क्यूं ना निकले घरसे दिल..?
गेल्या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम आवरते घेऊन कर्मचारी वर्गाला ऑफिसात पुन्हा तन,मन,लस वगैरे असं सर्व एकत्रित घेऊन रुजू होण्याचे आदेश दिले. अनेकांना पुन्हा एकदा अक्षरश: लहानपणीच्या उन्हाळी सुट्टया संपून रेनकोटच्या आत दप्तर लपवत शाळेत जाण्याचा फील आला. काहींना, विशेषत: महिलांना ते बरंही वाटलं. घरी होत्या तेव्हा डबल काम पडत होतं.
"घरीच आहेस तर गरमागरम पोळ्या तरी ऐनवेळी करुन वाढ."
"एकीकडे पोरांचा अभ्यास पण घे."
"मम्मा, क्लासचं कनेक्शन सारखं ब्रेक होतंय, बघ गं जरा..रिचार्ज कर पटकन".. इत्यादि.
स्वत: ऑफिसात पोचून काम करणं सुटसुटीत, आणि ज्या गृहिणी होत्या त्यांनाही त्यांचे कपाळीचे "प्राक्तन" किमान आठ नऊ तास तरी घराबाहेर पडल्याने थोडी दुपारची उसंत मिळाली.
काही जणांबाबत वेगळं झालं. सतत डोक्याशी डोकी असल्याने एकमेकांच्या सोबतीतली गोडी गेली होती. एकमेकांच्या कंपन्यांमधले सगळे जार्गन्स, शॉर्टफॉर्म्स, टीम स्ट्रक्चर, टारगेटस इतकंच नव्हे तर एकमेकांच्या कंपन्यांचा पुरता वार्षिक ताळेबंद एकमेकांना कळला होता. पतींनी पत्नींसमोर हग्या दम खाल्ला आणि पत्नीला कोणी स्टिंकर टाकला म्हणून पतींचे बाहू फुरफुरले होते.
त्यांना ऑफिसात परत जाण्याच्या कल्पनेने जरा हायसंच वाटलं असू शकेल.
काहींना ऑफिसात फिजिकली जाण्यापूर्वी कम्फर्ट झोन पूर्ण मोडल्यागत अगदी खूप अस्वस्थता आली, पण दोन चार दिवस प्रत्यक्ष गेल्यावर चहापाणी, बिडीकाडी, गॉसिप, इतर देखणी दृष्ये, आवडीच्या महिला अथवा पुरुषासोबत कॉफी मशीनजवळ माफक काव्यशास्त्रविनोद.. अशा अनेक गोष्टी पुन्हा जमून आल्या आणि ते ऑफिसात समाधान पावले.. चक्क एन्जॉय करायला लागले. उत्साह आला. इ इ .
तरीही एका सर्व्हेनुसार (नाही. कोण्या दूरदेशीच्या टेक्सास विद्यापिठाने वगैरे केलेला सर्व्हे अथवा संशोधने पूर्वी फेमस होती, काहीही ठोकून देण्यासाठी.. तसला नव्हे)..दर दहा पैकी सहा, म्हणजे साठ टक्के लोक वर्क फ्रॉम होम सोडून ऑफिसात जायला तीव्र नाखूश आहेत. इतके की बळेच ऑफिसात यायला लावल्यास ते नोकरी त्यागणं पसंत करतील. आणि तितकेच लोक अन्य सिनारियोत अधिक पगार किंवा वरिष्ठ पद सोडून द्यायला तयार होतील. केवळ घरी राहायला मिळावे म्हणून .
सर्वेक्षणाबद्दल कुठेही लिंका मिळतील.
एक लिंक इथे आहे
तुम्ही कोणत्या प्रकारात मोडताय? तुमचा सदरा कोणत्या सदरात पडतोय? (बाय द वे, घरुन काम करताना किमान सदरा घालून बसावेच लागते हो...)
ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम ही सोय उपलब्ध होऊ शकली.. म्हणजे जे त्या प्रकारच्या जॉबमधे असलेले सुदैवी जीव आहेत त्यांच्यासाठी हे अधिक प्रस्तुत ठरेल. ज्यांचे जॉब्स "वर्क फ्रॉम होम"साठी सुटेबल नाहीत त्यांनी मोठाच कार्यभाग तोलला. त्यांचे आभार आहेतच. त्यांना व.फ्रॉ.हो.वाल्यांबद्दल काय वाटले? हेवा वगैरे वाटला का? इथे प्रतिसादात व्यक्त झाल्यास आजन्म उतराई.
तळटीप: ऑफिसची ब्यान्डविड्थ वापरुन लेखन आणि प्रतिसादन करण्यात कित्ती कित्ती सुख आहे.. तर ते एक असो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान विषय
अस्मादिक वर्क फ्रॉम होम सोडून
ओ टी टी
ब्यान्डविड्थ
काय हो हे कर्नलसाहेब..
अजून वर्क फ्रॉम होम
#Life'sFunWithWfH
- ऑफिसला प्रवास करून जाण्याचे आयुष्यातले दरमहा २० ते ६० तास वाचतात. (ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.)
- प्रवासाचे दरमहा पाच-दहा हजार रुपये वाचतात.
- कपडे, पादत्राणे, इतर accessories (मराठी?) इ वरचा खर्च वाचतो.
- इतर अनुषांगिक खर्च वाचतात. (वाहनांची झीज वगैरे)
- प्रवासाचा शिणवटा येत नाही.
- प्रदूषणापासून संरक्षण होते.
- गरम ताजे अन्न खाता येते.
- याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत; (ते मिपाकर्स सांगतीलच!)
घरून काम करण्याचे तोटेही आहेत. ऑफिसातून काम करण्याचेही फायदे-तोटे आहेत. मला घरून काम आवडते; मी ते करतो. #Life'sFunWithWfH 😊फायदे तोटे यांच्याशी बाडिस.
करोना सुरु झाल्या पासुन घरुनच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhiऑफीसमधे परत जाण्यासाठी माझी
मबा, सौन्दाळा,
मात्र मायक्रो मॅनेज करणारे,
वर्क फ्रॉम होम - उत्पादन क्षेत्र
रोचक..
अपनेको क्या फरकच गिरा वो
बर्याच काळाने पोटभर मिरजी
ऑन सेकंड थॉट, मिरजी भाषेबद्दल
हैदराबादी
मजा आया ...
बोर हुआ
११ एप्रिल
मग तिच्या सोबत फ्लर्टिंग ,
ते सेलिब्रेशन वगैरेचा तपशील
ऑफिसची ब्यान्डविड्थ वापरुन
खुप खुप सुख मिळवलं
हा .... हा .... हा .... !
😄
हा .... हा .... हा .... !
वरील बर्याच लोकांशी बाडीस
थोड्कयात, बहुजनहिताय,
चांगली बाजु म्हणजे अॅट्रिशन
मातं क्षेत्रात प्रचंड तेजी
दुसरा जॉब मिळवणे, राजीनामा वगैरे वगैरे
उत्पादन क्षेत्रात सुद्धा असेच आहे.
अॅट्रिशन
मस्त धागा.
आज आपण इथे आपल्या व्यस्त
किती तो प्रेमळ संवाद.
तुम्हाला कसे वाटले पुन्हा
धन्यवाद.
ऑफिस सुरू झाले पाहिजेत.
उत्तम प्रतिसाद. पटण्याजोगे.
काम फ्रॉम ऑफिस
आत्ताच्या लॉकडाऊनमधेही बॉस
आमचं ऑफिस सुरू झालं २
माझं ऑफीस हिंजवडीला. तिथे
नेहमीप्रमाणे "समीरसुरेख"
उत्तम विषय....
आयटीवाले
जबरदस्त प्रतिसाद....
हणमंतअण्णा, सविस्तर आणि