✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(भिती तुझ्याउरी पण)

न — नाखु, Wed, 01/17/2018 - 00:11
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी? या नित्य अधोगतीला? त्या सुज्ञ मिपाकरांनी,आता विचार घ्यावा. ___----------- विडंबन साठी गीत अर्थात बुवांच असलं तरी जखम आधिच्या विखारी धाग्यांची आहे नाखु वाचकांचीही पत्रेवाला

प्रतिक्रिया द्या
4177 वाचन

💬 प्रतिसाद (6)

आमचे बाबा महाराज म्हणतात......

मुक्त विहारि
Wed, 01/17/2018 - 04:48 नवीन
चिखल फेक सुरु झाली, की पॉप कॉर्न घेवून बसावे.
  • Log in or register to post comments

किंवा आमच्या बाबा महाराजांनी केलेली आरती म्हणा....

मुक्त विहारि
Wed, 01/17/2018 - 05:20 नवीन
आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही कोण म्हणूनि काय पुसता?आम्ही असू दोडके मिपाचे दिधले असे आंतरजाल आम्हांस खेळावया; बरेचसे धागे येथील पहा, आमच्या पुढे ते फिके. वांझोट्या चर्चाच आमच्या शतके मारीतसे. वादांचीच खूमखूमी आमची आपोआप ती टंकतसे. हार न मानता, खडे फेकणे हेच आमूचे ध्येय असे. शुन्यवत केली कित्येक स्थळे आमुच्या या हल्यांनी मिपाला असूरलोक साम्य आणले आमुच्या शब्दांनी ते आम्हीच, द्वेष व्यक्तीं मधला, शब्दां मधूनी सदा पाझरे ते आम्हीच, शतकी आय.डी. लेऊन टंकणारे. आम्हाला वगळा-सकस होतील सकल संकेत स्थळे आम्हाला वगळा-स्वर्ग रुपी वाटेल मिपावर बागडणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

:-)

एस
Wed, 01/17/2018 - 08:28 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Wed, 01/17/2018 - 08:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वाहवा ! भावना सुंदर अधोरेखित

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/17/2018 - 11:24 नवीन
वाहवा ! भावना सुंदर अधोरेखित झाली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 01/17/2018 - 13:16 नवीन
सुरेख, आवडली कविता, भावना पोचल्या, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा