Skip to main content

पनीर पराठा (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी शुक्रवार, 18/12/2020 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन्ही पाकृ नॉन-व्हेज होत्या, म्हणून खास, पनीर प्रेमींसाठी.. सोप्पा आणि झटपट होणार पदार्थ साहित्य:
  • मल्टि ग्रेन / गव्हाचे पीठ - १ १/२ कप
  • मीठ
  • तेल
पनीरचे सारण:
  • पनीर - २०० ग्रॅम्स
  • कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
  • हिरवी मिरची - १ बारीक चिरून
  • पुदीना पाने - १२ ते १५ बारीक चिरून
  • कोथंबीर - १/२ कप बारीक चिरून
  • आले-लसूण पेस्ट - २ टिस्पून
  • ओवा - १/२ टिस्पून
  • धणे पावडर - १ टेबलस्पून
  • काळी मिरी पावडर - १ टिस्पून
  • लाल तिखट - १ टिस्पून
  • अमचूर पावडर - १ टिस्पून (ऐच्छिक)
  • कसुरी मेथी - २ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार
  • तूप
पाककृती:
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पनीरचे तुकडे करून १० मिनिटे थोड्या पाण्यात घालून ठेवा.
  • पनीर पाण्यातून पिळून घेऊन एका भांड्यात छान चुरून घ्या.
  • त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण बनवून घ्या.
  • कणिक थोडी मळून, कणकेचे समान आकाराचे गोळे करून त्याची पोळी थापून अथवा लाटून घ्या.
  • त्यावर पराठ्यात मावेल एव्हढं सारण घाला.
  • वरून अजून एक लाटलेली पोळी ठेऊन कडा घट्ट दाबून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर काही तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून टाका.
  • गरम तव्यावर लाटलेला पराठा घाला आणि कडेने थोडे तेल / तूप सोडा. एका बाजूने भाजून झाला कि पराठा परता आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
  • गरम पनीर पराठे दही/ राईत्या सोबत सर्व्ह करा.

वाचने 5710
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मार्गशीर्ष महिन्यात घरात वशाटाला बंदी असते. हा झक्कास पर्याय आहे. रैवारचा नाश्ता पण मस्त होईल.

वाह मस्तच...खुशखुशीत दिसत आहेत एकदम . पनीर आपला विकपॉईंट, करून बघतो एकदा.

आहाहा... पनीर पराठा हा माझा फेवरेट पराठा आहे, यात वरती चीझ किसुन टाकले की अजुन भारी लागते. व्हिडियो देखील मस्त आहे, पिवळसार रंग असलेले पनीर मी पहिल्यांदाच पाहिले ! जवानी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar

पनीर पराठा आवडला. व्हीडियोही आवडला, चांगला एडिटींग आहे. धन्यवाद. और भी आने दो....! -दिलीप बिरुटे