✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बघ तुला जमतं का ...

च — चामुंडराय, Sat, 09/30/2017 - 08:25
बघ तुला जमतं का ... तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर किंवा बटाट्याच्या चिप्स साठी मर्जी तुझी... उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल पण एकादशी दुप्पट खाशी हे नेहमी लक्षात ठेव..... तू जिम मध्ये रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी... तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल पण वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला मात्र विसरू नकोस..... तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस युअर विश... पण फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला मात्र विसरू नकोस..... तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये सहभागी हो किंवा नको होऊस हक्क तुझा... पण सोशल मीडियावर लॉग-इन करायला मात्र विसरू नकोस..... तू सोशल मीडियावर लाईक्स,कॉमेंट्स कर किंवा नको करूस युअर विश... ते सर्व नाही केलं तरी चालेल पण माझे फोटो लाईक करायचं मात्र लक्षात ठेव..... तू मतदान, झेंडावंदन कर किंवा करू नकोस निवड तुझी... त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण त्या निमीत्ताने मिळणाऱ्या सुट्ट्या एन्जॉय करायला मात्र विसरू नकोस..... मूळ प्रेर्ना : कायप्पा फॉरवर्ड (कवी अज्ञात) विडंबन : अस्मादिक

प्रतिक्रिया द्या
1594 वाचन

💬 प्रतिसाद (2)

हम्म,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/30/2017 - 14:14 नवीन
अजून मटेरियल पाहिजे होते पण येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्राडॉ सर,

चामुंडराय
Wed, 10/04/2017 - 05:01 नवीन
प्राडॉ सर, अजून मटेरियल पाहिजे तर ऍडवा कि. हाकानाका. अकन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा