✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!

छ
छोटा डॉन यांनी
Tue, 02/17/2009 - 20:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13932 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

धोत-याला

शंकरराव
Tue, 02/17/2009 - 20:10 नवीन
धोत-याला कधी गुलाब येत नाही कव्यस्पर्धा घेउन समस्यापुर्ती होत नाही अजुन सुचेल तस.. वेळ मिळाल्यावर टाकू
  • Log in or register to post comments

बेगॉन/ डायझोन्/टीक२०

विजुभाऊ
गुरुवार, 02/19/2009 - 19:53 नवीन
बेगॉन/ डायझोन्/टीक२० सगळे एकदम वापरुन पाहिले कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो हात पाय हलत रहतात अधुनमधुन पंख फडफडतो जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही तु काहीही कर पोसलेला नेता आहे मी इथल्या सगळया समाजाच्या नामर्दगानीवर कुरतडत राहीन अंधारात तुलाच. जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर आणि माज करेन त्यावरच. तूच शेवटी हरणार आहेस मी असाच आहे शतकांपासुन तु ही असाच आहेस शतकांपासुन सोशीक आणि सहनशील निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना आम्ही दाद देत नाही. हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही या उपायांनी काही होत नाही, आमची जाड कातडी कशालाच दाद देत नाही हे ठाउक आहे म्हणुन ती काही उमेद हारत नाही ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव

थीम मस्त आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 02/19/2009 - 20:05 नवीन
जरी आमच्या विषयाशी संबंधीत नसले तरी कवितेत व्यक्त झालेले विचार आणि काव्याची थीम मस्त आहे ... सुरेख हो विजुभाऊ ...! ------ ( निगरगट्ट स्वयंघोषीत नेता ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पहिला प्रयत्न

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 20:13 नवीन
"मी तिला सा॑गीतले की मी झोपेत घोरतो " "ती म्हणाली तु जाउन डॉक्टरला का विचारत नाही " या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

पूर्वीची

लिखाळ
Tue, 02/17/2009 - 20:34 नवीन
पूर्वीची स्थिती - वाढदिवस विसरलो तिचा केली इतर मुलींशी सलगी म्हणाली मनमिळाऊ तू त्या तर तुझ्या बहिणी व्हॅलेंटाईनला दिले फूल पिवळे आणि चॉकलेट डेला किटकॅट म्हणाली चल मारु गप्पा कॉलेजच्या फाटकात समजून चुकलो मी आता ती काही बधत नाही या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! सध्याची काल्पनिक स्थिती :) बराच विचार केला अन लिहिले मिपावरती आताच पाहिले आली ती घेऊन नवा आयडी उपायाबद्दल विचार चालू आहे.... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 20:48 नवीन
डाणराव बंगलोरी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ह्या ओळी खरडतोय. आस्वाद घ्यावा. १ घेऊन ये तिला आपल्या ढोसरीला, पाय लाऊन पळेल तिच्या पाठीला. २ तुझ्या डोळ्यांची नशा लय मस्त आहे, पण त्याहून शिवास रिगलची रंगत लय जास्त आहे. ३ कोण तू तुझं नाव आठवत नाही, किती डोकं खाजवलं काही सुचत नाही, काल पासून प्यायलो नाही, बहुदा म्हणूनच काही स्मरत नाही. ४ मी आहे छोटा डॉन, मोठी आहे माझी मान, जास्त मागे लागून नकोस, गरम करीन तुझा कान. ५ किती आल्या किती गेल्या, त्यात आता तुझी भर पडली, तुला पाहून असं वाटतं, का ही आयुष्यात कडमडली. ६ जाऊ दे गं मला, नको मागे लागुस, दारू पितान चकणा संपल्यासारखी नको वागूस. आता तुझ्या ओळी घेऊन या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! दारूचं पण असंच असतं, किती आणली तरी पुरत नाही. या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! आज काल डाण्याला झालंय काय? देशी सुद्धा चढत नाही... या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही.
  • Log in or register to post comments

धन्य आहात ...!

छोटा डॉन
Tue, 02/17/2009 - 20:52 नवीन
_/\_ ऍडीमहाशय, धन्य आहात आपण ...! ह्याबद्दल आपल्याला आमच्याकडुन "एक लिटर दुध व सव्वाशे ग्रॅम कंदी पेढे" लागु, भेटल्यावर देतो व वरुन भाजलेली बडीशेप खाऊ घालतो.
जाऊ दे गं मला, नको मागे लागुस, दारू पितान चकणा संपल्यासारखी नको वागूस.
=)) =)) =)) खल्लासऽऽऽऽ ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

+१

ब्रिटिश टिंग्या
Tue, 02/17/2009 - 21:27 नवीन
एड्याभौ लै भारी! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! लष्कर-ए-खरडाने धडा शिकवला तरीही , उच्चभ्रू अहंकार सोडत नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा.

शितल
Tue, 02/17/2009 - 21:37 नवीन
>>लष्कर-ए-खरडाने धडा शिकवला तरीही , उच्चभ्रू अहंकार सोडत नाही! =)) डॉन्या, ह्या टिंग्याला ४ दिवस तुझ्याबरोबर ठेव, मग बघ तिने तुला दुरून बघितले तरी काळा गॉगल लावुन रस्त्याच्या कडे कडेन निघुन जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

+१

दशानन
Wed, 02/18/2009 - 07:54 नवीन
शितल चा उपाय जबरा आहे.... ट्राय कर रे डोन्या ! * बाकी एडी भाउ धन्य आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

लफडं करणं

संदीप चित्रे
Wed, 02/18/2009 - 21:56 नवीन
>> या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही. या ओळी मस्त जुळल्या आहेत ऍडी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

अवांतर

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 20:49 नवीन
आपल्या सौम्याचं काय झालं रे?????????????
  • Log in or register to post comments

ऑ?

ब्रिटिश टिंग्या
Tue, 02/17/2009 - 22:19 नवीन
>> आपल्या सौम्याचं काय झालं रे????????????? आपली सौम्या :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

सही ...जोशीसाहेब..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 21:00 नवीन
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही. स॑ प लो... सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

माझा ७

अमृतांजन
Tue, 02/17/2009 - 21:30 नवीन
माझा ७ वेळेचा अनुभव असा आहे की, काही प्रश्न/ई. विचारावे लागतात- १. तुला बहीण आहे का असे विचारणे २. सतत तिला अवघड जाणाऱ्या विषयांबद्दल बोलत राहणे व त्याबद्दल प्रॉब्लेम विचारत बसणे ३. पर्स विकत घेउन तिला विचारणे, तुला आवडली का ग? आज किनै एका माणसाचा बर्थ्डे आहे ४. खूप जोरात चालणे- बरोबर असल्यास आणि सतत सांगणे, किती हळू चालतेस ५. तिच्या कपड्यांवर सतत टिका करणे ६. तुला आयुष्यात काहीही मदत लागली मला सांग बरका, मी धाऊन येईन, असे म्हणणे ७. मला सैन्यात भरती व्हायचे आहे असे सांगणे ८. मी अजुन ४ वर्षे तरी शिकणार आहे, नोकरी-बिकरीचा विचार नाही असे सांगणे ९. ढासळत्या समाजव्यवस्थेबद्दल, संकुचित राजकारणावर, क्रिकेट्वर सतत चर्चा करणे १०. सुहागरात्री मांजर मारणे ही कथा माहीत असल्यास त्यास्वरुपाची कथा सांगणे ११. ई
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Tue, 02/17/2009 - 21:34 नवीन
क्रमांक ३ आणि ६ लै भारी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन

मस्तच १

बाकरवडी
Tue, 02/17/2009 - 21:45 नवीन
मस्तच १ णंबर येउद्या अजून ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन

११. आमच्या

अमृतांजन
Tue, 02/17/2009 - 22:26 नवीन
११. आमच्या घरी आईच्या म्हणण्यापुढे कोणाचे ढिम्म चालत नाही असे सांगणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी

