✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्हाॅट्स अॅप संन्यास

ब — बाजीगर, Sat, 07/28/2018 - 07:26
"हॅलो" "तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर" "बर,लगेच करतो" आम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले" मौनातच संयमीत उद्रेक झाला... व्हाॅट्स अॅप संन्यास बरे झाले देवा, WA सोडविला, पाश तोडविला, आंतर्जाल । अपुलेच सांगती पोस्ट तुझे फार, त्यांना होतो भार, नेटपॅक। कसे हे आले, आम्हावरी बंधन म्हणे करा लंघन, थोडा वेळ। आम्हावरी सेंसाॅर, इतकेच खोकणे, तितकेच पादणे ते नै होणे आम्हा चिये। आम्हा घरी आहे, शब्दांचेच धन, त्यावरी राशन? नामंजूर । आम्हा ठावे करावे सदा प्रेम बेदम, असो बातों मे दम, सर्वकाळ। अजून नाही काही, दिल का फूल मूर्झा, वळवू ही उर्जा, दूसरी कडे सध्या तरी घेतला, व्हाॅट्सप संन्यास, अता दूसरा ध्यास, घेऊ काही। प्रोग्राम पायथाॅन शिकू नवी भाषा, पूढे आहे आशा, लिहीण्याची। मौनातच आहे, जणू म्यान कारणा, तनू ध्यान धारणा चालतसे । जगण्यासाठी, गॅजेट्स, अवश्य ना, जणू विपश्यना, शांत पणे। जरी पाहो गेलो, आहे वरतोनी, येऊ परतोनी, कधीतरी। फुका म्हणे आता, सोपी पायवाट, अंतरीचा घाट, ऐकू जरा ।

प्रतिक्रिया द्या
3154 वाचन

💬 प्रतिसाद (6)

मस्त

प्रचेतस
Sat, 07/28/2018 - 08:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान!

Nitin Palkar
Sat, 07/28/2018 - 14:52 नवीन
भावला मनाला फुकाचा अभंग वाटे मना धरावा का तुमचाच संग....
  • Log in or register to post comments

सध्या काही

नाखु
Sun, 07/29/2018 - 11:05 नवीन
प्रमाणात मिपावर "उधर (उधार) का माल इधर "अशी योजना राबविण्यात येत आहे. "ढकलपत्र ढकलणार्यांना ढकला रे "संघाचा किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments

तुम्ही नक्की फॉरवर्ड

सतिश गावडे
Sun, 07/29/2018 - 12:36 नवीन
तुम्ही नक्की फॉरवर्ड संप्रदायाचे अनुयायी असणार. ;)
  • Log in or register to post comments

हही हही हही हही ही! =))

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/03/2018 - 16:21 नवीन
हही हही हही हही ही! =))
  • Log in or register to post comments

मस्त आहे.

सिद्धार्थ ४
Fri, 08/03/2018 - 17:05 नवीन
फॉरवर्ड करू का वाट्स अप वर ? :प
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा