नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
5 May 2018 - 11:45 pm
गाभा: 

नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )

जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट

नोकरी मिळवून देण्याचे काम आजकाल जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट कडून केले जाते . इतरही काही शब्द आहेत . आपण याला कन्सल्टन्ट असा शब्द वापरूया. या व्यवसाया विषयी आणि या लोका विषयी बरेच गैरसमज झाले आहेत आणि पसरवले जात आहेत . मी स्वात: या क्षेत्रात ३ काम वर्षे केले असल्याने या विषया वरून सुरुवात करीत आहे .

कोठल्याही कम्पनी मध्ये नोकरी देण्याची एक प्रक्रिया असते .
१) वेगवेगळी खाती ( डिपार्टमेंट्स ) कोणत्या माणसांची कोणत्या पदावर गरज आहे हे शोधतात
२) गरज हि वेवेगवेगळ्या कारणाने निर्माण होते - माणसे निवृत्त होतात , सोडून जातात, मरण पावतात किंवा वाढणाऱ्या कंपनीला अधिक माणसांची गरज लागते . लेखक - हेमंत वाघे
३) हि गरज वरिष्ठ अधिकारी मान्य करतात आणि ती नंतर मानव संसाधन ( Human Resources - HR ) डिपार्टमेंट कडे जाते . काही ठिकाणी या खात्या अंतर्गत रिक्रुटमेंट डिपार्टमेंट हि असते,

आता पुढची कामे - जसे कि जाहिरात देणे , रिस्युमे मागवणे , किंवा आधी असलेल्या प्रोफाइल बघणे , उमेदवार बोलावणे , मुलाखत ,एखादवेळी परीक्षा , पुढील मुलाखत , आणि मग योग्य उमेदवार मिळाला कि नोकरी ची ऑफर , त्या उमेदवाराने ऑफर नाकारली तर दुसऱ्या वेटलिस्ट मध्ये असलेल्या उमेदवारासाठी हीच प्रक्रिया ..

आता वाचायला हे सोपे वाटले तर हाच विचार येतो कि कम्पनी कडे एव्हडे एच आर किंवा रिक्रुटमेंट डिपार्टमेंट असताना जॉब कन्सल्टन्ट कडे का जातात ?

पूर्वी निदान हे कन्सल्टन्ट कमी होते , आणि ते स्वतःचा कॅन्डीडेट डेटाबेस तरी बनवून ठेवायचे .
मग नोकरी डॉट कॉम आणि इतर जॉब साईट आल्या आणि पैसे देऊन प्रचंड डेटाबेस बघायला मिळू लागला. ( ३ दिवस - १५० रिस्युम ला नोकरी ६५०० रुपये आकारते ) लिंकेडीन वर मिळाले तर अनेक प्रोफाइल फुकटात मिळू लागल्या . ( लिंकेडीन वर हि पैसे देऊन प्रोफेशनल सर्व्हिस आहे ) लेखक - हेमंत वाघे

मग या जॉब कन्सल्टन्ट ची गरज ?

१) हे कन्सल्टन्ट हे प्रोफेशनल असतात , हेच काम सतत करीत असल्याने ते अनेक प्रकारच्या प्रोफाइल शोधण्यात अति तज्ञ् झाले असतात .
२) अजून हि कन्सल्टन्ट स्वतचे डेटाबेस बनवतात , आणि तो विविध प्रकारे त्याचे अनालिसिस करून ठेवतात.
३) आज काळ नोकरी डॉट कॉम वर सध्या नोकरीच्या साठी उमेदवार शोधले तर हजारो प्रोफाइल मिळू शकतात , यात अनेक उमेदवार हे पूर्णतः त्या कामासाठी निरुपयोगी असू शकतात . त्यामुळे सुरुवातीची चाळणी हे अतिशय किचकट आणि कंटाळवाणे काम असते . एक्सपर्ट सर्च , स्मार्ट सर्च करून योग्य कॅन्डीडेट मिळू शकतात. तरी मी मिळालेल्या अनेक प्रोफाइल ला चाळणी लावावी लागते . लेखक - हेमंत वाघे
३) मग त्या लोकांना फोन / मेल करून त्यांना नोकरी पाहिजे का ते बघावे लागते . अनेकदा फोन करून त्यांना कम्पनी बद्दल माहिती द्यावी लागते - ती नोकरी " विकावी " लागते . आणि मग त्यांचा नवीन रिस्युम मागवून तपासावा लागतो
४) मग अजून एक चाळणी लावून यादी कम्पनीला दिली जाते .
५) नन्तर इंटरव्हू चे को ऑर्डिनेशन करणे , वेगवेगळ्या इंटरव्हू लेव्हल कॅन्डीडेट ला अपडेट करणे , आणि या प्रक्रियेतील इतर अनेक कामे कन्सल्टन्ट करतात .

कन्सल्टन्ट यासाठी फी सर्वसाधारण जागा साठी १ महिन्याचा पगार -८.३३ टक्के किंवा त्यापेक्षा थोडी कमी असू शकते . हल्ली या पेक्षा कमी फी त हि काम केलेजते . तसेच नोकरी लागलेल्या कॅन्डीडेट ची ३ ते ६ महिन्याची ग्यारेंटि असते . तो सोडून गेला तर दुसरा देण्यास मदत करावी लागते !
हे खूप ढोबळ मानाने लिहिले आहे . अजून हि अनेक सेवा यात दिल्या जातात.

सिनिअर पोस्ट ला गुंतागुंत जास्त असल्याने फी जास्त असते. CEO किंवा डायरेक्टर किंवा व्हाईस प्रेसिडेंट अशा पद साठी ती २० ते ३० टक्के हि जाऊ शकते . अनेकदा या कामासाठी वेगळे स्पेशालिटी कन्सल्टन्ट असतात आणि ते एका वेळी फार कमी असाइनमेंट वर काम करीत असतात. प्रचंड पगारामुळे कमी असाइनमेंट मध्ये फी पण बक्कळ मिळू शकते .

आता लक्षात आले असेल कि अनेक कम्पनित कन्सल्टन्ट ला टाळून जाऊ शकत नाही . काही वेळा कम्पनी ने प्रमाणित केले असेल तर कम्पनी साठी कन्सल्टन्ट च जाहिरात हि देतात .

तसेच अनेक वेळा
१) कन्सल्टन्ट रेस्युमे सुधारून देतात . नवीन कसा लिहावा ते सांगतात.
२) जर उमेदवार ( candidate ) जर प्लेस होण्यासारखा असेल तर काही कन्सल्टन्ट बोलावून इंटरव्हू तयारी हि करून घेतात
३) काही वेळा कन्सल्टन्ट चांगला करिअर सल्ला देऊ शकतात . लेखक - हेमंत वाघे
४) कन्सल्टन्ट रेस्युम ठेवून घेतात . चांगला रॅपो असेल तर एकदा बोलल्या नन्तर काही काळाने जॉब चा कॉल आल्याची अनेक उदाहरणे आहेत .

आज काळ डॉकटर प्रमाणे कन्सल्टन्ट हि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट बनू लागले आहेत . अनेक जण फक्त ठराविक इंडस्ट्री च सांभाळतात . फक्त आय टी साठी काही आहेत आणि काही जण तर आय टी मधील विशिष्ट कसेतरी जसे कि सॅप वर च काम करणारे आहेत . फक्त सिनिअर जागा त्या पण विशिष्ठ इंडस्ट्री तीळ बघणारे पण आहेत ( मी अशाच एका कन्सल्टन्ट कडे काम केले होते) लेखक - हेमंत वाघे

आता सर्वात महत्वाचा प्रश्न - उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ?
शून्य - काहीही नाही.

माहितीतील चांगले कन्सल्टन्ट उमेदवाराकडून काहीही फी घेत नव्हते . सर्व फी ते कंपनी कडून घेतात .

आता काही लोक टोकन फी , रजिस्टरेशन फी म्हणून काही रक्कम घेतात - खरे तर ती हि देवू नये . शेकडो फुकट काम करणारे कन्सल्टन्ट आहेत.
तर जे नोकरी शोधात आहेत त्यांना चांगल्या कन्सल्टन्ट च फोन येवो आणि चांगली नोकरी मिळो ! लेखक - हेमंत वाघे

पुढील भागात नोकरी शोधण्यातील अनेक विषयावर लिहिण्याचा इरादा आहे . तरी आपल्याला काय पाहिजे ते लिहा . आशा आहे कि मी काही तरी उपयोगाचे लिहीन.

धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com
https://naukrishodh.blogspot.in/

प्रतिक्रिया

उत्तम लेख आहे. थोडे अजून सविस्तर लिहू शकाल का?

रानरेडा's picture

6 May 2018 - 7:28 am | रानरेडा

आपल्याला नक्की काय पाहिजे आहे ते कळले तर त्या प्रमाणे लिहिता येईल
या विषय संदर्भात अनेक छोटे छोटे लेख लिहिण्याचा मानस आहे . आणि माझ्या दृष्टीने तरी नोकरी मिळणे , टी चांगली असणे आणि टिकून रहाणे हे फार महत्वाचे झाले आहे . अपवादात्मक परिस्थितीत सरकारी नोकर्या हि जात आहेत किंवा सोडाव्या लागत आहेत . त्यामुळे लिहू तेव्हडे थोडेच .
मला थोडा लेख मोठा वाटला होता , आपणास थोडा अधिक सविस्तर पाहिजे आहे हे ऐकून आनंद झाला . तरी जरूर सांगा. आपल्या दृष्टीने छोटी शी शंका एखाद वेळे मोठ्या लेखाचा विषय असू शकते आणि त्यापेक्षा हि कोणासाठी फार फार महत्वाची असू शकते .
परत एकदा धन्यवाद . प्रतिसादाच्या अपेक्षेत . आणि हो गुगल मध्ये मराठी लेखन मी अजूनही चांगले करू शकत नाही , तेव्हा अक्षरास ( लेखनास) हसू नये . ;)
हेमंत

कपिलमुनी's picture

6 May 2018 - 1:10 am | कपिलमुनी

शंका म्हणून विचारले ?
No offense

रानरेडा's picture

6 May 2018 - 7:44 am | रानरेडा

ओक एक disclaimer द्यायचा राहिला - मी पूर्वी या व्यवसायात होतो , आज नाही आहे .

आणि या लेखाने सुरुवात केली कारण मी ४-५ काहीही माहिती नसलेल्या लोकांकडून ऐकले कि त्यांनी कन्सल्टन्ट ला काहीही ऐकून न घेता धुडकावून लावले , काही म्हणाले कि सरळ कम्पनी सम्पर्क करणार कि ?
पण कम्पनी जर प्राथमिक प्रक्रिया आउटसोर्स केली असेल तर बोलावणे येणार कसे ?
आणि हे हि माहित असले पाहिजे कि आपण असे कोणी स्पेशल नसतो . अगदी जनरल मॅनेजर साठी शेकडो प्रोफाइल मिळायचे मी स्वतः: अनुभवले आहे . त्यामुळे तुम्ही नकार दिला तर शेकडो पर्याय असू शकतात .
आणि तरी हि मार्केट मध्ये चांगल्या लोकांनी छानछान काडी हि असतेच - योग्य लोक योग्य त्या किमतीत योग्य वेळी योग्य वेळी मिळत नाहीत
माझा हा डिस्कनेक्ट दूर करण्याचा प्रयत्न राहील.

आणि तसे हि मी श्रेय देतो आणि माझ्या कामाचे श्रेय घेतो . मराठी पुस्तक लिहून पैसे सुटत नाही . आणि मराठी ब्लॉग लिहून / साईट काढून तर नाहीच नाही ;) . गुगल मराठी ला आज हि ad सेन्स देत नाही .;)
-हेमंत

शेखरमोघे's picture

6 May 2018 - 7:47 am | शेखरमोघे

छान माहितीपूर्ण लेख!

सतिश गावडे's picture

6 May 2018 - 9:23 am | सतिश गावडे

माहितीपूर्ण लेख. या विषयावर आपण अधिक लिहावे.

( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )

ही युक्ती लेखकाचा नामोल्लेख न करता लेख व्हाट्सापवर पुढे ढकलत राहणार्‍यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आहे का? म्हणजे कुणी हा लेख तुमचा लेखक म्हणून उल्लेख न करता पुढे ढकलला तर वाचणार्‍याला दर दोन तीन वाक्यांनंतर लेखक - हेमंत वाघे असा वॉटरमार्क* वाचावा लागेल? ;)

*इथे वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते.

रानरेडा's picture

6 May 2018 - 10:02 am | रानरेडा

वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते - मलाही वाटले . पण एका अर्थाने बरोबर हि असावे . न दिसणारे वॉटरमार्क किंवा क्लू हि असतात . जसे कि आता आठवते कि डायरेक्टर जोन वू च्या चित्रपटात कबुतरे दिसायची . ९ म्हणून टी काही हिंदी चित्रपटात हि दिसतात ;)

टवाळ कार्टा's picture

6 May 2018 - 9:29 am | टवाळ कार्टा

अजून लिहा

काही वेब साईट्स तुम्ही नोकरी वर तुमचे प्रोफाइल अपलोड केले की लगेच तुम्हाला फोन करतात (उदा जॉबस्ट्रीट. कॉम ) हे फोन गुरगाव किंवा लखनऊ वरुन येतात
त्या नंतर ते तुमचे प्रोफाईल परदेशी नोकरी साठी योग्य आहे. तुम्हाला परदेशी जॉब मिळेल. पण त्यासाठी त्यांच्या साईटवर नोंदणी करा आणि तुमचे प्रोफाईल सर्च मधे वर यावे म्हणून काही फी आकारतात. त्या नंतरही काही ना काही कारणासाठी पैसे भरायला सांगतात.
नोकरीच्या शोधात असलेले बिचारे याला बळी पडतात .कोणताही कन्सल्टन्ट तुमच्या कडून जर फी घेत असेल तर तो फेक ,भोंदू आहे असे समजा.

विजुभाऊ's picture

6 May 2018 - 1:17 pm | विजुभाऊ

जॉबीश.कॉम आणि क्वीक जॉब्ज .कॉम यांच्या च्या फसवणूकीच्या तक्रारींबद्दल येथे वाचता येईल
https://www.consumercomplaints.in/jobishh-com-b115467
https://www.mouthshut.com/review/Jobishh-com-review-ospusqpspmm
Jobishh calls from +911166257676.
https://www.complaintboard.in/complaints-reviews/quick-jobs-l205165.html

जॉब शोधताना फसवणूक कशी होते ते इथे समजेल
https://www.hindustantimes.com/interactives/inside-fake-job-industry/

माहितगार's picture

6 May 2018 - 3:32 pm | माहितगार

....आता सर्वात महत्वाचा प्रश्न - उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ? शून्य - काहीही नाही.

हे वाक्य लेखात जास्त आधी आले असते तर बरे झाले असे वाटते कारण कन्सल्टंट एक महिन्याचा पगार कंपनीला चार्ज करतात हे लेखात चटकन लक्षात येत नाही.

काही छोट्या कंपन्या खासकरुन ज्यांचा मॅन पॉवर टर्न ओव्हर अधिक असतो किंवा कँडीडेटची पिळवणूकीशी देणे घेणे नसते अशा कंपन्या कन्सल्टंट ना कँडीडॅटाच्।या पगारातून पैसे घेण्यास सांगतात आणि असे काही कन्सल्टंट गरजूंची सर्व सर्टिफीकेट स्वतःकडे ठेऊन घेऊन चक्क वेठ बिगारी करुन घेताना दिसतात. असे वेठ बिगारी करुन घेतलेले कर्मचारी कामात नीट लक्ष घालू शकत नाहीत त्यामुळे कंपन्यांनी असे आग्रह टाळून मॅन पॉवर टर्न ऑव्हर जास्त असण्याची स्वतःची कारणे शोधून त्या उणीवा भरुन काढल्या पाहीजेत असे वाटते.

दुसरे नौकरिची गरज असेल तर प्रत्येक कंपनीला स्वतः बायोडाटा शंभर वेळा पाठवा स्वतः शंभर चकरा करा, ओळखीच्या लोकांची मदत मागा पण पैसे मागणार्‍या कन्सल्टंट च्या चक्रात शक्यतो अडकू नका असे उमेदवारांना सुचवावेसे वाटते , त्यातला सर्वात वाईट भाग तुमची सर्टीफीकेट ठेऊन घेण्याचा असतो तो पूर्णतः टाळावा.

काही गरजू उमेदवार चांगल्या नौकरीच्या आशेने पैसे न घेणार्‍या कन्सल्टंट ना स्वतःहूनच पैसे देण्याची तयारी दर्शवतात हे ही टाळले पाहीजे कारण कन्सल्टंट कडे एखादा फसवणूक करणारा कर्मचारी असेल तर जी नौकरी तुम्हाला तशीही मिळायची होती त्या साठी पैसे मागेल आणि तुमचे हकनाक आर्थीक नुकसान होईल.

पण बऱ्याच चांगल्या कम्पन्या सध्या फक्त कन्सल्टन्ट कडूनच पहिली प्रक्रिया पूर्ण करतात . कारण आधी सांगितले तसे कि एका पद साठी शेकडो योग्य प्रोफाइल मिळू शकतात . आणि बऱ्याच दा कम्पनीला त्यात तो ठीक ठाक बसतो तो चालतो . खरे तर अनेक कामे अशी असतात कि त्यात फार हुशार , फार क्रिएटिव्ह माणसे कंटकतात . कॉल सेंटर , शॉप फ्लोर हि काही उदाहरणे आहेत . तिकडे ठीक ठाक च लोक घेतले तर अनेक वर्षे टिकतात . त्यामुळे जर फुकट सेवा देणाऱ्या कन्सल्टन्ट कडे हि जायचे नाही असे ठरवले तर तुम्हाला काही कम्पन्यान्ची दारे कायमची बंद होऊ शकतात . तसेच चांगले कन्सल्टन्ट हे जर खरेच प्लेस होण्यासारखा असेल तर उमेदवार वर स्वतःची मेहनत घेतात . सुरुवातीच्या काळात मला भन्नाट रेस्युम च्या टिप्स , मुलाखतीचं टीप कन्सल्टन्ट ने दिल्या होत्या , हो आणि अगदी १ करोड चा CEO किंवा डायरेक्टर ची नेमणूक करायची असली तरी त्याला हि कधी कधी रेस्युमे बनवायची किंवा interview टिप्स देण्याची पाळी यायची .
अर्थात एक पैसे घेणाऱ्या कन्सल्टन्ट साठी २ किंवा ३ फुकट काम करणारे आहेत . आणि कागदपत्र ठेवून घेणे म्हणजे तर अजून भयंकर . नोकरी ची अवस्था अतिशय वाईट असल्याने आज काळ मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे . त्यामुळे सावध रहावे , या विषय वर पण थोडीशी माहिती आहे आणि आज आपण दिल्याने अजून काही कळले , त्या वर पण जरूर लिहीन . धन्यवाद .

माहितगार's picture

6 May 2018 - 3:43 pm | माहितगार

कन्सल्टंट कडून नौकरी शोधण्यात भारतात ज्या दोन मुख्य अडचणी येतात , कन्सल्टंट कडचे कर्मचारी कंपनीने जे क्वालिफीकेशन मागितले अगदी त्यावरच यांत्रिअक पणे काम करतात त्यामुळे १) ज्यांना चांगला प्रत्यक्ष अनुभव आहे, पण एज्युकेशनल क्वालिफीकेशन कंपनीने कन्सल्टंटला दिलेल्या यादी प्रमाणे एक्झॅक्टली जुळत नाही २) कामासाठी चालणारे अल्टर्नेट नाव असलेले शिक्षण आहे ३) अनुभव कंपनीने मागितल्या पेक्षा थोडाफार कमी जास्त आहे पण वस्तुतः कंपनिसाठी कँडीडॅट एक्च्युअली चपखल असू शकतो ४) अनुभव इतर क्षेत्रातून आहे आणि क्षेत्र बदलायचे आहे

अशा वेळी कन्सल्टंट कडचे कर्मचार्‍यांच्या गाळण्या अगदी डोळे झाकून लावल्या जातात , कंपन्यांच्या एच आर सुद्धा डॉळे झाकून यादीत न बसणारे कँडीडॅट नाकारतात .

अशी गाळणी लागल्याने जॉब मिळण्यास अडचण येते आहे हे लक्शात येण्यासही उमेदवारास वेळ लागतो अशावेळी जॉब वेबसाईट, वॉक इन इंटर व्ह्यू , ओळखीतून जॉब शोधणे, तुमचा अनुभव मॅच होतो अशा कंपनी तील संबंबधीत एच आर टाळून खास करुन स्पर्धक कंपनीच्या संबंधीत विभागातील वरीष्ठ आधिकार्‍याकडे डायरेक्ट पृच्छा करणे असे काही उपाय माहित आहेत . आजून कुणाला काही सुचत असल्यास सुचवावेत .

उपयोजक's picture

6 May 2018 - 4:35 pm | उपयोजक

उपयुक्त लेखमाला!!

मंदार कात्रे's picture

6 May 2018 - 5:11 pm | मंदार कात्रे

फार छान अन उपयोगी लेखमाला

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2018 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान लेखमाला. बरच मार्गदर्शन मिळतंय.

छान लेखमाला चालू केलीय. पुढील लेखनास शुभेच्छा!

manguu@mail.com's picture

7 May 2018 - 12:10 pm | manguu@mail.com

छान

नितिन थत्ते's picture

7 May 2018 - 1:39 pm | नितिन थत्ते

कन्सल्टंट हॉरिबल काम करतात.

बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात.

अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.

माहितगार's picture

7 May 2018 - 2:54 pm | माहितगार

...अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.

नाही म्हणजे , सध्या तुम्ही कामास असलेल्या कंपनीत तुमचा बायोडाटा कुणि फॉर्वर्ड करत असेल, किंवा तुम्ही जॉब शोधताय हे लीक करत असेल तर ,- सह्सा असे होत नाही -खरेच हॉरीबल असेल , इट वुड ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि ब्रीच ऑफ प्रायव्हसी अशा वेळी कन्सल्टन्सी ओनर कडे कडक शब्दात कंप्लेट केली पाहीजे . आणि करीअरचे नुकसान झाले तर नुकसान भरपाईसाठी कोर्टात नेण्यास हरकत नसावी .

अर्थात तुम्ही काम केलेल्या जुन्या कंपनी बद्दल तुमच्याकडे पुन्हा विचारणा केली जात असेल, आणि सॅलरी किंवा मोठ्या पोस्टची ऑफर असेल तर फार विचलीत होण्याचे कारणही नसावे, बर्‍याच कंपन्या स्पर्धक कंपनीतील माणसे , अनुभवी माणसे किंवा आपल्या ओळखीतील माणसेही डायरेक्ट ऑफर देण्यापेक्षा प्लेसमेंट एजन्सी थ्रू ऑफर देणे श्रेयस्कर समजतात, पण यातही बर्‍याच प्लेसमेंटस चा स्टाफ इतपत हलगर्जी किंवा बावळट असतो की सध्या पेक्षा खरेच मोठी ऑफर आहे का हे तपासण्याचीही काळजी घेत नाही . किंवा सिनीअर्स कॅटेगरीतील लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल ज्युनीअर लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल सोबत लावण्यासारखे ऑकवर्ड प्रकारही केले जातात ते खरेच डोक्यात जातात .

