✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते दोघे

श — शिव कन्या, Sat, 02/16/2019 - 01:10
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
2241 वाचन

💬 प्रतिसाद (2)

अप्रतिम!

चांदणे संदीप
Sat, 02/16/2019 - 07:07 नवीन
बऱ्याच दिवसानंतर मिपावर सुंगधी काव्यपुष्प उमललं आहे. Sandy
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Sat, 02/16/2019 - 07:40 नवीन
अप्रतिम काव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा