Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Sat, 01/12/2019 - 12:36
आंतरजाल न वापरता प्रामाणिकपणे मनात येणारं जे काही असेल ते उत्तर लिहायचं आहे. चर्चा नंतर करु. अनेकांना हा प्रश्न माहीत असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी.. काहीसा स्वैर रुपांतर करुन. एका लकी ड्रॉ टाईप रियालिटी शोमध्ये स्टेजवर तीन बंद दरवाजे आहेत. त्यातल्या कोणत्यातरी एका दरवाज्यामागे बंपर इनाम ऊर्फ बीएमडब्लू x१ कार लपलेली आहे. बाकी दोन दरवाज्यांमागे प्रत्येकी एक एक बोकड आहे. तुम्ही एक दरवाजा निवडायचा आहे. त्या दरवाजामागे काय निघेल त्यावर बीएमडब्लू किंवा मटणरस्सा नेमकं काय नशिबात आहे ते ठरेल. मटणरस्सा एरवी परवडत असल्याने आपल्याला कार जिंकायचीच इच्छा आहे. रियालिटी शोचा होस्ट तुम्हाला चॉईस विचारतो.. दरवाजा क्रमांक एक, दोन की तीन? तुम्ही सांगता दरवाजा नंबर "एक". पण होस्ट दरवाजा नंबर एक उघडण्याऐवजी दरवाजा नंबर तीन उघडतो आणि आत बोकड दिसतो. होस्ट आता उदारपणे ऑफर करतो.. "बघा, तीन नंबरला बोकड आहे, आता उरले दोन दरवाजे.. नंबर एक आणि नंबर दोन.. तुम्ही नंबर एकचा दरवाजा आधीच निवडला आहे. तुम्हाला आता चॉईस बदलायचा असला तर मी संधी देतो.. बोला.. " नोंद घ्या: ही ट्रिक ते नेहमी वापरतात. का कोण जाणे.. पण एक मात्र आहे की होस्ट जो दरवाजा तुम्हाला उघडून दाखवतो तो नेहमी बोकडवाल्यांपैकीच एक असतो. (म्हणजे निरुपयोगी) आणि त्यामुळे आता दोनच बंद दरवाजे उरतात.. एक कारवाला आणि एक बोकडवाला.. त्यातला कोणतातरी एक तुम्ही आधीच सिलेक्ट केलेला असतो. आता अशा स्थितीत नंबर तीनचा दरवाजा बोकडवाला आहे हे होस्टने उदारपणे उघड करून देऊन चॉईस बदलण्याची ऑफर केल्यावर तुम्ही मुळात निवडलेला चॉईस, म्हणजे इथे दरवाजा नंबर १ हा तसाच ठेवाल की बदलून दरवाजा नंबर २ निवडाल ? का?
  • Log in or register to post comments
  • 18889 views

प्रतिक्रिया

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 01/12/2019 - 12:43

Permalink

छान

अमिताभचा 3 पत्ती मूवी बघा
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 01/12/2019 - 13:35

Permalink

नक्की सांगता येत नाहि

पण कदाचीत पहिल्या चॉईसवर ठाम असेल. नशीबाचे फासे फेकण्याचं एक्साइटमेण्ट पहिल्या चॉईसच्यावेळी जेव्हढं स्ट्राँग असेल तेव्हढं कदाचीत दुसर्‍यावेळी नसणार. शिवाय तिसरा दरवाजा बोकडाचा निघाला म्हणजे आपला चॉईस ५०% बरोब्बर आहे हे एक समाधान+आशा मनात असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 01/12/2019 - 13:58

Permalink

आपण तर ब्वा सरळ.

आपण तर ब्वा सरळ. होस्ट चॉईस चेंज करायचा ऑप्शन देतोय म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 01/12/2019 - 16:49

In reply to आपण तर ब्वा सरळ. by आनन्दा

Permalink

असं समजा की तो तुम्ही केलेला

असं समजा की तो तुम्ही केलेला चॉईस सोडून बाकीच्यातला कोणताही एक दरवाजा उघडतो. - त्यात कार दिसली तर "सॉरी, तुम्ही हरलात" असं म्हणून गेम संपवतो. - त्यात जर बोकड दिसला तर तुम्हाला चॉईस देतो की मूळ निवड बदलायची आहे का? आता काय कराल ? काही फरक आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 01/12/2019 - 22:36

In reply to असं समजा की तो तुम्ही केलेला by गवि

Permalink

सॉरी, मी मागचे उत्तर

सॉरी, मी मागचे उत्तर टाकल्यावर गुगल करुन बघितलं. त्यामुळे आता स्पॉयलर टाकण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Sat, 01/12/2019 - 14:14

Permalink

पहिल्या उत्तरावरच ठाम राहणे पसंत करीन !

पहिल्या उत्तरावरच ठाम राहणे पसंत करीन !
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 01/12/2019 - 14:28

In reply to पहिल्या उत्तरावरच ठाम राहणे पसंत करीन ! by टर्मीनेटर

Permalink

छान

स्टेटीटिक्स सांगते की उत्तर बदलले तर जिंकण्याचे चान्सेस वाढतात ,
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 01/12/2019 - 16:40

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

कसं काय ब्वॉ?

कसं काय ब्वॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 01/12/2019 - 16:49

In reply to कसं काय ब्वॉ? by दादा कोंडके

Permalink

छान

धाग्याचे मालक बोलले आहेत , गुगल करू नका , म्हणून इथे लिंक देत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 01/12/2019 - 22:31

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

रोचक

इथं उत्तर वाचूनही मला प्रोबॅबिलिटी ५०-५० वाटली होती. गुगल्यावर कळलं. कारण मिमांसा अनेक पद्धतीनं दिली आहे. त्यातल्या काही इंट्युटिव्ह आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Sat, 01/12/2019 - 17:05

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Agree

Agree
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 01/12/2019 - 21:37

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

स्टेटीटिक्स सांगते की उत्तर

स्टेटीटिक्स सांगते की उत्तर बदलले तर जिंकण्याचे चान्सेस वाढतात , काहीही, स्टेटीटिक्स काय वाचुन येते का ? का तुम्हाला ते गुढग्यासाठी धनगराच तेल वापरण्या ईतक सोप्प वाटल ?
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 01/12/2019 - 21:58

In reply to स्टेटीटिक्स सांगते की उत्तर by डँबिस००७

Permalink

छान

अमिताभ चा 3 पत्ती बघा, गुगलवर Monty Hall problem घाला.
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 01/12/2019 - 22:06

In reply to स्टेटीटिक्स सांगते की उत्तर by डँबिस००७

Permalink

गुगळुन बघा.

Here’s the game: Do you stick with door A (original guess) or switch to the unopened door? Does it matter? Surprisingly, the odds aren’t 50-50. If you switch doors you’ll win 2/3 of the time! Today let’s get an intuition for why a simple game could be so baffling. The game is really about re-evaluating your decisions as new information emerges. काहीतरी गूढ आहे , म्हणूनच हे कोडे आहे ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 01/12/2019 - 22:35

In reply to गुगळुन बघा. by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

आपण विरोधक आहोत ना? मग

आपण विरोधक आहोत ना? मग तुमच्याशी मी सहमत कसा? खरे तर उत्तर सरळ आहे, पण त्याला काही कन्डिशन पण आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 01/12/2019 - 22:46

In reply to आपण विरोधक आहोत ना? मग by आनन्दा

Permalink

होस्ट नेहमी बोकडवालं दारच

होस्ट नेहमी बोकडवालं दारच उघडून दाखवतो हे गृहीतक धाग्यात उल्लेखलं आहे. यातच हे अध्याहृत आहे की त्याने उर्वरित दोन्ही दरवाजामागे काय आहे ते पाहिलेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 01/14/2019 - 07:56

In reply to होस्ट नेहमी बोकडवालं दारच by गवि

Permalink

कौन बनेगा करोडपती

पहिल्या एक दोन सिजन्समध्ये जर एखादा स्पर्धक चुकीचे उत्तर देता असेल तर अमिताभ आवर्जून तीन चार पाच वेळा सांगायचे -'अजून विचार करा', 'नक्की?', 'आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे तुम्ही विचार करा', 'तुम्ही पर्याय बदलू शकता'. जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर माहिती असते आणि स्पर्धक चुकीचा पर्याय निवडतोय तेव्हा (उपयोग नसताना) आपण घरून त्याला सांगतो, अरे तो एवढा जीव तोडून सांगतोय, पर्याय बदल!!
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Mon, 01/14/2019 - 10:52

In reply to कौन बनेगा करोडपती by तुषार काळभोर

Permalink

जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर

जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर माहिती असते आणि स्पर्धक चुकीचा पर्याय निवडतोय तेव्हा (उपयोग नसताना) आपण घरून त्याला सांगतो, अरे तो एवढा जीव तोडून सांगतोय, पर्याय बदल!!
ही प्रतिक्रिया विशेष आवडली .... पटतंय
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Sun, 01/13/2019 - 01:24

Permalink

The curious incident of the

The curious incident of the dog in the nighttime ह्या पुस्तकात हा प्रॉब्लेम वाचला. जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशवंत पाटील on Sun, 01/13/2019 - 12:50

Permalink

बदलुन आता नंबर दोन. कार

बदलुन आता नंबर दोन. कार नक्की बगा. कोणच्यातरी सिनेमात व्हतं म्हणे हे. आमचे साहेब लेक्चर देत व्हते मला तवा स्टोरी सांगितले व्हते, म्हणूनशान ध्यानात हाय.
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sun, 01/13/2019 - 15:13

In reply to बदलुन आता नंबर दोन. कार by यशवंत पाटील

Permalink

३ पत्ती का ?

बच्चन आणि साक्षात महात्मा बेन किंगले आहेत. तोच का ? बचचनाचा डायलॉग आहे , जर एखादा ऑप्शन समोर असेल , तो फिक्स केला आहे आणि अचानक दुसरा ऑप्शन आला तर काय कराल ? बच्चंन चे म्हणणे की नवा ऑप्शन फायदेशीर असतो म्हणे . ( बहुतेक हे ऐशवर्याने सलमानला नाकारून अभिषेकला हो म्हटल्याबद्दल आहे का , माहीत नाही . ) त्यात बच्चंन गणिती प्रोफेसर असतो व महात्मा बेन जादूगार असतो , बच्चन त्याची गोष्ट सांगतो तर सिनेमाच संपतो , महात्मा बेन ची गोष्ट बहुतेक शिकवेलमध्ये येईल , पण तो भाग अजून आलाच नाही .
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sun, 01/13/2019 - 12:55

Permalink

2019 साली

2019 साली निवडणूकीच्या दाराने मागचा बोकड बदला ! असा संदेश देऊ इच्छितात का ??
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sun, 01/13/2019 - 15:05

In reply to 2019 साली by कपिलमुनी

Permalink

छान

मीही हेच लिहिणार होतो , पण लोक वराडतील म्हणून लीवले नव्हते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 01/14/2019 - 08:32

Permalink

रोचक धागा आणि प्रतिसाद.

रोचक धागा आणि प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Mon, 01/14/2019 - 12:36

Permalink

ठाम राहणे!

होस्टला उत्तर माहित होत असं मी गृहीत धरलं होत आणि खाली स्क्रॉल करताना आपण ते लिहिलंच आहे असं दिसलं. आता होस्ट आपल्या बाजूने नसणार हे दुसरं गृहीतक. त्यामुळे तो आपलं बरोबर उत्तर बदलायला भाग पाडतोय असा विचार करून पर्याय १ च कायम ठेवेन. आता ते स्टॅटिस्टिक्स वगैरे काय विचार केला नाही म्हणा :)
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Mon, 01/14/2019 - 13:08

In reply to ठाम राहणे! by लई भारी

Permalink

I wish I could change my

I wish I could change my answer! :P गुगलून बघितलं. interesting आहे हे!
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Mon, 01/14/2019 - 13:11

Permalink

मी पहिल्या पर्यायालाच धरून

मी पहिल्या पर्यायालाच धरून राहीन . गाडी अली तर ठीक अन्यथा बोकडावर बसून घरी जाईन ..
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Mon, 01/14/2019 - 14:30

Permalink

टॅटेस्टीक काहीही सांगत असेल, तरी…

त्याने तुंम्हाला कसा फरक पडेल? वैद्यकात पण स्टॅटेस्टीक्स अाहेच. समजा मला एक उपचार पध्दती निवडायची अाहे, ज्यामध्ये ९०% लोक वाचतात, १०% मरतात असे स्टॅटेस्टीक्स सांगते. पण स्टॅटेस्टीक्स हे कधीच सांगू शकत नाही की मी ९०% त असणार अाहे की १०% त असणार अाहे. मी अजून गुगल करून पाहिलेले नाही. पण स्टॅटेस्टीक्स पेक्षा इथे होस्टबाबतचा अंदाज अाधिक वापरला जाणार अाहे. होस्ट अापल्याला जिंकू देण्याकडे झुकलेला असेल की शक्यतो कार जिंकली जाऊ नये हे पाहणारा असेल, याचा अंदाज निवड ठरवतो. या अशा प्रकारात स्टॅटेस्टीक्सवर भरवसा ठेवण्याने फार काही फरक पडेल असे वाटत नाही. यावरून स्टॅटेस्टीक्स बाबतचा एक विनोद अाठवला. संख्याशास्त्रज्ञ जर विमानातून जाणार असेल, तर तो नेहमी स्वत:बरोबर एक पिस्तूल ठेवेल. कारण कोणीही विमानात पिस्तूल अाणण्याची शक्यता लाखात एक अाहे, पण कोणी दोन व्यक्तींनी विमानात पिस्तूल अाणण्याची शक्यता मात्र ४ लाखात एक अाहे. सबब संख्याशास्त्रज्ञ अापल्यासोबत पिस्तूल नेऊन अापला धोका चार पट कमी करेल. पण हा विनोद अाहे! अाता गुगल करून पहायला मोकळा.
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 01/14/2019 - 15:11

Permalink

छान

आमचेही सर विनोद सांगायचे. एक संख्याशास्त्रज्ञ शिकारीला जातो , तो वाघावर दोन गोळ्या झाडतो. एक वाघाच्या पुढून 1 फूट अंतरावरून जाते , दुसरी गोळी वाघाच्या मागून 1 फुटावरून जाते, तो हिशोब करतो , वाघ मेला ! दोघांची सरासरी सेंटरला येते
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 01/16/2019 - 12:21

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

आपले डोके भट्टीत ठेवले आणि

आपले डोके भट्टीत ठेवले आणि पाय बर्फाच्या पेटित ठेवले तर सरासरी तपमान २३ अंश सेल्सियस असल्याने आपल्याला आल्हाददायक वाटते असे संख्याशास्त्र सांगते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 01/14/2019 - 15:32

Permalink

म्हणूनच संख्याशास्त्र सम

म्हणूनच संख्याशास्त्र सम संख्येत असलेली तथ्ये नाकारते. विषम संख्येत असलेल्या तथ्याना ग्राह्य मानते
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 01/16/2019 - 12:22

In reply to म्हणूनच संख्याशास्त्र सम by विजुभाऊ

Permalink

तपमान २३ अंश सेल्सियस हे विषम

तपमान २३ अंश सेल्सियस हे विषम असल्याने ग्राह्य धरावे लागेल. ))=((
  • Log in or register to post comments

Submitted by अकिलिज on Mon, 01/14/2019 - 20:31

Permalink

मला वाटतंय.....

होस्ट असं फुकट गाडी द्यायला नाही बसलाय. त्याला तुम्हाला गाडी जिंकूच द्यायची नाहीये. म्हणुनच तर त्याने पुढचा पर्याय विचारला असावा. दरवाजा नंबर १ वर गाडी असती आणि त्याला द्यायची असती तर त्याने उगाच पर्याय बदलायची संधी दिली नसती. जरा उशीरानं गुगलुन बघतो.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Tue, 01/15/2019 - 07:01

Permalink

प्रतिसाद न वाचता आणि उत्तर न

प्रतिसाद न वाचता आणि उत्तर न गुगलता माझे उत्तर - आधीच्याच पर्यायावर ठाम राहेन असे होते. प्रतिसाद वाचल्यावर गोंधळले :D
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 01/16/2019 - 07:34

Permalink

केविन स्पेसी, "21" मधे हा

केविन स्पेसी, "21" मधे हा प्रश्न आणि त्याचं हेच उत्तर वापरलं होतं....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com