Skip to main content

सालं, आज जीव कासावीस झालाय

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 27/04/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
सालं, आज जीव कासावीस झालाय तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय आज मी पण एक बाप आहे पण खरं सांगू मित्रानो या देशात बाप होणं , श्राप आहे केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय त्यांना थोडंच ठाऊक होतं पुढे होणार आहे काय ? त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ? जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील बाराव्यानंतरही आणि भरणीलाही पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील बातम्या अश्याच येत राहतील बातम्या अश्याच येत राहतील हि श्रद्धान्जली त्यांना नाही वाहत आहे मी देवा हि तुला वाहतोय थांबव हे सारं , थांबव नाहीतर तुझंच श्राद्ध घालेन म्हणतोय {{{सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
लेखनविषय:

वाचने 3155
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फारच दुर्दैवी घटना ड्राइवरने इयरफोन्स लावले होते. समोर ट्रेन बघून मुलं जिवाच्या आकांताने ओरडून त्याला सावध करत होती पण त्याला ऐकूच आले नाही :(

शब्दच नाहीत

:(

धन्यवाद सिद्धेश्वर विलास पाटणकर