महारास

Primary tabs

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
30 Oct 2020 - 1:04 pm

महारास..!!

इतकी वर्ष झाली आता,
थांबव लपंडावाचा फार्स,
नटून थटून आलेय मी,
दिसतेय एकदम क्लास,
जन्मभर वाट बघतेय,
संपले घड्याळाचे तास,
कृष्णा, खेळशील माझ्याशी रास..?

खूप वर्ष रेटला रे हा,
भातुकलीचा संसार बास,
आयुष्याच्या सांजवेळी,
कधी होई मन हे उदास,
दमल्या थकल्या ह्या जीवाचा,
निरवी संसार त्रास,
गोविंदा, खेळशील माझ्याशी रास..?

क्षणोक्षणी संपत जाती,
माझे जीवन श्वास,
हिरा नसे तरी ह्या कोळशा,
मारशील का रे तास,
वेड्या माझ्या स्त्री हट्टाला,
खुशाल मनोमनी हास,
मुकुंदा, खेळशील माझ्याशी रास..?

विषय विकार अन् अहंकाराचा,
अलगद सोडव फास,
किती अवघड तुझ्या परीक्षा,
होईन ना मी पास,
दह्या-दुधाने न्हाऊ घालीन,
भरवीन लोण्याचा घास,
अच्युता, खेळशील माझ्याशी रास..?

कधी मनाच्या तळघरी,
लागे तुझा तपास,
कधी उगाच स्वप्नी होई,
तव मुरलीचा भास,
राधा मीरा नाहीच नाही,
मी नाही गोपी खास,
मोहना, खेळशील माझ्याशी रास..?

तव प्रेमाची गोडी कळाया,
उरी नामाची कास,
भवसागर हा पार कराया,
अंतरी तुझाच वास,
तव रंगी मी रंगून जावं,
आहे मनीची आस,
केशवा, खेळशील माझ्याशी रास..?

शरदाचं हे टिपूर चांदणं,
पौर्णिमा अन् अश्विन मास,
तुझे रुप चित्ती राहो,
मनात अविरत ध्यास,
माधवा, खेळशील माझ्याशी रास..?
माधवा, खेळच माझ्याशी रास....!!

जयगंधा..
३०-१०-२०२०

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

30 Oct 2020 - 3:18 pm | चांदणे संदीप

उत्तम रचना.

सं - दी - प

माहितगार's picture

30 Oct 2020 - 4:05 pm | माहितगार

रास उत्तम जमलाय आहे, आपल्या काव्यरसाचा ओघ असाच चालू राहो.

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 4:10 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद..!!

प्राची अश्विनी's picture

31 Oct 2020 - 5:22 pm | प्राची अश्विनी

आवडली कविता.