✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(गोट्या)

र — राजेंद्र मेहेंदळे, Fri, 06/23/2023 - 12:56
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या लेक्चर्,प्रॅक्टिकल्,सेमिनार्स्,प्रेझेंटेशन्स करताना कँपस ईंटरव्ह्युच्या तयारीसाठी रात्रभर डोळ्यांच्या केल्या गोट्या टेस्टोस्टेरॉनने मात्र किमया योग्य वेळी दाखवली आणि उमगले अचानक, की अशाही असतात गोट्या काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या चटका बसला बोटाला आणि खडबडुन झालो जागा संपली हातातली सिगरेट ,आता चला कामाला लागा महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या जरी मनात खोलवर असतील भूतकाळातील गोट्या

प्रतिक्रिया द्या
5113 वाचन

💬 प्रतिसाद (14)

काही सोनेरी काही रुपेरी

गवि
Fri, 06/23/2023 - 13:15 नवीन
काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
म्हणजे साधारण सखि मंद झाल्या तारका गोट्यांच्या झाल्या खारका असे का? कविता बरीक छान उतरलीय. मिपाचे जुने दिवस आठवले, त्यापायी काहीसा जाणून बुजून फुलटॉस टाकला होता बोर्डावर. अनेक षटकार आणि कॅचेस उडताहेत. ;-)
  • Log in or register to post comments

हाहाहा

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 06/23/2023 - 18:14 नवीन
सखि मंद झाल्या तारका गोट्यांच्या झाल्या खारका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दंडवत

नि३सोलपुरकर
Fri, 06/23/2023 - 13:28 नवीन
महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या .... सर दंडवत __/\__
  • Log in or register to post comments

चटका बसला बोटाला आणि खडबडुन

Bhakti
Fri, 06/23/2023 - 14:19 नवीन
चटका बसला बोटाला आणि खडबडुन झालो जागा संपली हातातली सिगरेट ,आता चला कामाला लागा महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या जरी मनात खोलवर असतील भूतकाळातील गोट्या
सही!
  • Log in or register to post comments

मस्तय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/23/2023 - 17:58 नवीन
सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

गाठ्या...

कर्नलतपस्वी
Fri, 06/23/2023 - 18:12 नवीन
चाट्या,लाळघोट्या,ढेरपोट्या अशा या जीलब्यांचे पडतील सडे रडतील वाचकांचे धडे... कुणीतरी आवरा या भाटांना लावा वाटेला, देऊन त्यांच्याच वाट्यानां करा शितकपाट खाली जरा जागा द्या माझ्या बियरच्या बाटल्यांना....
  • Log in or register to post comments

अता आत्मुसबुवांच्या लोट्या

गवि
Fri, 06/23/2023 - 19:22 नवीन
अता आत्मुसबुवांच्या लोट्या येणे बाकी राहिलेय.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Wed, 07/19/2023 - 16:21 नवीन
भारीच....
  • Log in or register to post comments

सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !

चौथा कोनाडा
Wed, 07/19/2023 - 21:01 नवीन
  • Log in or register to post comments

सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !

चौथा कोनाडा
Wed, 07/19/2023 - 21:08 नवीन
लै भारी ... एक नंबर जमलीय ! ब्राव्हो ..... राजेंद्र मेहेंदळे ...सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !
टेस्टोस्टेरॉनने मात्र किमया योग्य वेळी दाखवली आणि उमगले अचानक, की अशाही असतात गोट्या काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
अरेरे ..... सो सॅड ! काळजी घ्या सर !
  • Log in or register to post comments

जबराव, (मद-)मस्त कवन... कायकू घालते कपाळको आठ्या ?

चित्रगुप्त
गुरुवार, 07/20/2023 - 02:28 नवीन
जबराव, (मद-)मस्त कवन.
पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या ...
- कोई गल नही बादशाहो, ... अश्या वेळीच तर येती, कामास मुठ्या - कायकू घालते कपाळको आठ्या ?
  • Log in or register to post comments

मेहेंदळ्यांच्या फुलटॉसवर

रामचंद्र
Sat, 07/22/2023 - 15:08 नवीन
मेहेंदळ्यांच्या फुलटॉसवर चित्रगुप्तांचा सणसणीत षटकार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा हा हा!

राघव
गुरुवार, 07/20/2023 - 13:57 नवीन
बाकी, कपाळांत जाणाऱ्या गोट्यांबद्दल शिंचं कुणी अजून कसं बोललं नाही ते! ;-)
  • Log in or register to post comments

नाजूक विषय ! ;-)

चौथा कोनाडा
Sat, 07/22/2023 - 13:45 नवीन
नाजूक विषय ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा