✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आर्टिकल 15

N
nishapari यांनी
Mon, 09/02/2019 - 18:07  ·  लेख
लेख
आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे. डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून ´त्यांच्या´ समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो . चुलत बहिणींमध्ये समलैंगिक संबंध होते म्हणून दोघींच्या वडिलांनी संतापाने त्यांचा खून केला असं खोटं कारण निर्माण केलं जातं आणि तशी अफवा पसरवण्याचा पद्धतशीर प्रयत्नही केला जातो . गावात नवीन नियुक्त झालेला आयपीएस ऑफिसर, अयान रंजन - आयुष्यमान खुराना सत्याच्या मुळापर्यंत जाऊन खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ... चित्रपटात कोणतेही टाळ्या, शिट्या पाडू डायलॉग्ज नाहीत , गाणीही जवळपास नाहीतच , मूळ कथा बाजूला ठेवणारी लव्ह स्टोरी नाही... आयुष्यमान खुरानाने अत्यंत खरा वाटेल असा पोलीस अधिकारी साकारला आहे ... यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत ..... बधाई हो हा मी त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट .. वेगवेगळे विषय असलेले निवडक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट करत हा अभिनेता हळूहळू बॉलिवूड मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत आहे .... मनोज पाहवा यांचा चेहरा विनोदी भूमिकांमध्ये पाहिल्याने परिचित होता पण नाव माहीत नव्हतं .. या चित्रपटातली त्यांची भूमिका मात्र विनोदी नाही .. सुरुवातीला राजकीय दबावाखाली असलेला बिचारा पोलीस असं वाटत असताना मध्येच प्रसंगांना कलाटणी मिळून प्रेक्षकाला एक शॉक दिला आहे ... अभिनय अर्थात ग्रेट . सयानी गुप्ता हीने तीन मुलींपैकी पळून गेलेल्या मुलीच्या मोठया बहीणीचं गौरा हे पात्र साकारलं आहे .. रूढार्थाने सुंदर ह्या व्याख्येत बसत नसली तरी अभिनय अतिशय नैसर्गिक आहे ... कुठलंही कॅरॅक्टर जिवंत करू शकेल असं टॅलेंट तिच्यात दिसलं... या चित्रपटात दरिद्री , बहुजन समाजातील स्त्रीची भूमिका तिने खूप ताकदीने साकारली आहे . पडद्यावर ग्रामीण भारत जिवंत केला आहे ... उत्तर भारतातल्या खेड्यातली जातीव्यवस्था पाहून मन सुन्न झालं ... टपरीसमोर एक बाक रिकामी असताना 4 लोक खाली बसून चहा पीत आहेत , मंदिरात प्रवेश केल्याबद्दल उघडे करून मारहाण , शाळेतील मुलांचा स्वयंपाक दलित स्त्रीने केला म्हणून 150 मुलांचं अन्न फेकून देणं - तिला काम सोडावं लागणं .. ब्राह्मण - दलित एकता रॅलीत ब्राह्मण उमेदवार / पार्टीचे लोक दलित कुटुंबियांसमवेत बसून जेवताना टीव्हीवर बातम्यांमध्ये दाखवतात , त्यानंतर महंत स्वतःचं जेवण आणि ताट - वाटी स्वतःच्या घरून घेऊन आला होता , ते टीव्हीवर दाखवलं नाही अशी टिप्पणी गौरा करते . 3 मुली मिसिंग असल्याची तक्रार आल्यावर ती नोंदवून घेतली जात नाही ... ज्यावेळी आयुष्यमान एफआयआर का नोंदवला नाही असं विचारतो तेव्हा - " इतना सिरियस नही लग रहा था " असं उत्तर दिलं जातं आणि कब लगता है सिरियस ? विचारल्यावर - " इन लोगों के तो झुठे केसेस आते रहते है " असं उत्तर मिळतं . 2 मुलींची प्रेतं मिळाल्यावरही तिसऱ्या मुलीला शोधण्याबाबत आयुष्यमान बोलत असताना , शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असं आडून आडून सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो , एक पोलीस "जनवरी में इन लोगों का एक लडका भाग के गया था" , असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना " आयुष्यमान तडकून " कौन है ये लोग , इन लोगों का ऐसा , इन लोगों का वैसा , ज्युपिटर वरून आलेत का ? " असा प्रश्न करतो .... " हे लोग " म्हणजे दलितांना वेगळी वागणूक दिली जाणं हे त्याने कधीही अनुभवलेलं नाही ... खुद्द मृत मुलींचे वडील - " रातभर रखके छोड देते , मारा क्यू ? " असा प्रश्न विचारतात तेव्हा काय म्हणावं समजत नाही ... एवढी अगतिकता , आपल्या सोबत अशी भयानक घटना घडणं हे ते किती सहज स्वीकारतात ... आपल्याला न्याय / सुरक्षा मिळेल / मिळावी - तो आपलाही हक्क आहे यांची अपेक्षाही ते करत नाहीत .. आपल्याच देशात एवढया वाईट परिस्थितीत जगणारे लोक आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते .... पोस्ट मार्टम मध्ये सामूहिक बलात्कार रिजल्ट आल्यावर रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर वर दबाव आणण्याचा प्रयत्न , केस क्लोज करण्याचे प्रयत्न , गुन्हेगारापर्यंत पोहोचत असणाऱ्या आयुष्यमानला कायद्याच्या बारीकसारीक नियमांत अडकवून , कुभांड रचण्याचा प्रयत्न करून सस्पेंड करण्याचा प्रयत्न होणं , राजकारण्यांबद्दलची दहशत .. लहान गावातली परिस्थिती .... समाज सुरळीत चालण्यासाठी राजा , सेवक , दास अशी घडी ब्रह्मदेवाने बनवली आहे आपण तिला आव्हान देणं बरोबर नाही असं मानणारे लोक , जो हम देते है वही उनकी औकात म्हणणारा गुन्हेगार , सामाजिक शांतता - सुव्यवस्था टिकवणं म्हणजे अन्यायाला विरोध करणाऱ्यांची तोंडं बंद करणं असं समजणारे तथाकथित सुशिक्षित लोक ... अन्यायाला विरोध करणारे लोक समाजात अस्थिरता उत्पन्न करू इच्छिणारे आहेत असा आरोप करून त्यांची मुस्कटदाबी करणं .. डोकं भणाणून गेलं चित्रपट पाहताना .... गटारात पूर्ण डुबकी मारून साफ करणारा माणूस पाहून शब्दशः डोळ्यात पाणी आलं ... काय करू शकतो आपण हे बदलावं म्हणून ... :( माझ्याकडून तरी चित्रपटाला 10 पैकी 10 .. ही ट्रेलरची लिंक , https://youtu.be/HKOJY0cU63E युट्यूब वर पूर्ण चित्रपटही आहे .... https://youtu.be/kt3KzATtjZI
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नाट्य
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
9874 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

चांगला परिचय

हेमंतकुमार
Mon, 09/02/2019 - 19:58 नवीन
चांगला परिचय
  • Log in or register to post comments

चित्रपट एक नंबर आहे. ओळख

जव्हेरगंज
Mon, 09/02/2019 - 21:04 नवीन
चित्रपट एक नंबर आहे. ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

ओळख छान आहे ..

फुटूवाला
Mon, 09/02/2019 - 21:24 नवीन
आयुष्यमान खुरानाच्या घरकाम करणाऱ्या मुलीबद्दल(मला नाव कळलंच नाही) सुद्धा सांगायला पाहिजे होतं असं मला वाटतंय...
  • Log in or register to post comments

+१

फुटूवाला
Mon, 09/02/2019 - 21:38 नवीन
यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत यात मुख्य नायकाने कोणाला चापट पण मारलेली नाहीये...
  • Log in or register to post comments

_/\_ धन्यवाद ... मुलीबद्दल

nishapari
Mon, 09/02/2019 - 21:58 नवीन
_/\_ धन्यवाद ... मुलीबद्दल लिहायचं राहून गेलं .. मुलीचं नाव आधी कमली वाटलं पण अमली आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुटूवाला

आवडलेला आयुष्यमानचा डॉयलॉग एकच

जॉनविक्क
Mon, 09/02/2019 - 22:14 नवीन
व्हॉट द F^क इज गोइंग ऑन.
  • Log in or register to post comments

जाती व्यवस्थेला त्याने दिलेली ही खणखाणीत शिवी होती

जॉनविक्क
Tue, 09/03/2019 - 10:20 नवीन
आणि हाताखालच्या पोलिसाला या वाक्याचा अर्थच माहीत नसल्याने त्याने काढलेला अर्थ व त्यातून उपरोधिक विनोद निर्मिती जबराच होती. दोन्ही वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

हो :)

nishapari
Tue, 09/03/2019 - 10:59 नवीन
हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

चित्रपटाचा पहिला हाफ चांगला

महासंग्राम
Tue, 09/03/2019 - 09:50 नवीन
चित्रपटाचा पहिला हाफ चांगला आहे पण दुसरा हाफ अगदी गुडी गुडी केलाय. चित्रपट बडावून केस वर आधारित आहे, ज्यात बळी सवर्ण आहेत असं म्हंटल गेलंय, चित्रपटात नेमकं उलटं दाखवलंय.
  • Log in or register to post comments

सवर्ण ?

जॉनविक्क
Tue, 09/03/2019 - 14:13 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

उत्कृष्ठ सिनेमा

मारवा
Sun, 09/08/2019 - 09:25 नवीन
यावर चर्चा होत नाही होणार नाही मिडीया ही याला हात लावायला कचरतो.
  • Log in or register to post comments

छान! चित्रपट चांगला असेलच .......

सुधीर कांदळकर
Sun, 09/08/2019 - 09:51 नवीन
आपण किती पोटतिडिकीने लिहिलं आहे हे जाणवतं! छान लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

समाजात तेढ वाढवणारे चित्रपट

तमराज किल्विष
Sun, 09/08/2019 - 14:02 नवीन
समाजात तेढ वाढवणारे चित्रपट वाढलेत आणि त्याला हवा देणारे चित्रपट समिक्षक? सुध्दा वाढलेत. एखाद्या घटनेचे सरसकटीकरण करणं हा विघ्नसंतोषी लोकांचा हातखंडा विषय आहे.
  • Log in or register to post comments

नावातक कायदा असणारा हा चित्रपट

जॉनविक्क
Sun, 09/08/2019 - 14:10 नवीन
आधीच असलेली तेढ फक्त पुढे आणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

वास्तव अप्रिय आहे म्हणून स्वीप इट अंडर द कारपेट ?

मारवा
Sun, 09/08/2019 - 17:26 नवीन
समाजात तेढ वाढवणारे चित्रपट वाढलेत वास्तव हे जर अप्रिय आहे तर त्याला ते मुळी अस्तित्वातच नाहीत असा गोड गैरसमज करुन वावरण्यापेक्षा. ते जसं आहे ते तसं अगोदर समजुन घेणे स्वीकार करणे ते बदलण्याची पहीली पायरी असते. मुळात वास्तवाचं भान च नसेल व ऑल इज वेल च आहे हा भ्रम असेल तर असा एखादा चित्रपट साखर झोपेत असलेल्याला झोपमोड झाल्यावर येते तशी फिलींग देतो. हा झोपमोड झाल्याने आलेला राग समजण्यासारखा आहे. याने तेढ वाढण्यापेक्षा भान येते व भान आल्याने थोडीफार संवेदनशीलता करूणा निर्माण होण्यास किमान मदत होते असे माझे मत आहे. या वास्तव स्वीकारानंतरच बदल होऊ शकतो अगोदर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

जनता भानावर आहे असे तुम्हाला

तमराज किल्विष
Sun, 09/08/2019 - 17:36 नवीन
जनता भानावर आहे असे तुम्हाला वाटते काय
  • Log in or register to post comments

अत्यंत सुंदर चित्रपट

स्वधर्म
Mon, 09/23/2019 - 13:55 नवीन
हिंदी सिनेमे फार पाहू शकत नाही, पण हा निश्चितपणे एक पहायलाच पाहिजे असा चित्रपट अाहे. बटबटीतपणाचा मोह टाळून तरलपणे, अाक्रस्ताळेपणा न करता जे मांडायचं ते समोर मांडलंय. एक दोन वेळा तरी भावनेला हात घालतो हा चित्रपट! निशापरी यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा