पार
जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा
प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
उडोनिया पारा उरे
काच आरपार
पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा
नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस
शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली
कविता मला तरी बाऊंसर गेली ,
@ अनंत यात्री कविता आवडली.
दोन्ही कविता आवडल्या
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा-
आता विंदांनी वरून