अस्वस्थ बरसात

रवि बदलापूरेकर's picture
रवि बदलापूरेकर in जे न देखे रवी...
4 Aug 2017 - 10:20 pm

अस्वस्थ बरसात
अशीच अवचित आली
सर ती पावसाची,
सोबत दाटून आली
सय तुझ्या आठवणींची

तो पाऊस बेफाम
तो वारा मदहोश,
ती चिंब बरसात
असलेली तुझी साथ

ते गारठलेले हात
ते उष्ण श्वास,
होणारे ते स्पर्श
हवेहवेसे सारे क्षण

आली होतीत मिठीत
जेव्हा कडाडली होती वीज,
होते मानले किती आभार
मी तिचे मनातल्या मनात

त्या न संपणार्‍या गप्पा तुझ्या
ते न विरणारे हास्य तुझे,
आता छळते ही बरसात सदा
जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा

भिजतोय आजही मी तसाच
साजणे चिंब तुझ्या आठवणीत,
बरसणार्‍या या जलधारात
वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत

- रवि बदलापूरेकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 3:43 pm | धर्मराजमुटके

छान आहे कविता ! आवडली. मात्र आम्ही जात्याच अरसिक असल्यामुळे आम्हाला पावसात गेल्यावर फक्त थंडीच वाजते. असल्या रोमँटिक भावना जागृत होण्यासाठी काय करावे लागते ? अर्थात आता जाणून घेण्यात काही फायदा नाही म्हणा पण तेवढाच आपल्या इथल्या मंडळींना झाला तर झाला उपयोग !

रवि बदलापूरेकर's picture

24 Aug 2017 - 6:35 pm | रवि बदलापूरेकर

आपल्या अभिप्रायाबद्दल आभार....

विशुमित's picture

16 Aug 2017 - 11:31 pm | विशुमित

भिजतोय आजही मी तसाच
साजणे चिंब तुझ्या आठवणीत,
बरसणार्‍या या जलधारात
वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत

रवि बदलापूरेकर's picture

24 Aug 2017 - 6:36 pm | रवि बदलापूरेकर

आभार

तृप्ति २३'s picture

18 Aug 2017 - 1:10 am | तृप्ति २३

खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita

रवि बदलापूरेकर's picture

24 Aug 2017 - 6:43 pm | रवि बदलापूरेकर

तुमची कविता वाचली, छान झाली आहे