✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुर्वास

न — निराकार गाढव, Tue, 12/03/2019 - 05:33
एक ओजस्वी संन्यासी ज्यास विमुक्तीचा ध्यास । करि ध्यान रात्रंदिन करि शास्त्रांचा अभ्यास ।। रुक्ष ज्याची दिनचर्या करि कडक उपास । ओढी अतोनात कष्ट किती सेवेचे सायास ।। ऐसे दिन कित्ती गेले हिमालयाच्या कुशीत । तैसा राहून एकला जाले महीने, वरिस ।। पण एके दिनी येता मातापित्यांचा आठव । परतला मूलग्रामी, गृही, शोधुनिया ठाव ।। जैसा परतला गृही, दिसे गर्दी, कोलाहल । दिले झोकून संसारी झाला कल्लोळ अपार ।। साही अपेक्षांची ओझी स्वार्थी, पोटार्थींची ढोंगं । होई वेळोवेळी क्रोधी, खूप व्याकूळ, व्याकूळ ।। मग एके सायंकाळी झाला वदीता मातेस । मनातली तगमग, सारा मनातला त्रास ।। "हिमालयी बैसोनिया केले होते किती तप । नाही आला कधी क्रोध नाही स्फुरला विकार" ।। "कसा, किती होई इथे माझा संताप, संताप । कैसे मूढ जन सारे, काही सुचेना जिवास" ।। "उबगलो माणसांस किती क्षूद्र मने त्यांची । वारंवार करि क्षुब्ध त्यांची वेडी वाचाबाची" ।। स्मितहास्य करूनिया, चुंबुनिया वृद्धा त्यासि म्हणे, "माझ्या राजा, किती कष्टसि जिवासि !" "दमुनिया गेला बाळ क्रूर जगीच्या व्यापात, घेई श्वास क्षणभर, ऐक प्रेमाचा विचार ।" "शांति तिथे डोंगरांत सांग, कोणाचि वदावि? तुझ्या मनाचा निग्रह की हीमाद्रिची ठेव?" ऐकोनिया बोल ऐसे मन त्याचे झाले स्तब्ध । आलंगुनि मातेसि तो, म्हणे, "अहं झाला विद्ध!"

प्रतिक्रिया द्या
4957 वाचन

💬 प्रतिसाद (8)

वाह!

राघव
Tue, 12/03/2019 - 07:02 नवीन
किती सुंदर! सहज, साधं आणि सरळ. खूप आवडली रचना.
  • Log in or register to post comments

कित्ती कित्ती दिवसांनी परत!!

कंजूस
Tue, 12/03/2019 - 07:12 नवीन
कित्ती कित्ती दिवसांनी परत!! आता हा दु:खी सन्यासी कोण?
  • Log in or register to post comments

वाह!

प्राची अश्विनी
Tue, 12/03/2019 - 08:11 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

कठीण आहे

जॉनविक्क
Tue, 12/03/2019 - 08:28 नवीन
  • Log in or register to post comments

वा! अप्रतिम

श्वेता२४
Tue, 12/03/2019 - 10:45 नवीन
तुझ्या मनाचा निग्रह की हीमाद्रिची ठेव? आलंगुनि मातेसि तो, म्हणे, "अहं झाला विद्ध! खूपच भावले मनाला :)
  • Log in or register to post comments

मस्त..

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/04/2019 - 09:04 नवीन
कधी कधी हिमालयात न जाता देखिल अशी आवस्था होते... आवडली हेवेसांन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

बाल कविता

जॉनविक्क
Wed, 12/04/2019 - 16:38 नवीन
  • Log in or register to post comments

जर हिमालयात न जाता देखिल अशी

mrcoolguynice
Wed, 12/04/2019 - 18:08 नवीन
जर हिमालयात न जाता देखिल अशी आवस्था होते... तर झैरात कशी करता यावी ...? Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा