infinity

Primary tabs

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
17 Nov 2017 - 2:50 am

त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली.

सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही.

चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश.

बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती. मोठ्या शहरातली असावी. कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसलेली.

"ओ मॅडम.." मी आवाज दिला. पण ढिम्म हलली नाही.

मग मी बराच जवळ गेलो. एक उच्च पर्स तिच्या जवळ होती. विशेष म्हणजे एवढ्या थंडीत तिने जॅकेट घातले नव्हते.
"ओ मॅडम... कुठं जायचंय..?" यावेळी मी जरा जोरातच आवाज दिला.
अचानक तिनं माझ्याकडे बघितलं. "what the hell. कौन है आप?" कानातले हेडफोन काढून तिनं विचारलं.
"क्या चाहिए?"
"कुछ नही बस, आप अकेली यहा नजर आयी. सोचा कुछ प्रॉब्लेम है.." मी एका खांबाला रेलून उभारलो.
"नही तो. मगर आप यहा क्या कर रहे है?" बाकड्याजवळ उभी राहून ती थेट माझ्या डोळ्यात बघत होती.
"सॉरी मै भूल गया मै यहा क्यू आया था.. आप कही जा रही है?"
"हा. रात देड बजे की ट्रेन है.."
"यानी की अभी एक घंटा बाकी है.." मी घड्याळाकडे बघितलं.
"वो तो है.." ती आता सावरली असावी.
"देखा जाए तो, ऐसे सुनसान जगापे अकेले रहना ठिक नही है.. " मी मगाचीच ती सिगारेट बाहेर काढली.

"जानती हू.. मगर क्या करे.." ती खांदे उडवत म्हणाली. थोडीशी हसलीही. असं वाटत होतं ती डोळ्यांनीच बोलत होती. थेट धडक पाहत होती.

"अगर आप चाहे तो मै यहा रूक सकता हू. आपकी ट्रेन जो है.." कळस आहे हा. एवढ्या थंडीत एक गोड मुलगी पुढे आहे. आणि सिगारेट पेटवायचा माचीस नाही.

"नहीं उसकी कोई जरूरत नही. मगर आपके पास अगर वक्त है तो आप रूक सकते है.."

"अगर आप चाहे, तो मै पूरी रात यहा रूक सकता हू..." मी तिच्या नजरेला नजर भिडवत म्हणालो. थेट. धडक.

तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला. रूमालाने तोंड पुसत आतून एक हँडसम वाटावा असा एक तरुण बाहेर आला.
"कुछ प्रॉब्लेम है?" त्यानं तिच्याकडेच बघत विचारलं. तिचे डोळे मात्र थेट माझ्या काळजाला भिडत होते. मी हाताची घडी करून खांबाला रेलून तसाच उभा होतो.

"टिया, क्या वो यहा है?" अतिशय दबक्या आवाजात तो पुटपुटला. तीनं केवळ मान हलवली.
"कहॉ? कहॉ खडा है वो?" आजूबाजूला नजर फेकत तो म्हणाला. एक बोट माझ्याकडे दाखवत ती स्तब्ध हसली.
त्याने भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. "क्या वो हमे देख रहा है?"
"जी" तिच्या चेहऱ्यावर अजूनही हास्य कायम होते.
"क्या बातचित हुयी तुम्हारी.. कुछ बोल रहा था?"
"बस.. यूही.. जान पहचान थोडा टाईमपास.." किती मनमोकळं बालते ही.
"क्या तुम जानती हो उसे?"
"नही विक्रम. जिंदगीेमे पहली बार इसे देखा है.." कुठेतरी हरवत चालल्यासारखी ती म्हणाली.

"मुझे लगता है अब हमे यहॉसे चलना चाहिए..." तिची पर्स उचलत तो म्हणाला "लेटस ग... लेटस गो.."

दूरवर पसरलेल्या प्लॅटफॉर्मवर ते सरळ चालत निघाले.तिच्या सँडलचा आवाज स्टेशनवर घुमत राहिला. टक ..टक ..... टक.. टक.. "ओ मॅडम... आपकी ट्रेन?" खांबाला रेलूनंच मी म्हणालो. तिनं मागं वळून केवळ एक हास्य दिलं.

पुन्हा एकदा स्टेशन शांत झालं. अवजड बोजड मालगाडीचे डबे अंधारात किती विचित्र दिसतात. तो तरूण, विक्रम का कुणी किती विचित्र होता. त्याला मी दिसतंच नव्हतो. म्हणजे मी काय त्या मुलीलाच फक्त दिसू शकतो? कसं शक्य आहे? कोण आहे मी? तिचा केवळ एक भ्रम?

माझी छाती धडधडू लागली. पाय लटपटायला लागले. थंडी एवढी वाजायला लागली की मेंदू गारठून गेला. मी सिगारेट काढली. एक माचीस! एक माचीस नाही हिला पेटवायला....

"गेली का ती?" मला अगदीच जवळून आवाज आला. मी बघितले. माझी बायको जवळ उभी होती.
"तू इथं कधी आली?"
"मी इथेच आहे. पूर्णवेळ मी इथेच उभी होते. तुझ्या शेजारी.." खांद्यावरची पर्स सावरत ती म्हणाली.
"तू माझा पाठलाग केलास.." मी नापसंती दर्शवत म्हणलो.
"त्याशिवाय इलाज नाही." ती माझ्या समोरंच येऊन उभी राहिली. दबक्या आवाजात डोळे भिडवत म्हणाली. "ती अजून इथेच आहे की गेली?"
ती नक्की कशाबद्दल विचारत होती याची मला पूर्ण कल्पना होती.
"त्या तिथे.. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला गेलीय. तिच्याबरोबर.. एक तरूणपण होता " मी बोट दाखवत म्हणालो.
"बघताहेत का ते आपल्याकडे?" तो तरूण आणि ती मुलगी आता प्लॅटफॉर्मवरून उतरून पटरीवर चालत असल्याचे मला दिसत होते.

"मागे वळून बघितलं तिनं आत्ताच..."

"Don't worry विक्रम. it will be fine. आपल्याला आत्ता निघावं लागेल. लेटस गो. लेटस गो.." ती माझ्या हाताला ओढतंच म्हणाली. आम्ही चालत पोर्चमध्ये आलो.

"ऐक. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. मी एक माचीस विकत आणतो. मग आपण लगेच निघूया. सिगारेट न पिल्याने मला खूप विचित्र वाटतंय.."
"अरे इथे कुठे माचीस भेटणार?"
"डोन्ट वरी. आय वील बी राइट बॅक" रूळाच्या त्या बाजूला तरी एखादी पानटपरी असेलंच. मी पटरीवर उडी घेतली.
एक माणूस दिसेल तर शप्पथ. त्या बाजूला एकही दुकान उघडे नव्हते. मालगाडीचे तुटके फुटके डबे मात्र चौफेर पसरले होते. दूरवर थोडासा उजेड दिसत होता. किमान तिथेतरी मिळेल.
"मी तिकडे जाऊन येतो. तू इथेच थांब." मी पटरीवर चालत बायकोला म्हणालो.
"ओके.." प्लॅटफॉर्मवर ती शांतपणे उभी राहून म्हणाली.
मग मात्र मी चालतंच राहिलो. एक दोन वेळा मी मागे वळून पाहिलेसुद्धा. मला उगाचच वाटलं कि ती पाठीमागून येतेय.

त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते.

मी चालतंच गेलो. चालतंच राहिलो. चालून चालून पाय तुटायला आले. हा थेट लोहमार्ग आयुष्याचा सारीपाट बनून गेला आहे.

एक स्टेशन दिसलं .... तुटक्या फुटक्या मालगाडीचं.... स्टेशनवर बसलेली एक मुलगी....कानातले हेडफोन.... लख्ख प्रकाश..... मी खांबाला रेलून विचारलं....."मॅडम"

"what the hell. कौन है आप?"

प्रतिभाकथा

प्रतिक्रिया

निशाचर's picture

17 Nov 2017 - 4:13 am | निशाचर

मस्त!

एस's picture

17 Nov 2017 - 8:34 am | एस

वाह. मॅट्रिक्स?

जयंत कुलकर्णी's picture

17 Nov 2017 - 8:36 am | जयंत कुलकर्णी

सिझोफ्रेनियाच्या रुग्णांमधे, हो रुग्णच म्हटले पाहिजे त्यांना, त्यांच्या भ्रमात जी माणसे, स्थळे येतात त्यांना प्रमूख पात्रे म्हणून केंद्रस्थानी ठेवावे व एक कादंबरी लिहावी असे माझ्या मनात फार काळ येत आहे. म्हणजे उदा. येथे जर हा तरुण सिझोफ्रेनिक असेल तर ती तरुणी व तरुण यांच्या बद्दल ती कादंबरी असेल किंवा उलटे...

असो. पण तुमचा प्रयोग आवडला व नाविन्यपूर्ण आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला एक लेखणी बक्षिस.....

प्रचेतस's picture

17 Nov 2017 - 8:48 am | प्रचेतस

भन्नाट कन्सेप्ट.

तुमच्या कथांची नावेदेखील अगदी समर्पक असतात.

सिरुसेरि's picture

17 Nov 2017 - 9:46 am | सिरुसेरि

मस्तच .. मायाजाल

mayu4u's picture

17 Nov 2017 - 10:24 am | mayu4u

जव्हेरभौ मिपा चे नोलन आहेत.

जागु's picture

17 Nov 2017 - 10:25 am | जागु

छान.

अॅमी's picture

17 Nov 2017 - 10:39 am | अॅमी

लय भारी :D

वकील साहेब's picture

17 Nov 2017 - 11:45 am | वकील साहेब

भन्नाट जव्हेरभाऊ

नाखु's picture

18 Nov 2017 - 11:50 am | नाखु

मिलॉर्ड आहे मी

शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु

कसलं भारी सुचतं तुम्हाला..

पुंबा's picture

17 Nov 2017 - 5:10 pm | पुंबा

जबरदस्त!!!

चष्मेबद्दूर's picture

17 Nov 2017 - 7:20 pm | चष्मेबद्दूर

मस्तच

विखि's picture

17 Nov 2017 - 8:07 pm | विखि

नोलान आठवला...... :)

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2017 - 8:29 pm | टवाळ कार्टा

लूप???

Nitin Palkar's picture

17 Nov 2017 - 8:57 pm | Nitin Palkar

रत्नाकर मतकरींची आठवण येते. तुलना आवडेल न आवडेल....
लेखन आवडलं, लिहित रहा......

Rahul D's picture

17 Nov 2017 - 10:32 pm | Rahul D

+1000

पैलवान's picture

18 Nov 2017 - 7:43 am | पैलवान

वन ऑफ द बेस्ट फ्रॉम जव्हेरगंज!!

बोबो's picture

18 Nov 2017 - 11:31 am | बोबो

मस्त

उपेक्षित's picture

18 Nov 2017 - 12:27 pm | उपेक्षित

मोजके शब्द + भन्नाट वातावरण निर्मिती = जव्हेरगंज

पद्मावति's picture

18 Nov 2017 - 3:24 pm | पद्मावति

मस्तच!

बाबा योगिराज's picture

18 Nov 2017 - 4:56 pm | बाबा योगिराज

भन्नाट, भारी. आवडेश.

बाबा योगीराज

वॉल्टर_व्हाईट's picture

19 Nov 2017 - 4:10 am | वॉल्टर_व्हाईट

लै जबरदस्त .!!

राही's picture

19 Nov 2017 - 7:15 am | राही

कथा अतिशय आवडली. कमीतकमी शब्दांतून स्रवणारा दाट आशय. त्याला साजेशी वातावरणनिर्मिती. अनेकानेक आयुष्यांत तेच तेच टप्पे पुन्हा येत राहातात. त्याच त्याच मार्गावरून आपण चालत राहातो. जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरत राहातो अव्याहतपणे.
छान.

निओ's picture

19 Nov 2017 - 9:40 am | निओ

१ नं. चक्रावून टाकलं :)

विशुमित's picture

20 Nov 2017 - 3:18 pm | विशुमित

मला तर भूतच दिसते तुमची कथा वाचायला घेतली की.
खतरनाक लिहता तुम्ही .

रुपी's picture

22 Nov 2017 - 1:39 am | रुपी

भारीच!

आनंदयात्री's picture

23 Nov 2017 - 2:40 am | आनंदयात्री

जव्हेरगंज, कथानक जबरदस्त जमून आलेय. सावकाश वेळ मिळेल तसा, पेशंटली हे लिखाण पुढे वाढवा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
कथानकात नायक रुळांवर पुन्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा असे वाटले आहे town of cats मध्ये जाऊन पोचतोय काय आता!

शित्रेउमेश's picture

29 Nov 2017 - 2:07 pm | शित्रेउमेश

ज!!!! ब!!!! र!!!!द!!!!स्त!!!

शित्रेउमेश's picture

29 Nov 2017 - 2:07 pm | शित्रेउमेश

ज!!!! ब!!!! र!!!!द!!!!स्त!!!

ज्योति अलवनि's picture

1 Dec 2017 - 9:42 pm | ज्योति अलवनि

जबरदस्त... एकदम आवडली!!! खूप छान लिहिता तुम्ही जव्हेरगंज जी

समयांत's picture

1 Dec 2017 - 10:03 pm | समयांत

भारीच!

सविता००१'s picture

7 Dec 2017 - 6:26 pm | सविता००१

कसली भारी आहे कथा.. जाम आवडली

दक्षिणा's picture

13 Dec 2017 - 2:24 pm | दक्षिणा

जबरीच एकदम