✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मैत्री!

च — चलत मुसाफिर, Fri, 03/20/2020 - 22:59
टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का! 'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119 ------ मैत्री! बाईचे दो सख्खे मैतर पहिला काका दुसरा अप्पा रोज मारते अलटुन पलटुन हाटसापवर गुलुगुलु गप्पा मैतर दोघे पक्के डांबिस बाई त्यांचा नाजुक बिंदू आव परंतू आणिति ऐसा विनयाचे जणु साती सिंधू रोजरोजच्या गप्पा ओल्या खूष जाहती अप्पा काका पाहु लागती स्वप्ने चावट मनात बांधुन "वाडा" पक्का परंतु बाई आहे खमकी दाद कशी ती लागू देइल! झुलवत ठेवी दोघांनाही धाडुन चावट बदाम, स्माइल दोघांमंध्ये संख्या छत्तिस तोंड पाहणे पसंत नाही परंतु बाई भाग पाडते हसुन बोलण्या दोघांनाही बाईचे ते बदाम पाहुन दोघे होती कासावीस "वाड्यावरती कशि आणावी?" विचार करती रात्रंदीस मनातला तो रगेल वाडा रोज बांधिती रोज तोडिती लाखोली वाहुन मैत्रीला दोहों मैतर "हात चोळती"

प्रतिक्रिया द्या
1763 वाचन

💬 प्रतिसाद (1)

:) :) :)

रंगीला रतन
गुरुवार, 04/29/2021 - 12:48 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा