Skip to main content

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 10/05/2024 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती शाळा कादंबरी ची आठवण झाली ! किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2381
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

लेख वाचायला लागतो तोच संपला. काय वाचले काय समजले काही कळेना. मग विचार केला तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेख लिहीला आहे आतुरतेने प्रतिसादाची वाट पहात असणार. निदान एक प्रतिसाद तरी असावा म्हणून दिला. :)

हा लेख नव्हाताच, क्षमा तुमची दिशाभूल झाली असले तर फक्त माहिती / प्रसार म्हणून लिहिले मिपावर असे चालत नाही का?

जमल्यास, सिनेमा बघीन... बाय द वे , मिपावर सगळे काही चालते. फक्त, लेख किमान 7-8 ओळींपेक्षा जास्त हवा..

प्रकाश संतांची "लंपन" अशी कोणतीही कादंबरी नाहीये. लंप्याची कादंबरी नाहीच आहे, चार कथासंग्रह आहेत. (वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर) लहान असताना फक्त वनवास वाचले होते. प्रचंड आवडलेले, आणि जनरली मस्त हलक्याफुलक्या कथांमध्ये एक दुःखद अंडरटोन तेव्हासुद्धा जाणवली होती (वनवास ह्या शिर्षकी कथेत खासकरून). नंतर पुढील पुस्तके वाचली त्यात ही दुःखाची छटा फारच गडद होते. ह्या गोष्टी स्क्रीनवर आणणे खूप कठीण काम आहे. निपुणला शुभेच्छा.