✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाकळी!

द — दिनेश५७, Sun, 10/21/2018 - 11:55
सकाळ झाली कोवळी किरणे अंगावर आली अन् पाकळ्यांनी हळूच डोळे किलकिले केले एक फुलपाखरू बागडतच पाकळीवर येऊन बसले अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या फूल फूल होऊन गेल्या... किरणांनी न्हाऊन ताज्या झाल्या, वाऱ्यासंगे डोलू लागल्या, सुगंध उधळत झुलू लागल्या... उमलत्या पाकळ्यांना फुलपाखरांचे थवे गुदगुल्या करू लागले अन् हसूहसूं होऊन पाकळ्या लाजल्या... सारा दिवस तोच खेळ! तिन्हिसांजा झाल्या किरणांनी अलगद दडी मारली पंख मिटून फुलपाखरांनी पानाआड दडी मारली... कोवळी पालवी मिटू लागली... वाराही मिटून गेल्यागत चिडीचूप होऊन बसला... उजेडही मिटून गेला, अन् दिवसभर डोळे मिटून बसलेल्या अंधाराला जाग आली... अचानक अंगावर आलेला अंधार पाहून घाबरलेल्या पाकळ्यांनी डोळे मिटून घेतले मिटूमिटू पाहणाऱ्या नजरा पेंगाळून गेल्या, अन् सारे रान मिटून गेलं... सकाळ झाली की उठून जाऊ तोवर सगळे मिटून घेऊ... शहाणं झाड पाकळ्यांना म्हणाले, अन् फूलफूल झालेल्या पाकळ्या सगळ्या पुन्हा मिटून गेल्या!!

प्रतिक्रिया द्या
1150 वाचन

💬 प्रतिसाद (2)

अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या

खिलजि
Mon, 10/22/2018 - 15:25 नवीन
अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या फूल फूल होऊन गेल्या... म्हणजे प्रत्येक पाकळीचं फुल झालं असं अभिप्रेत आहे का ? मला उत्तर पाहिजे राव , नाहीतर डोक्याला शॉट शॉट बसून राहतील .. हे घ्या
  • Log in or register to post comments

गुढता महत्वाची आहे. जे जे

पाषाणभेद
Wed, 10/24/2018 - 08:44 नवीन
गुढता महत्वाची आहे. जे जे पाहीजे ते ते घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा