मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
28 Feb 2018 - 10:17 am

माले का मालूम भाऊ?

'कोनं बगरवलन बे
माह्या सपनाईचा कचरा?
डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो
जाराले सोपा जाते.
कोनं बगरवलन बे?'

माले का मालूम भाऊ!

'साला सपना त सपना
सपन्याचा कचरा बी
डबल मेहनत कराले लावते!'

येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा?
पिक्चर पावाले
कोनाय हिरोहिरोईन?
भाई अना कतरीना
मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे?
माले का मालूम भाऊ!
टायगर त कसाबी जिंदा रायल,
पर तू जिंदा रायसीन का?

'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता
माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना'
अगा बंड्या, गारा काहून पडते गा?'
​'​माले का मालूम भाऊ!​'​
अबे विकास! गारा काहून पडते बे.
' क्लायमेट चेंज, बाबूजी'
'हा का रायते त गा?'
'माहीत करून बी का तोफ झाडान का बाबूजी?'

गावातले सप्पा पोट्टे कोटी गेले जी?
बांद्याइवर​.​
बाप्पा बाप्पा! तपनीत काम करून रायले सबजन!
नाई जी, बांदीत क्रिकेट टुर्नामेंट खेळाले जातत
मंग कोनाय तुमच्या गावचा विराट कोहली?
मले का मालूम भाऊ!
काऊन जी, तुमी म्याच नाई पाहा का?
'कोनाजवर येवडा खाली येर रायते जी!
कामापासून फुरसत नसे माले!'
'मंग पोट्याइले सांगा!
त्याइले त बाप्पा दुनियाभरची फुरसत!'
'तुमीच सांगून पायजान भाऊ.'

कोनं चोरलन बे
माह्या रातीची निदरा?
सोळा सालाची जमा करूनस्यानी ठेवलो होतो
माह्या पोराले देईन मंलो होतो

माले का मालूम भाऊ!

हव! मीच कायले रडू!
चोर बी असा खतरनाक,
पुऱ्या गावाचीच निदरा चोरी केलन!

'अबे विकास, प्रिया वारीएरसंग
घुंगराल्या बालावाली पोट्टी कोन होय बे?'
' थांब सच्या, गुगल करून पायतो!'
.
.
1

मुक्त कवितावाङ्मयकविताभाषा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Feb 2018 - 10:32 am | प्रचेतस

जबराट स्वामिजी.
मजा आली.

जेम्स वांड's picture

28 Feb 2018 - 10:46 am | जेम्स वांड

उत्तम आहे हे प्रकरण, भाषा झाडीबोली आहे का? असल्यास तशी नमूद करायला हवी होती.

पैसा's picture

28 Feb 2018 - 10:56 am | पैसा

गडबड झाली. सुधारवून घेतले आता.

जेम्स वांड's picture

28 Feb 2018 - 11:19 am | जेम्स वांड

_/\_

सस्नेह's picture

28 Feb 2018 - 11:38 am | सस्नेह

भारी !!!

पैसा's picture

28 Feb 2018 - 11:40 am | पैसा

:)) कोणाला काय, कोणाला काय!

नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारी ज्वलंत कविता. _/\_

भीडस्त's picture

28 Feb 2018 - 4:26 pm | भीडस्त

एक फॅमिली फ्रेंड आहेत, ब्राह्मणवाडा इथले .
त्या काका काकूंची आठवण झाली
मस्तच

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2018 - 4:32 pm | प्रीत-मोहर

भारी!!!

अबे विकास, प्रिया वारीएरसंग
घुंगराल्या बालावाली पोट्टी कोन होय बे?

एकच लंबर स्वाम्याभाव.
माझ्या बी डोसक्यात अशेच सवाल उठतेत तेला काय करावं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2018 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी, ठसकेदार ! =)) =)) =))

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 10:16 am | प्राची अश्विनी

भारी .

पद्मावति's picture

1 Mar 2018 - 2:53 pm | पद्मावति

छानच.

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2018 - 5:19 pm | चौथा कोनाडा

भारी ! आवडली !

सविता००१'s picture

2 Mar 2018 - 7:52 pm | सविता००१

मस्तच रे स्वाम्या... नेहमीप्रमाणेच

मित्रहो's picture

2 Mar 2018 - 11:58 pm | मित्रहो

मस्त ठसकेबाज
बगरवलन आणि डुंगा या शब्दांचा अर्थ काय आहे.

स्वामी संकेतानंद's picture

4 Mar 2018 - 9:51 am | स्वामी संकेतानंद

विखुरले
ढीग

जेम्स वांड's picture

4 Mar 2018 - 10:04 am | जेम्स वांड

मला वाटत असे बगरवलं म्हणजे बिघडवलं असावं!

मित्रहो's picture

4 Mar 2018 - 9:10 pm | मित्रहो

नवीन शब्द माहीत झाले.

नाखु's picture

4 Mar 2018 - 4:09 pm | नाखु

झाडाझडती घेतली आहे

जय
शहरी झुडुपातला नाखु पांढरपेशा