✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कन्यादान एक शब्द चित्र

क — कर्नलतपस्वी, Mon, 02/08/2021 - 09:16
शब्द तोकडे पडले डोळ्या पाणी दाटले भावनांची उंची मोठी शब्द ओठीच थांबले पसरली शांती चहूकडे कोलाहल माजला मना मनाच संवाद मनाशीच ग थांबला अशांत ही मने फक्त डोळे बोलके पाऊल झाले जड पडे हलके हलके लेक चालली सासुरी शब्द तोकडे पडले आई बापाच्या मनातले बासुरीचे सुर होते तिथेच थांबले ८-१२-२०

प्रतिक्रिया द्या
2229 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सुरेख!

रंगीला रतन
Tue, 04/27/2021 - 23:29 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता आहे. भावना छान

श्रीगुरुजी
Tue, 04/27/2021 - 23:46 नवीन
सुंदर कविता आहे. भावना छान मांडल्या आहेत. परंतु कन्यादान हा शब्द अजिबात आवडत नाही. पोटची कन्या ही दान म्हणून देणे किंवा तसा उल्लेख करणे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments

विचार करण्याजोगी बाब तर आहे

गॉडजिला
Wed, 04/28/2021 - 11:23 नवीन
विचार करण्याजोगी बाब तर आहे पण मग पर्यायी शब्द काय असु शकतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Fri, 05/21/2021 - 15:54 नवीन
कन्यादान हा शब्द कन्या + दान नसून कन्या + आदान आसा आहे कुठेतरी वाचले होते. आदान एक संस्कृत शब्द आहे आणी त्याचा अर्थ म्हणजे ग्रहण करणे आसा आहे. मी माझ्या कन्येचा इतके दिवस समाजीक रितीभाती प्रमाणे संभाळ केला आता तुम्हाला तीचा हात देत आहे तो ग्रहण करावा. जसा मी तीचा प्रेमाने, आदरपूर्वक लालन पालन केले तसे तुम्ही पण करावे आणी दोघांनी मिळून समाज उद्धारासाठी पुढील आयुष्य व्यतीत करावे. असा या विधी मागचा उद्देश असावा. बदल हा प्रकृतीचा स्थाई भाव आहे. समय बदलला समाज बदलला. पुरूष प्रधान संस्कृती मध्ये पण बदलाव आला. मुली आत्मनिर्भर होऊ लागल्यात. शब्दांचा अर्थ आणी संधी विच्छेदन यामुळे मुळ अर्थ आणी भावना बाजुला झाली व कन्यादानाला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला. कन्या ही अर्जित वस्तु नाही म्हणून तीचे दान करू शकत नाही. या बद्दल काही शंकाच नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा