(झुलवा)

केशवसुमार's picture
Login or registerto access quick links.

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा

रात्रीला पोरांना निजवा
बेत जरा मग जंगी घडवा

तुमची गोची, त्यांची वळवळ
काय करावे लवकर ठरवा

कुणीच येईनासे झाले!
अहो जरा जोराने हलवा

नसे पाहण्या कोणी आता
जरा दमाने खिंडी लढवा

बाई, बाटली आणिक आम्ही
युगायुगाचा चालू झुलवा...

"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत

त्यांची गोची पाने पिकली
देठ तरी वळवळतो हिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
दमलो, थोडे पडतो अडवा...

वा रे गड्या...

केशवा,कधी कोणी कविता लिहीली की तू गिधाडासारखा त्याच्यावर तुटून पडतोस रे!
बाकी तूझ्या कल्पनाशक्तीचीही दाद द्यायला हवी.द्वयर्थी मराठी म्हणजे काय हे (दादांनंतर)तूझ्या विडंबनानेच सांगीतले.

(झकास) -इनोबा

हा हा हा

जबरदस्त!!! ह. ह. पु. वा!!!

ऋषिकेश
------------------
तुम्ही शब्दांचा प्रतिकार अपशब्दांनी करत नाही? छ्या! स्वाभिमानी कसे म्हणवते तुम्हाला?

लै भारी...

लै भारी रे केशवा!

तुमची गोची, त्यांची वळवळ
काय करावे लवकर ठरवा

हा हा हा! Smile))

नसे पाहण्या कोणी आता
जरा दमाने खिंडी लढवा

क्या बात है....!

"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

थांब केश्या, आता भारतात आलास की साल्या बडवतोच तुला लेका! Smile

असो, उत्तम विडंबन रे केशवा. ईश्वर इतरांना अगदी भरपूर गझला द्यायची प्रतिभा प्रदान करो जेणेकरून तुला कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही...Smile

तात्या.

मस्त रे !!!

आवडले विडंबन !!!

आणि कळस म्हणजे-
"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

हे तर सहीच आहे Smile

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हहगबलो

मस्त आहे.
"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

हे तर फारच भारी.

--
ध्रुव

--
ध्रुव

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

केशवसुमार

केशवा..

पुन्हा एकदा.. तुझा महिमा अगाध..
तुझ्या कल्पनाशक्तीची कमाल आहे.
जरा जपून बरं.. नाहीतर खरंच एकेदिवशी हे सगळे गझलकार तुला बडवतील्. ह्.घ्य.

- प्राजु.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

प्राजु

प्राजु तुझा ह्यावर एक मुलगी असुन प्रोत्साहनपर प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटते.

केशवा,

त्यांची गोची पाने पिकली
देठ तरी वळवळतो हिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
दमलो, थोडे पडतो अडवा...

केवळ उच्च!!

चतुरंग

अश्लिल

खुपच अश्लिल विडंबन आहे. इथे अनेक महिला सदस्यही येतात. त्यांना अप्रशस्त वाटेल असे लिखाण कृपया करू नये.

नोंद घ्यावी..

अश्लील या शब्दाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत/असू शकतात.

असो, विडंबनकार केशवाने स्वाती यांच्या म्हणण्याची भविष्यात सारासार नोंद घ्यावी...

मिसळपावला केशवासारख्या प्रतिभावंताचीही गरज आहे आणि स्वातीताईंसारख्या चोखंदळ व प्रसंगी परखड, वाचकाचीही गरज आहे!

आपला,
(तटस्थ) तात्या.

मला व्यक्तिश: सदर विडंबन वाचताना मजा वाटली...Smile

आपला,
(वाचक) तात्या.

अश्लिल??

स्वातीमहेशताई,
आपल्याला हे विडंबन अश्लिल वाटले हे वाचून आम्हाला वाईट वाटलं.. शील / अश्लिल हे व्यक्तीसापेक्ष आहे. हा ते इनोबाशेठ म्हणतात तसे द्वयर्थी म्हणू शकता..
इथे आमच्या डॉनच्या एका मुलाखतीतला संदर्भ देतो ..अता हे डॉन कोण (छोटा/मोठा/खरा/खोटा) विचारू नका... हम 'सबका डॉन एक'- 'दादा कोंडके'
'पाप हे वाचणार्‍याच्या मनात असतं मी लिहीताना सरळच लिहितो.. '
असो.. सपषट सांगितल्या बद्दल आभारी आहे इथून पुढे लक्षात ठेवतो..
केशवसुमार.

जबरा......

परंतु, आम्ही या वर्षी द्वैअर्थी न बोलण्याचा संकल्प 'सोड'लेला असल्याने यापेक्षा जास्त मोठा प्रतिसाद देउ शकत नाही. Wink

आपला,
(द्वैअर्थी न बोलणारा) छोटी टिंगी

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

वा वा

वा रे केशवा!

आज खूप दिवसांनी मिसळपावावर आलो. आणि तुझी झणझणीत तर्रि चापली. मजा आली.

आपला,
(हावरट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

( फिर पलट आयी है, सावन की सुहानी रातें..... फिर तेरी याद में, जलने के ज़माने आये!.....)

© 2011 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy
Scroll to Top