माहितगार's picture

7 May 2018 - 3:07 pm | माहितगार

बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात.

होय, काय होते की सर्वसाधारण पणे इंडस्ट्रीमधून वेगवेगळ्या लेव्हल वरुन बाहेर पडलेली मंडळी सहसा प्लेसमेंट सर्वीसेस सुरु करतात , एकदा जराशा प्रॉफीट मध्ये आले की दोन - चार कर्मचारी वाढवता येतात , ह्या कर्मचारी वर्गाला सहसा इंडस्ट्रीअल अथवा कॉर्पोरेट अनुभव नसतो / कमी असतो त्यांचा भर तुम्ही म्हणाल्या प्रमाणे मोठ्या डाटा बेसेस मधून जोड्या जुळवणे असतो, - नौकरी डॉट कॉम वगैरे पोर्टल उपलब्ध नव्हते तेव्हा कमीत कमी बायोडेटा देण्या साठी कँडीडॅटला स्वतः तिथे पोहोचावे लागे -आता बहुतांश केसेस मध्ये उमेदवारांना प्लेसमेंट सर्वीस मध्ये पूर्व परिक्षण आणि तयारी साठी बोलावले सुद्धा जात नाही.

कन्सल्टन्सी कडून आऊट सोर्स करणार्‍या कंपन्यांचा डाटाबेस मेंटेन करण्याचा आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग ठेवण्याचा पैसा आणि सतराशे साठ बायोडाटा क्रॉसचेक करत बसण्याची कटकट वाचते . यातले पैसा वाचवणे समजता येते , पण कर्मचारी घेण्यासाठी कमी लोकांच्या इंटरव्हूजवर धकवण्याचा अट्टाहास खरेच किती श्रेयस्कर असतो कारण , डाटा बेस मध्ये जोड्या जुळवणार्‍या कन्सल्टंटच्या कर्मचार्‍यांना ना तुमची कंपनी ची व्यवस्थीत माहिती असते ना कँडीडॅटची . पण गाड्या धकवल्या जातात.

शब्दबम्बाळ's picture

7 May 2018 - 3:49 pm | शब्दबम्बाळ

"अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे."

हा अनुभव मलाही २ वेळा आलेला आहे! :)

माहितगार's picture

7 May 2018 - 5:09 pm | माहितगार

अगदीच निष्काळजी पणा , खरे म्हणजे नौकरी डॉट कॉम आणि तत्सम डाटाबेस मध्ये सध्याची शोधत असलेल्या कंपनीतील बायोडेटा सर्च मध्ये येऊ नयेत अशी सुविधा असावी ती वापरली जात नसेल.

अशी केस ऑनलाईन सर्वीसेस देणार्‍या वेबसाईटवर तुम्ही तुमचा बायो अपडेट नाही केला आणि नेमका तोच डाटा बेस वापरेल हे अत्यल्प प्रमाणात संभवते कारण नॉर्मली रिसेंटली अपडेटॅड सिव्हीच सहसा वर दिसतात पण नेमक्या शिक्षण आणि अनुभवाचे इतर व्यक्ती नसतील तर पुरेसे अपडेट न झालेले सिव्ही वर येऊ शकतात, म्हणून सहसा उमेदवारांना अपडेटेड सिव्ही इमेल करण्यास सांगितले जाते.

अर्थात कुशलता नसलेला , गंभीर नसलेला, किंवा बावळट स्टाफ सगळी कडे असू शकतो तसा या क्षेत्रातही बर्‍या पैकी असतो.

रानरेडा's picture

7 May 2018 - 4:03 pm | रानरेडा

हे खरे आहे - एक चांगले काम करणाऱ्या बरोबर १० वाईट असतील

पण गमत अशी आहे कि हॉरिबल काम करीत असतील तरी यांची संख्या वाढत आहे . अगदी प्रत्येक प्रकारच्या . टॉप एन्ड च्या पदासाठी म्हणजे व्ही पी , सीइवो किंवा डायरेकटर साठी काम करणाऱ्या २५ ते ३० कन्सल्टंट कम्पनी असाव्यात , बहुदा जास्त , आणि बाकी सर्व पदांसाठी काम करणारे किती असावेत याची गणती नाही . दुर्दीवाने यात खूप अप प्रवूत्ती शिरल्या आहेत . विदेशात नोकरी देण्यात तर एव्हडी फसवणुक आहे कि काही वेळा लोक घर दर विकून बरबाद हि झाले आहेत . पण याची दुसरी बाजू पण आहे कि मोठ्या प्रमाणात gas साठी भरती करणारा एक कन्सल्टंट आहे , एकेकाळी त्याला माणसे कमी पडत असल्याने तो बिहार / UP मधून कामगार मागवायचा , मुंबईत येण्याचा सर्व खर्च करायचा आणि निवड झालेल्या काही लोकांना १ दोन दिवस ठेवून विदेशात पाठवायचा - कम्पनीच्या खर्चाने ! तेंव्हा असे हि लोक आहेत

आणि आज अनेक कम्पनित कोअर कामे सोडून बाकीची सर्व आउटसोर्स केली जातात , तसेच रिक्रुटमेंट हि जवळपास आउटसोर्स केले जाते . काही वेळा कन्सल्टंट हाच इंटरव्यू च्या पहिल्या एक दोन राउंड अरेंज करतो आणि मगच कॅन्डीडेट पुढे पाठवले जातात .

अर्थात वाईट कन्सल्टंट खूप आहेत पण तुम्हाला वाटते तेव्हडे नाही . नौकरी.कॉम किंवा लिंकेडिंन आल्यावर कन्सल्टंट ची गरज सम्पलेलं असे वाटले , उलट या मुले कन्सल्टंट ची संख्या वाढली , आणि गंमत म्हणजे आज हे दोघे हि कन्सल्टंट ना सोल्युशन देत आहेत

https://premium.linkedin.com/premiumhiring?trk=pre_hub_b_lmor_lts

https://www.linkedin.com/premium/products?family=talent&trk=pre_lts_home...

माहितगार's picture

7 May 2018 - 3:27 pm | माहितगार

पॅराडिगम ला मराठी शब्द सुचला नाही पण एक वैशीष्ट्यपूर्ण पॅटर्न कंपन्यांचे एच आर + हाय पेड एंप्लॉयी आणि कन्सल्टन्सी मार्फत तयार झाला म्हणजे उमेदवाराच्या अनुभव कौशल्य शिक्षण इत्यादींना प्राधान्य देण्या आधीच सॅलरी अर्न्डचा क्रायटेरीया लावणे . ह्याचे एक वैशीष्ट्य पूर्ण कारण असे दिले जाते कि ज्याला जास्त सॅलरी मिळण्याची सवय आहे त्याला त्याच्या पटीत कंपनीसाठी उत्पन्न कसे मिळवायचे हे ही माहित आहे . या थेअरीत अंशतः तथ्य असतेही पण अंशतः तथ्य म्हणजे पूर्ण तथ्य नाही या कडे सरसकट दुर्लक्ष केले जाते . या क्रायटेरीयात कंसल्टंट फायद्या मध्येच असतात कारण त्यांना सतत अधिक सॅलरी म्हणजे अधिक कमिशन असे गणित फायद्याचे ठरते, एच आर आणि संबंधीत विभागात पोहोचलेली मंडळी अशाच क्रायटेरीयावरुन पोहोचलेली असतात म्हणून आपल्या पेक्षा फार कमी पे ब्रॅकेट मधील मंडळी सहाजिक पणे नको असतात . याचा परिणाम कॉस्ट ऑफ मॅन पॉवर वाढण्यावर होतो. कंपनीची स्थिती ठिक असते तो पर्यंत हे कॉस्ट ऑफ मॅन पॉवर असे वाढले तरी मालकांना काही वाटत नाही . याचा एक परिणाम कार्पोरेट मध्ये कास्ट इम्पॅक्ट कमी होत असला तरी क्लासचा इंपॅक्ट वाढलेला आहे, दुसरे हायपर झालेल्या सॅलरी जस्टीफाय करण्यासाठी कोणतेही मार्ग वापरण्यासाठी विधी निषेधाकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढते - मार्केट पोटेशीअल आहे त्या पेक्षा हाईप करुन दाखवणे आणि शेवटी अवाजवी फुगवलेला फुगा फुटणे आणि याची तोशीस मालका सहीत कुणालाही नसते कारण पैसा शेवटी बँकर्स म्हणजे पब्लिकचा असतो . आणि अर्थ शास्त्रीय दृष्टीने पहाता हे इन्फ्लेशनरी ट्रेंड वाढवणारे आहे .

फुगा फुटल्या नंतर कंपनीची स्थिती बिकट झाल्या नंतर कॉस्ट सेव्हींग कुठून चालू करावे हा यक्ष प्रश्न असतो . या दुष्ट चक्रात सगळेच सहभागी होत रहातात .

नितिन थत्ते's picture

7 May 2018 - 4:06 pm | नितिन थत्ते

स्पेलिग काही असले तरी उच्चार पॅराडाइम आहे असे स्मरते.

माहितगार's picture

7 May 2018 - 4:56 pm | माहितगार

माहिती साठी अनेक आभार

असंका's picture

8 May 2018 - 1:07 pm | असंका

+1

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2018 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण आणि उपयोगी लेख !

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 May 2018 - 4:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे हे लोक बर्‍याच वेळा कंपनीशी इतके चांगले संबंध बाळगुन असतात की डायरेक्ट एच.आरकडुन कॉल किवा कोणीतरी रेफर करण्यापेक्षा कन्सलटंटकडुन जॉब मिळण्याची शक्याता जास्त असते. (यात पण काहितरी टक्केवारी असेलच म्हणजे कट प्रॅक्टीस, पण आपल्याला जॉब मिळतोय ना मग कशाला खोलात जा?)

शिवाय त्यांचे मॅच मेकिंग (जॉब प्रोफाईल आणि उमेदवाराचे प्रोफाईल ) चांगले असल्याने खुपच फरक पडु शकतो. म्हणजे थोडक्यात हिट रेट वाढतो आणि कमी ईंटरव्ह्यु देउन योग्य नोकरी मिळु शकते.
एकदोन वेळा नोकरी डॉट कॉमची पेड सर्व्हीस घेतली होती त्याचा अनुभव चांगला आहे. पण परदेशी जॉब देउ वगैरे गोष्टी थोतांड वाटतात. त्या मृगजळापायी पैसे खर्च करु नयेत असे माझे मत आहे. बाकी बहुतेक कन्सलटंट कंपनीकडुनच पैसे घेतात उमेदवाराकडुन नाही याच्याशी सहमत.

थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे.

रानरेडा's picture

7 May 2018 - 6:50 pm | रानरेडा

आपण सांगितले ते बहुतांशी बरोबर आहे

कट प्रक्तीस भरपूर चालते. पण एक आहे कि तरी हि चांगली माणसे द्यावी लागतात .
पण एक लक्षात घ्या कि आपल्याकडे प्रचंड लोकसंख्ये मुळे भरपूर लोक मिळतात , आणि अनेक नोकर्या साठी ठराविक एक साच्यातील बरेच लोक चालू शकतात .
त्यामुळे हि व्यवस्था चालू रहाते. तरीही कधी तरी पकडले जाऊन एच आर ला लाथ मिळाल्याची उदाहरणे आहेत.
पण हा धंदा कनेक्शन आणि रीप्यूटेशन वर चालतो , आणि अनेकदा सुरु करणारे हे काही नोकर्यात चांगल्या पदांवर काम करणारे लोक असतात . ( यात हि बरेच लोक एच आर चे नव्हे तर सेल्स आणि मार्केटिंग चे असतात ) आणि अनेक जणांचा धंदा काहीही कट ना देता व्यवस्थित चालू असतो .

आणि मॅच मेकिंग बाबतीत आपले निरीक्षण अचूक आहे . हीच तर जॉब कन्सल्टन्ट ताकद असू शकते ना ? आणि लोक इतकी वाईट प्रोफाईल बनवतात , जाहिरात किती मी स्पष्ट दिली तरी किती असंबद्ध अर्ज येतात ते पाहिले कि यांच्या कामाचे महत्व पटते . अनेक वेळा पोझिशन आली आणि थोडे शोधले कि कळायचे कि कम्पनी ने आधी उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला काहीही यश आले नाही . उलटे अनेकदा चांगले कन्सल्टन्ट असाइनमेन्ट आली कि पहिल्यांदा ह्या पोझिशन वर कम्पनी ने आधी काम केले कि नाही ते बघतात ;)

थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे. +100000

उत्तम लेख आणि मार्गदर्शन . धन्यवाद पुलेशु

सिद्धेश्वर

रानरेडा's picture

8 May 2018 - 10:55 pm | रानरेडा

मी कन्सल्टन्ट बद्दल लिहिल्यावर काही लोकांनी विचारले कि कंपनीला डायरेक्ट संपर्क केला तर ? कन्सल्टन्ट चा उपयोग काय ? तर या बातमीवरून असे दिसते कि टाटा मोटर्स , विप्रो , महिंद्रा , Citigroup , Honeywell, L&T Technology Services and HDFC Life त्या ना त्यांचे जवळजवळ सर्वच रिक्रूटमेन्ट चे सर्वच काम बाहेरील कन्सल्टन्ट कडे देत आहेत . यालाच RPO - recruitment process outsourcing असे म्हणतात .
हि बातमी पहा
https://economictimes.indiatimes.com/jobs/companies-outsourcing-talent-a...