उरलो आता भिंतीवरल्या ...
तुका म्हणाला
उरलो आता
उपकारापुरता ...
मी म्हणालो
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
नुरली शक्ती
विरली काया
शिथिली गात्रे
आटली माया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
खपलो झिजलो
कोड चोचले
देहाचे पुरवाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
वाटले -
जिंकेन जग.
लोळेन -
सुखात मग.
धडपडलो - कडमडलो
नको तिथे अन गेलो वाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या -
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
एके दिवशी आणि अचानक
उन्मळला चैतन्य-झरा
विस्मयलो गहिंवरलो आणिक -
अनुभवाला आनंद- सोहळा
उचलला-
कुंचला -
रंग झराले झरा झरा
सूख दाटले -
दुःख आटले -
चित्र रंगले भरा भरा
उरलो आता
भिंतीवरल्या -
..
..
रित्या चौकटी
भरण्याला
चित्रानंदी लावुनि टाळी
गीत सृजेचे गाण्याला...
सिक !
काका छान लिहलंय .. माणसाचं
मस्त लिहीले आहे
आवडली, कैच्या कै काही नाही,
तेच म्हणतो. छान आहे.
झरझर कुंचला रंगला... तुझे गीत गाण्यासाठी...
छान आहे. ..
सुंदर
सुरुवातीच्या ओळी वाचून
सकारात्मक कविता आवडली.
व्याप कमी करण्याचा उपद्व्याप करून आता पुन्हा...