✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पावसाच्या धारा

ब — बिपीन सुरेश सांगळे, Tue, 07/30/2019 - 09:05
पावसाच्या धारा -------------------------------------------------------------------------------- पावसाच्या धारा भन्नाट वारा टपटप टपटप पागोळ्या दारा पोरं घरामध्ये बसली अडकून वीज कडाडे ढगोबा धडकून लख्ख प्रकाश आकाश तडकून पावसाचा तोरा धिंगाणा सारा पावसाच्या धारा पाणी साठले त्यात खेळू या धबक धबक ते उडवू या पाण्यात होड्या चला सोडू या पाण्यात भोवरा फिरे गरागरा पावसाच्या धारा तुडुंब पाणी वाहते खळाळून चालावे कसे ? किती सांभाळुन ? कागदाच्या होड्या जाती गोंधळून पावसाचा जोरा तडमतडम नारा पावसाच्या धारा किती पडतो कसा पडतो कधी झरतो कधी दडतो कधी हळूच कधी वाढतो पावसाचा होरा कळे ना पोरा पावसाच्या धारा --------------------------------------------------------- बिपीन सांगळे

प्रतिक्रिया द्या
1087 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा