तीबद्दल?
- "गडबड करू नका, सर्वांना जागा आहे."
- "कॅरीऑन बॅग फक्त एकच घेऊन जाता येईल, मी परत सांगते एकच घेऊन जाता येईल हे लक्षात ठेवा, परत सांगते, एकच घेऊन जाता येईल..."
- " आता मी बोर्डींग करायला नंबरप्रमाणे बोलावणार आहे, प्रत्येकास जागा आहे तेंव्हा गर्दी करायची नाही, जेंव्हा तुमचा नंबर येईल तेंव्हाच येयचे. परत सांगते तुमचा नंबर आलाकीच... तर आता सीट क्रमांक ३५ ते ४५ मधील प्रवासी, म्हणजे ३५,३६,३७,...४५ मधील प्रवासी. परत सांगते बाकी कोणी नाही..."
वाचने
6249
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी कधी
सहमत . .
बाथरूम आहे
In reply to सहमत . . by सुक्या
बाथरुम्स?
In reply to सहमत . . by सुक्या
एस.टी. स्टँड??
In reply to बाथरुम्स? by नाटक्या
वास्तवीक
In reply to एस.टी. स्टँड?? by प्रभाकर पेठकर
हेच
In reply to वास्तवीक by विकास
होय..
In reply to हेच by अनामिक
:)))
In reply to बाथरुम्स? by नाटक्या
नाही हो...
In reply to :))) by टिउ
प्रवासीच
In reply to नाही हो... by अनामिक
मदत करावी...
आम्हालाही
माझा अनुभव
In reply to आम्हालाही by रेवती
अरेच्च्या!
In reply to माझा अनुभव by विकास
असाच अनुभव
आणि air hostess पण
In reply to असाच अनुभव by लंबूटांग
एअर होस्टेस बद्दल
...
In reply to एअर होस्टेस बद्दल by मुक्तसुनीत
व्यक्तिगत
In reply to ... by लंबूटांग
हे
मराठी लोक
In reply to हे by त्रास
अगदी खरे.
In reply to मराठी लोक by अनामिक
अजून एक
जर कुणीच
एक अनुभव---
एका
खरे आहे...
In reply to एका by मराठी_माणूस
अमेरिका