✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उभा मी वाटेवरती

च — चांदणे संदीप, Tue, 02/09/2021 - 09:17
तुझ्या डोळ्यांचे काजळ मी आहे मला जरासे तू लावून घे ना तीट म्हणूनी गालावरती फुलबागेमधले मी फूल सुगंधी मला जरासे तू माळून घे ना तुझ्या तिमिरी केसांवरती मी एक गाणे युगल, प्रितीचे मला जरासे तू गाऊन घे ना चांदणवर्षावातल्या राती तुझा मी होईन पदर भिरभिरता मला जरासे तू लपेटून घे ना तुझ्या शहारत्या अंगाभोवती काहीही होतो तुझ्या आवडीचे मला जरासे तू सांगून बघ ना उभा मी तुझ्याच वाटेवरती - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
1748 वाचन

💬 प्रतिसाद (2)

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 02/09/2021 - 09:26 नवीन
कवितेतली तरल भावना आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

नादमय काव्य!

Bhakti
Tue, 02/09/2021 - 10:10 नवीन
तुझा मी होईन पदर भिरभिरता मला जरासे तू लपेटून घे ना तुझ्या शहारत्या अंगाभोवती.. सुंदरच!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा