✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वेडा वेडा पाऊस..

प — प्राची अश्विनी, Sat, 09/24/2022 - 08:07
वेडा वेडा पाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस? काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस.. छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला, होतं असं चुकून, कळावं ना पावसाला? वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला. म्हणून भिजले, नको ना रे भलता अर्थ लावूस! भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना? बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना? घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना? म्हणून थांबले, नको की रे भलता अर्थ लावूस! बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं? कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं? घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं! म्हणून बिलगले, नको हो भलता अर्थ लावूस! तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!.

प्रतिक्रिया द्या
5814 वाचन

💬 प्रतिसाद (17)

अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना.

प्रचेतस
Sat, 09/24/2022 - 08:54 नवीन
अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना.
  • Log in or register to post comments

शब्दयोजना अतिशय सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/24/2022 - 09:07 नवीन
बाकी, तुमच्याकडे पण यायचा का पाऊस असा भिजत भिजत ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो हो, अगदी असेच

प्रचेतस
Sat, 09/24/2022 - 09:56 नवीन
हो हो, अगदी असेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:))))

प्राची अश्विनी
Mon, 09/26/2022 - 10:49 नवीन
:))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/24/2022 - 08:57 नवीन
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!. क्लास...! मजा आगया. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 09/24/2022 - 09:36 नवीन
झकास... आवडली, लैच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अजून विडंबन कसं नाही आलं??

प्राची अश्विनी
Mon, 09/26/2022 - 10:49 नवीन
अजून विडंबन कसं नाही आलं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

"एक तरी ओवी अनुभवावी".

कर्नलतपस्वी
Sat, 09/24/2022 - 10:44 नवीन
"एक तरी ओवी अनुभवावी". असाच काहीसा अनुभव पावसात भिजण्याचा आणी अचानक कुणी तरी भेटण्याचा. चिंब चिबं निथळत जाताना अचानक कुणीतरी दिसावे दामिनी कडाडताना ओळखीचे सुर कानी पडावे अन्यथा दातावर दात वाजवीत कुडकुडत घरी यावे पडश्याने बेजार होताना मनातले मांडे मनातच खावे मस्तच कवीता आहे.
  • Log in or register to post comments

खरंय. असा एकतरी पाऊस अनुभवावा

प्राची अश्विनी
Mon, 09/26/2022 - 10:48 नवीन
खरंय. असा एकतरी पाऊस अनुभवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

धन्यवाद सर्वांना. तुमच्या

प्राची अश्विनी
Mon, 09/26/2022 - 10:50 नवीन
धन्यवाद सर्वांना. तुमच्या प्रोत्साहनामुळे लिहावसं वाटतं. _/\_
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रसाद गोडबोले
Mon, 09/26/2022 - 11:20 नवीन
मस्त ! सुंदर ! मुक्तछंद / मुक्तक वगैरे प्रकार फारसे आवडत नाहीत पण वरील कवितेतील रोमॅन्टीक टच एकदम आवडुन गेला! लिहित रहा.
  • Log in or register to post comments

सुंदर

चांदणे संदीप
Mon, 09/26/2022 - 11:24 नवीन
आवडलीच. सं - दी - प
  • Log in or register to post comments

तुमच्या सगळ्या कविता छान

विंजिनेर
Fri, 09/30/2022 - 02:04 नवीन
तुमच्या सगळ्या कविता छान असतात. ही खूप आवडली म्हणून आवर्जून लॉगीन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला.
  • Log in or register to post comments

:)_/\_

प्राची अश्विनी
Sat, 10/01/2022 - 06:15 नवीन
:)_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती

श्रीगणेशा
Fri, 09/30/2022 - 16:25 नवीन
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!
मनात पाऊस असला की शब्दातही छान उतरतो!
  • Log in or register to post comments

चिंब भिजण्याचा

श्वेता२४
Fri, 09/30/2022 - 17:15 नवीन
अनुभव देणारी कविता.... अतीशय आवडली.
  • Log in or register to post comments

मा.ऑ, चांदणे संदीप, विंजिनेर,

प्राची अश्विनी
Sat, 10/01/2022 - 06:15 नवीन
मा.ऑ, चांदणे संदीप, विंजिनेर, श्रीगणेशा, श्वैता ... खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा