✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परतीचा पाऊस...

च — चक्कर_बंडा, गुरुवार, 10/03/2024 - 17:26
थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला.. परतीचा पाऊस... विजांच्या मागून जोरदार गरजला बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला मग जाताना कानात पुटपुटला... कागदाच्या होड्या सोडताना आताशा भेटत नाहीस ? पन्हाळीखाली चिंब भिजताना मुळी दिसतचं नाहीस ? अनवाणी पायांनी वाहत्या पागोळ्यांमागे धावत ही नाहीस की ओंजळीत विरघळणाऱ्या बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस इतका मोठा झालास की पावलांना गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस इतका थोर झालास की कपड्यांवर थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस.. गड्या !! पाऊस असलो ना तरी काळजातला ओलावा कमीचं पडतो माझ्या अंतरीचा एक गळका मेघ नेहमीचं तुझ्या वाटेवर दाटतो.. इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल.. थोडी का होईना, राहू दे पावलांवर चिखलमातीची ओलेती नक्षी इतक्यातचं काढून फेकू नकोस चिंब भिजलेली अलवार नाती.. स्वप्नांना उमलण्या आभाळी असू दे एक इंद्रधनुष्यी कोंदण परतीच्या पावसाला बरसण्याचे राहू दे एक अजून कारण..

प्रतिक्रिया द्या
2032 वाचन

💬 प्रतिसाद (6)

खुप सुंदर

Bhakti
गुरुवार, 10/03/2024 - 21:03 नवीन
खुप सुंदर
इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल..
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments

सुंदर अभिव्यक्ती

कर्नलतपस्वी
Fri, 10/04/2024 - 05:50 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

एक पाऊस माझ्या घरी राहून गेला आहे ...

कर्नलतपस्वी
Fri, 10/04/2024 - 05:59 नवीन
वैभव जोशी यांची कवीता आणी राहून देशपांडे यांचा आवाज याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

व्वा!! अप्रतिम

श्वेता२४
Fri, 10/04/2024 - 21:37 नवीन
कवितेची रचना व त्यातले भाव मनाला अगदी चिंब करुन गेले...
  • Log in or register to post comments

सुंदर रचना

पाषाणभेद
Sat, 10/05/2024 - 06:02 नवीन
सुंदर रचना
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिक्रिया आनंद देणाऱ्या, धन्यवाद...

चक्कर_बंडा
Wed, 10/09/2024 - 12:15 नवीन
सर्वच प्रतिक्रिया आनंद देणाऱ्या, धन्यवाद...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा