✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दांचा अचपळ पारा

अ — अनन्त्_यात्री, Mon, 12/30/2024 - 10:57
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो

प्रतिक्रिया द्या
1181 वाचन

💬 प्रतिसाद (3)

अरे व्वा...

कर्नलतपस्वी
Mon, 12/30/2024 - 11:01 नवीन
मस्तच शब्दखेळ आहे. सुंदर, खुप आवडली.
  • Log in or register to post comments

अर्थाचा वर्ख निखळतो

प्रसाद गोडबोले
Mon, 12/30/2024 - 11:19 नवीन
अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.
  • Log in or register to post comments

सुरेख!

मनिष
Wed, 01/01/2025 - 17:31 नवीन
हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा