गीत गाऊन
रितं होताना
विवेक प्रगल्भ
निर क्षीर होताना
तारुण्यातला
अनुभव
पुन्हा जगताना
रितेपण
अधिक मोकळेपणाने
भरुन काढताना
नेमकं कोण कोण
तरुण होत ?
कवि, कविचे
अनुभव भावना
प्रेरणा नी कल्पना
की वाचकाची
अनुभूती ?
मागाकाका सुरेख चाललाय कवितांचा प्रवास .. आपल्या गाडीने ट्रक बदललाय कि काय .. पण जे काही स्टेशन येतंय ते जणू भावनांच्या /निसर्गाच्या /कल्पनांच्या /अनुभूतीच्या जवळच जातंय .. नाहीतरी या कोलाहलात आहेच काय .. प्रतिसाद /उपमर्द /मी आणि मीपणा हेच उरलंय.. त्यापेक्षा आपलं हे कल्पनेचं स्टेशन बरं.. कुणी चढलं तर ते आपलं नाहीतर आपणच मालक ... काय बोलताय
भारीच!
अनुभूती सगळ्यांनाच येत असावी.
अगदी !
नमस्कार ,
मस्त.