✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी पाहिलंय...

आ — आर्णव, Fri, 12/04/2020 - 07:20
मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या. उमलताना फुलताना, मस्त बहरताना. काहींना झाडावरच कोमेजताना. काहींना निर्माल्य होताना. मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण. अविचल स्तब्ध असताना. प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना. मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना. मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला. अधाशीपणे सुख उपभोगताना. कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना. कधी दैवाकडे जोगवा मागताना. मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे. अंतराळाला गवसणी घालताना. हव्व्यासाच्या नादी लागताना. जमिनीशी नातं तोडून टाकताना. मी पाहिलेत प्रतिभेचे सूर्य. संपदेचं तेज उत्सर्जताना. काही उगवताना, आकाशात तळपताना. काही आळसाच्या अंधारात मावळुन हरवताना. मी पाहिलंय खूप काही, असलेलं आणि नसलेलं. काही उघड होतं, काही लपून बसलेलं. काही दिसत होतं, काही भासत होतं. माझं मन मलाच खाण्यासाठी आ वासत होतं.

प्रतिक्रिया द्या
1298 वाचन

💬 प्रतिसाद (1)

कच्चा माल =))

टवाळ कार्टा
Fri, 12/04/2020 - 15:34 नवीन
कच्चा माल =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा