भाळी लाल कुंकु
भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका
मस्त..
उजळते माझे जीवन
उजळते माझे जीवन अकुकाकाहे वाचलं आणि जरासा दचकलोच ! :) छान आहे काव्य.छान आहे कविता...
खूप छान कविता
सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजलायात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकलीखालच्या दोन ओळींचा जुळवलाय त्यांनी
सकाळची तुझी लगबग
आळीपाळीने कुंथु!
आवडली
कविता आवडली.