ह्या

अमृतांजन
Tue, 02/17/2009 - 22:33 नवीन
ह्या सगळ्यासाठी एक एकाच वाक्याचा रामबाण उपाय आहे पण तो वाचून मिसळपाव खातांना जोरदार ठसका लागेल. त्यामुळे इथे नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 21:48 नवीन
मला सैन्यात भरती व्हायचे आहे असे सांगणे ह्या कारणावर माझ्या एका मित्राने कितीतरी जीवघेण्या प्रसंगांतून सुटका करून घेतली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन

प्रयत्न

सिद्धेश
Tue, 02/17/2009 - 21:47 नवीन
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! अगं नेतेसुद्धा खुर्ची उबवायची इतकी जिद्द धरत नाहीत..... या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! बॉलीवूडवाले बघ दररोज घेऊन फिरतात नवीन बाई...... या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! तुज्या मायला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही........ आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
  • Log in or register to post comments

अरे भाग्यवंता...

प्रभाकर पेठकर
Tue, 02/17/2009 - 21:57 नवीन
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! (पण मला समजत नाही) तिला नाकारण्याची तूच उमेद का हरत नाहीस? एकदाची तिला आपली (म्हणजे तूझी होऽऽ!) का म्हणत नाहीस? अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येऊनी, देती आलींगन चुंबुनी, तेच पुरूष भाग्याचे. (बाकी सर्व दुर्भाग्याचे) दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

डॉन्याचे

अनामिक
Tue, 02/17/2009 - 22:13 नवीन
डॉन्याचे मनोगत खालच्या (ट ला ट जोडून केलेल्या) कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे....... ****************************** ऐक मित्रा सांगतो, तुले माही गोष्टं पोट्टी लागली मागे, पण हाये लई खाष्ट काय म्हणतो? सांगू तुला ति हाय कशी... रंग्याची कविता वाच, वाटंल म्हैसचं जशी म्हणली मला ति, तिचा माह्यावर जडला जीव ऐकुन तिचे शब्द, माही मलाच आली किव आता जवा तवा मला ति करत र्‍हायते फोन सारकं वाट्टे लावाव्या तिच्या कानाखाली दोन रागात येवून मी तिला येकदा सांगीतलं तसं पण माहा हात वाट्टे तिला जशी मोराची पिसं ति दिसली की आजकाल मी बदलतो वाट माही पर ति येतेच माह्या मागं कारण काढून काही येकदा तिच्यादेखत तिच्या बहिणीला मारला डोळा तर म्हणते कशी मला 'तू येडा की खुळा' म्हणलं नको मागे लागू माह्या, मी न्हाई सोम्यागोम्या पर तिला मात्र वाटे, ति माझी सौम्या मी तिचा गोम्या कंटाळलो तिला सांगून 'बाई माहा पिच्छा सोड' पर मेल्याशिवाय जित्याची कधी जाते का खोड? म्हणे मला ति... जल्मभर देईल माही साथ राहु सोबत आपण दोघं जसे चुन्ना आणि काथ हा इचार करुन माह्या काळजात होते धस्सं आता उरलेलं आयुष्य मी जगुतरी कसं? काय काय न्हाई केलं, पर ति दुर काई जाईना माह्यासाठचा आनंद तिच्या मनात काई माईना लै केलेत उपाय, या उपायांनी काही होत न्हाई, खरं हाय तिचं प्रेम, ती काही उमेद हारत न्हाई ...! ****************************** -अनामिक
  • Log in or register to post comments

मस्त रे ...!

छोटा डॉन
Tue, 02/17/2009 - 22:17 नवीन
एकदम सुरेख काव्य "अनामिकभाऊ", सह्ही है ..! मज्जा आली, आभारी आहे ...! असेच अजुन येऊ द्यात ..! :) ------ ( भलताच खाष्टं ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

मस्त कविता...

प्रभाकर पेठकर
Tue, 02/17/2009 - 22:22 नवीन
व्वा! मस्त जमली आहे कविता. लईच वरिजनल. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

जबराट रे अनामिका!

चतुरंग
Tue, 02/17/2009 - 22:30 नवीन
छुपा रुस्तुम आहेस की! कविता मस्तच झालीये! :) अजून येऊदेत!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आमची परतिभा

अवलिया
Tue, 02/17/2009 - 22:57 नवीन
हे तू नीट समजुन का घेत नाही कसं तुला काहीच समजत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याबरोबर मला राहवत नाही ! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! अगदी सहज आवडते का विचारतेस, भावना माझ्या तुला का जाणवत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याबरोबर मला करमत नाही ! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! तू जवळ असलीस की खायला उठतं, कशातच लक्ष माझं लागत नाही ! एवढही तुला कसं कळत नाही, तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ नाही ! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! मात्र कधी कधी असं वाटतं , तू दाखवतेस तुला समजत नाही ! भावना माझ्या चांगल्या तु जाणतेस, पण मुद्दामच तू मला सोडत नाही या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! भेटण्याने आता काही होणार नाही, मी तुझ्याबरोबर क्षणही जगणार नाही ! व्हावा वियोग ही तर देवाचीच इच्छा, त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! तुझं नि माझं विळाभोपळ्याच नातं, हा काही आज उद्याचा खेळ नाही ! तुझाच मी आणी माझीच तू, असं स्वप्नातही शक्य होणार नाही ! या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तू हे समजुन का घेत नाही... या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! --अवलिया भेटण्यासाठी तुला तैयार होतो पण तुझे फर्मान आले, साद नाही
  • Log in or register to post comments

अरे वा!

विसोबा खेचर
Tue, 02/17/2009 - 22:27 नवीन
अरे वा! धागा अंमळ मजेशीर! :) आमचं तत्व - आली अंगावर, घेतली शंगावर! :) आपला, (सांड) तात्या. बाय द वे डॉन्या, भानगड काय आहे? सांभाळ रे बाबा..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

आँ ऽऽऽऽ

छोटा डॉन
Tue, 02/17/2009 - 22:36 नवीन
>>आली अंगावर, घेतली शंगावर! तात्यानु, ही "शंगावर" काय भानगड आहे हो ? इथे मला २ शक्यता वाटतात , शिंगावर किंवा अंगावर , कसेही चालेल ;) पण नकोच ..! ;) >>बाय द वे डॉन्या, भानगड काय आहे? सांभाळ रे बाबा..! =)) काही नाही हो, जरासा अंमळ विरंगुळा चालु आहे. टेन्शन नाही जास्त ...! ------ ( मजेशीर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

इथे मला २

विसोबा खेचर
Tue, 02/17/2009 - 22:43 नवीन
इथे मला २ शक्यता वाटतात , शिंगावर किंवा अंगावर , कसेही चालेल येस्स! कसंही चालेल! बाय द वे, अंगावर आली तर फारच बरं! स्थूलपणमुळे स्वत:हून अलिकडे श्रम जरा कमीच होतात! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

स्थूलपणमु

अवलिया
Tue, 02/17/2009 - 22:44 नवीन
स्थूलपणमुळे स्वत:हून अलिकडे श्रम जरा कमीच होतात पलिकडे करुन बघा.... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

रोडरोमियो

त्रास
Wed, 02/18/2009 - 08:49 नवीन
रोडरोमियो च्या ध्याग्यावर हिरिरीने मते देणारे कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

करेक्ट ...!

छोटा डॉन
Wed, 02/18/2009 - 08:53 नवीन
अगदी करेक्ट ...! म्हणलं तर हा "रोडरोमियोगिरी"चाच प्रकार, फक्त इथे व्हिक्टीम एक "स्त्री" नाही व ( अजाणतेपणी ! ) त्रास देणारे अनोळखी नसुन ओळखीचे व चांगल्या संबंधातले आहेत. बाकी त्राससाहेबांनी जे काही गॄहीतक लावले त्याच्याशी सहमत आहे. कॄपया ह्या परिस्थीतीत इतर मान्यवरांनी त्यांची मते मांडावीत ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

डॉनराव

सहज
Wed, 02/18/2009 - 10:56 नवीन
धागा अंमळ मजेदार कल्पनाविलास आहे. जर का कल्पनाविलास नसेल तर सोपे काम म्हणजे त्या व्यक्तिला हा धागा दिसेल अशी व्यवस्था करवणे. अजुन एक सल्ला - जोवर कुठे मॅटर सेटल होत नाही तोवर असु दे की नाहीतरी तुम्हाला इतर "बहिणीबरोबर" जाउ देतेय ना. मग प्रॉब्लेम काय हाय? अनुभव एक मोठी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हाण्ण तिच्याआयला!

धमाल मुलगा
Wed, 02/18/2009 - 13:51 नवीन
काय च्यायला कवटी चालते एकेकाची!! भले बहाद्दर रे :) बाकी, आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ.हे.वे.सां.न.ल. पण तरीही तुमच्यासाठी एखादा प्रयत्न करुन पाहतो ;) तिचा मला वीट येतो हे तिला कळत नाही, फटकन तोडणं मला काही जमत नाही... मग मी करतो फोन बंद, उपसुन टाकतो मोडेमच्याही तारा ... रिती बाटली उशाशी, झोपतो तसाच उपाशी, या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ...! स्वप्नांतसुध्दा येत राहते, क्षणोक्षणी भिवविते! आता तर दारुसुध्दा चढत नाही, मांडलेला हा छळ सुटत नाही! या उपायांनी काही होत नाही...या उपायांनी काही होत नाही! ती काही उमेद हारत नाही ...!!! **************************************************** च्यायला, कविता म्हणता म्हणता हे काय होऊन बसलं? शहाण्यानं उंटाच्या शेपटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जाऊ नये हेच खरं. बाकी, ते प्रथितयश कवी अन् काय काय म्हणताहात त्यांनी इकडं पाहीलं नाही म्हणून गळे कसले काढता? तुमची लायकी ती काय? तुम्ही धागे ते काय काढता? अहो, जरा उच्चभ्रु व्हा, तुमच्या शब्दाला वजन मिळू दे, मग पहा धागा काढल्याकाढल्या कसे छप्पन प्रतिसाद पडतात... ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

प्रथितयश

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 14:04 नवीन
>>बाकी, ते प्रथितयश कवी अन् काय काय म्हणताहात त्यांनी इकडं पाहीलं नाही म्हणून गळे कसले काढता? खरे आहे .. प्रथितयश कवी जरी नाही आले तरी प्रथितयश विडंबक बनण्याची स्वप्ने बघणारे आले आहेत वर आयडी बदलुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा

शितल
Wed, 02/18/2009 - 18:31 नवीन
>>>स्वप्नांतसुध्दा येत राहते, क्षणोक्षणी भिवविते! =)) हॉरर शो पाहुन झोपत जाऊ नकोस. ;) अरे वा, धम्या देखिल एक सुसाह्य कवि आहे की. ;) डॉन्या, बघ तुझ्या एका उमेदीने किती जणातील कविला हाक दिली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

यंट्री

विनायक प्रभू
Wed, 02/18/2009 - 17:08 नवीन
आपली यंट्री व्यं. नी. मधे. बघा जमली आहे का डॉनराव
  • Log in or register to post comments

हितं पब्लिश करा

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 17:09 नवीन
हितं पब्लिश करा .. अडचण असेल तर * टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

यक्कच नंबर ...!

छोटा डॉन
Wed, 02/18/2009 - 17:12 नवीन
काय ??? तुम्ही "*" टाका म्हणताय ? नाय जमणार, तुम्ही काय "*" सोडुन नुसती क्रियापदे वाचणार काय ? कर्म, सर्वनाम वगैरे नको का ? बाकी कविता झ्याक्क आहे ... ;) ------ " * "छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अहो

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/18/2009 - 17:16 नवीन
बाकी कविता झ्याक्क आहे ... Wink अहो डानराव, मग आमालाबी द्या की वाचाला ... आंद्याशेट, लोकं इतरांचं लिखाण, प्रतिसाद आपल्या नावावर खपवतात. तुम्ही वर एक लंबर कविता लिहून सही भलत्याच टुकार नावानं केलीत! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अहो

अवलिया
Wed, 02/18/2009 - 17:19 नवीन
अहो डानराव, मग आमालाबी द्या की वाचाला ... डान राव म्या पन ह्येच बोल्तो..... परभु एकतर इथे टाका नाही तर व्यनी करा... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे

विनायक प्रभू
Wed, 02/18/2009 - 17:22 नवीन
इथे टाकु शकत नाही. टँगुळ नको मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

व्यनी करा

अवलिया
Wed, 02/18/2009 - 17:23 नवीन
व्यनी करा मी ख व मधे लावतो... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

प्रभुजी ..!

छोटा डॉन
Wed, 02/18/2009 - 17:24 नवीन
>>डान राव म्या पन ह्येच बोल्तो..... आंतरजालीय इतिहासातली अजरामर हाक ... " ( प्रभु ) काका, मला वाचव ..!" बाय द वे, आपण अशा गप्पा कम प्रतिसाद देत बसतो व काही "जागरुक" लोक ह्यालाच "कंपुबाजांचे प्रतिसाद वाढवणे" म्हणतात ... आहे की नाही डोक्याला शॉट ??? एक तर प्रभुमास्तरांकडुन व्यनीने कविता मागुन घ्या अथवा त्यांची परवानगी घ्या, मग मी तुम्हाला व्यनीने पाठवतो .. पण ही सो कॉल्ड कंपुबाजी ताबडतोब बंद करा ... ;) ------ ( १ नंबरचा कंपुबाज ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

उगाचच

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 17:26 नवीन
उगाचच प्रतिसाद देतोय. तिरका प्रतिसाद छान दिसतो म्हणुन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/18/2009 - 17:28 नवीन
मी पण! ;) बाय द वे.....कालपासुन मी +१, सहमत, असेच बोल्तो असे प्रतिसाद देणे बंद केले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हा हा हा

शितल
Wed, 02/18/2009 - 18:25 नवीन
>>उगाचच प्रतिसाद देतोय. तिरका प्रतिसाद छान दिसतो म्हणुन !! =)) ह्याला काम नाही वाटते आज. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आंतरजालीय

अवलिया
Wed, 02/18/2009 - 17:29 नवीन
आंतरजालीय इतिहासातली अजरामर हाक ... " ( प्रभु ) काका, मला वाचव ..!" ठ्ठो !!!! =)) बाय द वे, आपण अशा गप्पा कम प्रतिसाद देत बसतो व काही "जागरुक" लोक ह्यालाच "कंपुबाजांचे प्रतिसाद वाढवणे" म्हणतात ... म्हणु द्या हो... त्यांचा कंपु कमी पडत असावा आहे की नाही डोक्याला शॉट ??? त्यांच्या डोक्याला असेल तर आहे. पण प्रश्न अजुन एक उभा रहातो? जावु द्या एक तर प्रभुमास्तरांकडुन व्यनीने कविता मागुन घ्या अथवा त्यांची परवानगी घ्या, मग मी तुम्हाला व्यनीने पाठवतो .. पण ही सो कॉल्ड कंपुबाजी ताबडतोब बंद करा ... लै भारी ... दमबाजी लै भारी... पाध्यांचे दगड संपले मला मारुन म्हणुन तुम्ही बोलत आहात.... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

परवानगी

विनायक प्रभू
Wed, 02/18/2009 - 17:41 नवीन
परवानगी दिली. मला कट पेस्ट जमत नाही. म्हणुन फकत अवलियाला टंकली. त्यांनी १८ वर्षे पुर्ण केलेल्या वाचायची इच्छा असलेल्या सदस्याला ती व्य. नी. करावी. हो नाही तर पाध्ये रागावतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा