शूर्पणखा
लेखनप्रकार (Writing Type)
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.
मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे. थोडेफार शब्द आणि संपुर्ण चाल आठवत होती.
जीव गुगलुन टाकला अन् १९२० ते १९५० या कालावधीतील गाजलेल्या मराठी कवितांचं संग्रह असलेलं एक पुस्तक सापडलं. मुंबई मराठी साहीत्य संघानं सन् १९५० मध्ये प्रकाशीत केलेलं "माझी कविता" या संग्रहात भा रा तांबे, माधव ज्युलियन, केशवकुमार, अज्ञातवासी, गिरिश आदी कविंच्या तत्कालिक गाजलेली काव्ये आहेत. .
पहा, तुमच्याही आठवणीतीली एखादी जुनी कविता या संग्रहात सापडतेय का ! सोबत कवि गिरिश यांची *"शूर्पणखा"* कविता आठवणीतल्या चालीत गायचा प्रयत्न केलाय त्यासही प्रतिसाद द्या!
https://youtu.be/IGX_c9oIXOk?si=oTuFYIMSHIBOImd1
प्रतिक्रिया
छान आहे!
जीव गुगलुन टाकला
छान.
मस्त .. झकास गायलंय !