✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळी इथली आणि तिथली

V — VRINDA MOGHE, Sat, 11/14/2020 - 09:45
*दिवाळी इथली आणि तिथली* बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई खातील तरी किती..अर्धे वायाच जाई कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !! झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर, आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर ! तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर, कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !! तिकडे झोपडीमधे घडे रोजचाच उपास, हाती नाही काम, नाही पोरांमुखी घास, कामासाठी वणवण करून लागतो श्वास दिवाळी नाही की मिठाई नाही फटाके कपड्यांची तर बातच नाही एका पणती पुरतेही तेल घरात नाही , पोटाच्या आगीने नी अश्रुंनी जर पणती पेटेल तर अवघी झोपडी प्रकाशाने झगमगून उठेल !! किती भेद जगण्यांमधे..दोन टोकं..पण हेच वास्तव, एक पणती मनामधे..पेटती ठेऊ., या जाणिवेस्तव ! आपल्याकडचं 'जास्तीचं' देऊया. जिथे गरज आहे, मदतीचा हात देऊ..करण्यासारखं अजून बरंच आहे !! ©वृंदा मोघे 19/10/17.

प्रतिक्रिया द्या
1528 वाचन

💬 प्रतिसाद (1)

करूणरस ओसंडुन वाहातोय!

रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 14:17 नवीन
करूणरस ओसंडुन वाहातोय! माफ करा, पण फॅारमॅट जुनाट असल्याने नाही आवडली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा