✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुखवटे.

D — Deepak Pawar, Tue, 03/15/2022 - 18:49
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे सभ्य वेषात या नांदती चोर हे दान देण्या निघे अन जगाला लुटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. शब्द फुलापरी मनी निखारा जळे वेष संतापरी हृदयी विषारी तळे लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

प्रतिक्रिया द्या
4446 वाचन

💬 प्रतिसाद (13)

छानच

कर्नलतपस्वी
Tue, 03/15/2022 - 19:22 नवीन
आवडली.याला जीवन ऐसे नाव
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रमोद देर्देकर
Tue, 03/15/2022 - 19:40 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

उत्तम रचना.

चांदणे संदीप
Tue, 03/15/2022 - 19:44 नवीन
कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/16/2022 - 08:32 नवीन
उत्तम रचना, आवडली. लिहिते राहा.
पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे सभ्य वेषात या नांदती चोर हे
अगदी वास्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद.

Deepak Pawar
Wed, 03/16/2022 - 10:19 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार. दीपक पवार.
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Wed, 03/16/2022 - 16:26 नवीन
आवडली कविता. पुलेशु. खूप दिवसांनी साव हा शब्द आला वाचण्यात. :-)
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

Deepak Pawar
गुरुवार, 03/17/2022 - 10:07 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद. दीपक पवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मस्त कविता

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 03/17/2022 - 12:09 नवीन
सध्याच्या फेसबुक व्हॉट्सप ट्विटर आणि इन्स्टाच्या काळात हे मुखवटे जास्तच अभेद्य आणि चेहर्‍याला घट्ट चिकटणारे झाले आहेत. इतके की ते जर ओढून काढायचे म्हटले तर खरा चेहराच फाटून भेसुर होईल. एकाच वेळी अनेक मुखवटे घालण्याची सुध्दा आजकाल मोठी फॅशन आलेली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

Deepak Pawar
Fri, 03/18/2022 - 10:36 नवीन
मनःपूर्वक आभार. दीपक पवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे

श्रीगणेशा
Sat, 03/19/2022 - 12:33 नवीन
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे
खूप छान! प्रत्येकजण सभोवतालच्या समाजाने ठरवून दिलेले मुखवटे घालूनच जगत असतो.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद.

Deepak Pawar
Mon, 03/21/2022 - 10:10 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद. दीपक पवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगणेशा

आवडली खूप छान

बाजीगर
Sat, 03/19/2022 - 19:38 नवीन
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे शिवीगाळ न चिखल, फेकती मारके रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

Deepak Pawar
Mon, 03/21/2022 - 10:11 नवीन
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे शिवीगाळ न चिखल, फेकती मारके रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे छान....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा