Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कौस्तुभ भोसले on Sun, 05/17/2020 - 15:23
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

Submitted by निनाद on Mon, 05/18/2020 - 08:20

Permalink

मुक्तछंद नावाच्या आळशी कचर्

मुक्तछंद नावाच्या आळशी कचर्‍यात वृत्तबद्ध कवितेचे हे फुल उगवलेले पाहून अतिशय आनंद वाटला. वृत्ताचे नाव आनंदकंद असले तरी कविता मात्र दु:खी आहे. असो, आता आनंदकंद वृत्ताची लघु-गुरु क्रम लगावली पण द्या. या वृत्तातले एखादे गाणे कुणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by कौस्तुभ भोसले on Mon, 05/18/2020 - 11:30

In reply to मुक्तछंद नावाच्या आळशी कचर् by निनाद

Permalink

लगावली

गागालगा लगागा गागालगा लगागा -आनंदकंद वृत्त उदाहरणेः १. केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट २. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार ३. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन ४. आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे ५. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । - ग.दि.माडगुळकर ६. गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे ७. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 05/22/2020 - 13:41

In reply to लगावली by कौस्तुभ भोसले

Permalink

छान !

अशी प्रत्येक वृत्ताची ओळख आणि त्यातली गाणी दिली तर मजा येईल
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 05/18/2020 - 08:51

Permalink

वृत्तबद्ध कवितेचा आनंद वेगळाच

वृत्तबद्ध कवितेचा आनंद वेगळाच खरा. पण थोडी थोडी समजली, थोडी थोडी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कौस्तुभ भोसले on Mon, 05/18/2020 - 14:20

In reply to वृत्तबद्ध कवितेचा आनंद वेगळाच by सस्नेह

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन on गुरुवार, 05/21/2020 - 13:52

Permalink

वृत्तबद्ध कविता दुर्मिळ

वृत्तबद्ध कविता दुर्मिळ झालेल्या असतांना हा अत्यंत सुखद धक्का .. कविता जरा दु:खद वाटत असली तरी ... वृत्तबद्ध कवितेला आपोआपच गेयता प्राप्त होते आणि त्या लयीत छान झोके घेता येतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आयर्नमॅन

Submitted by आयर्नमॅन on गुरुवार, 05/21/2020 - 15:45

Permalink

अक्षवृत्त व विषुववृत्त इतकेच समजत असल्याने

पास....
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 05/22/2020 - 11:54

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 05/22/2020 - 16:09

Permalink

आवडले. लिहिते रहा. :-)

आवडले. लिहिते रहा. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 10/28/2022 - 12:17

Permalink

सुदंर गझल लिहीली आहे.

सुदंर गझल लिहीली आहे.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 12149 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com