दिवाळी अंक २०२५ - आवाहन
आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत.
दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत.
लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे. पीडीएफ रूपात किंवा स्कॅन केलेले हस्तलिखित कृपया पाठवू नये.
दर वर्षी तेच तेच नियम आणि अपेक्षा लिहून नेहमीच्या मिपा सदस्यांना त्या पाठ झाल्याच असतील, तरीही खाली चोप्य पस्ते (copy-paste) करत आहोत -
दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
लेख पाठवण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२५.
आम्हालाही थोडा वेळ द्या हो पुढच्या कार्यवाहीसाठी.. अगदी शेवटच्या क्षणी लेखन न पाठवता जितके अगोदर पाठवाल, तितके उत्तम.
वाट बघत आहोत.
मिपा व्यवस्थापन
- दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
- कोणत्याही विषयावरचे तुमचे साहित्य व्य,नि.द्वारे साहित्य संपादक आयडीवर पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
- किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
- आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल, तर प्रेषक म्हणून आपला 'मिपा आयडी' लिहायला कृपया विसरू नका.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Oh आली का दिवाळी
वावावा
या अंकासाठी AI ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे.शुभेच्छांच...अजून काय?+१
AI वापरून लिहिलेल्या कथा
ह्याह्याह्या
अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून.वॉव, आपल्याच शोकसभेत श्रध्दांजलीपर भाषण करण्याचा प्रस्ताव. कसली रोम्यांटिक कल्पना. जमणार नाही आपल्याला. . तुम्ही लिव्हा. छान छानच लिहायचं असते म्हणे असलं. ते पोकळी बिकळी, पृथ्वी फिरत राहते, जातात येतात वगैरे टाईपचं विदाउट एआय लिव्हा काहीतरी. बरं वाटेल वाचून.ओके :-)
ए आय
शुभेच्छा
श्रीगलेमा नाही का यावर्षी ?
काही थीम आहे का? त्या
याच आवाहनात नमुद केल्यानुसार
एआय (कामाचा भाग असूनही)
'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या संकल्पनेला नामकरण
दिवाळी अंकाला खूप शुभेच्छा !
'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स'
संपादक मंडळ ,
दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा
संपादक मंडळ ,
चौको प्रतीक्षेत ...
कथा तयार आहे
पाठवा हो...
मला ही उशीर होत आहे.....
अवश्य. पाठवा.
लेख पाठवला आहे
इ मेल पण पाठवली आहे
धन्यवाद. साहित्य संपादक
लेख पाठवला आहे
मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेख
समदे
कधी?
उद्या प्रकाशित करु
हार्दिक शुभेच्छा.
संपादक मंडळाचे मनापासून आभार....
दिवाळी अंक २०२५ लेख दिसत नाहीत
मालक दिवाळी अंक प्रकाशनाच्या
बर, वेळ लागणारच अशा कामाला.
सर्व तयारी झाली की पूर्ण अंक
येउ द्या येऊ द्या लवकर
दिवाळी अंक आला!