Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शिव कन्या on Mon, 04/02/2018 - 17:58
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा! अरे बापरे, आई गं असं म्हणत गर्दी गोळा होईल. मग कवितेचा खप होईल. .....आणि तिचा खप झाल्याशिवाय तुला बिड्या कुठून मिळणार?' 'मालकाचं बरोबर होतं. मालकाचं नेहमीच बरोबर असतं... तर एकूण सगळं असं आहे......' मी विचारलं, 'ठिक गणू, पण काढून फेकलेले अलंकार परत का गोळा करतोयस?' काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....' मी त्याच्याकडे पहात राहिले.... इतक्यात, 'आलो मालक' म्हणत गणपत वाणी कविता खांद्यावर टाकून निघून गेला. शिवकन्या

Submitted by नाखु on Mon, 04/02/2018 - 20:05

Permalink

बिना

(धूर)काडीची कविता. कोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 04/02/2018 - 20:29

Permalink

मस्तच!

अलंकाराच्या शोधार्थ फिरणारे अनेक वेडे कवी निर्माण होवोत! आमेन! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 04/03/2018 - 00:31

Permalink

रूपके आणि चेतनगुणोक्ती छान

रूपके आणि चेतनगुणोक्ती छान वापरले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 04/09/2018 - 09:54

Permalink

वाह, मस्तच !

वाह, मस्तच ! एका वेगळ्या प्रकारचा उपहास !
सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील,
हे भारीय !
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 04/11/2018 - 00:57

Permalink

खूप आवडली!!

खूप आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Wed, 04/11/2018 - 10:20

Permalink

तुमच्या कविता खूप वेगळ्या

तुमच्या कविता खूप वेगळ्या असतात, लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on Wed, 04/11/2018 - 11:31

Permalink

मस्तच कविता आहे. खूप आवडली.

मस्तच कविता आहे. खूप आवडली.
काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....
आहा!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/11/2018 - 20:51

Permalink

मस्त !

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Sat, 04/14/2018 - 04:36

Permalink

वा व्वा व्वाह्

ज ब र द स्त!
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 04/17/2018 - 07:52

Permalink

बेहतरीन कविता !

फारच सुंदर आणि मजेदार कविता आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 04/17/2018 - 14:59

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10151 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com