ती २५ तारीख
आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात. पुन्हा ती भाषणे व मुलाखाती बघताना त्यांचे सडेतोड बोलणे मला जाणीव करुन देते की आपल्याला जे पटते ते दुस-यांना सरळ, सडेतोड सांगणे महत्वाचे असते. मला वाटत, मी स्वःताच कुठेतरी कमी पडलो, पण ह्या व्यक्तीचे मार्गदर्शन आता पुन्हा मिळणे..........शक्य नाही,
ते एकाच व्यक्तीचे लाखोंना प्रभावित करणे व कायमचे सोडुन गेल्यानंतर माझ्यासारख्या खुपजणांना भावुक बनवणे हे आता पुन्हा अनुभवायाला येणार नाही. फक्त आपल्याच योग्य, बरोबर विचारांवर ठाम रहावे हे मला बाळासाहेबांकडुन शिकायला मिळाले, अजुनही शिकतोय. एकटा तोच लढतो, जो एकटाच पुरेसा असतो, हे मी त्यांच्याकडुनचन शिकलो. आणि आपली माणसे कधीच फक्त आपली नसतात, खुपजणांची असतात हे सुध्दा कळले.
पक्ष, अपक्ष खुप असतात व बनतील....पण तो एकच व्यक्ती सर्व असणे ह्यात फरक आहे. बाळासाहेब, सर, तुम्ही तुम्ही होतात, ते पावित्र्य, ती पवित्र नीती आता राहीली नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
खरं आहे. बाळासाहेबांनी ऊभी
व्यक्तिपूजा का करू नये?
त्यांना मुख्यमंत्री ठाकरे
त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे
वडील आमदाक, काकू मंत्री, स्वत
बाळासाहेब म्हणजे एक वादळ होते
+१ महाजन,मुंडे ह्यांना