✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

स — सत्यजित..., Mon, 06/19/2017 - 18:30
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो! रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो! चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा... मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो! लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो! मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो... —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
8141 वाचन

💬 प्रतिसाद (12)

छान रचना.

रुपी
Tue, 06/20/2017 - 00:58 नवीन
छान रचना. फक्त या पंक्तींचा अर्थ बाकी रचनेत संदर्भ मला समजला नाही.. "मी लपंडावात माझे राज्य केले खालसा मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!"
  • Log in or register to post comments

क्या बात!

प्राची अश्विनी
Tue, 06/20/2017 - 08:12 नवीन
क्या बात! रुपीनी उल्लेख केलेल्या शेराचा अर्थ मलाही नाही समजला.
  • Log in or register to post comments

स्वरकाफिया!

सत्यजित...
Wed, 06/21/2017 - 00:14 नवीन
'काफिया' अर्थात गझलेच्या शेरांतील 'यमक' साधणारा शब्द! उदा.नवीन,दीन,लीन,मलीन ई. काफियांचा विचार केला असता,यांत एक समान स्वरचिन्ह (अलामत),'ई'+ न =ईन असा एकसमान उच्चार होतो आहे! थोडक्यात, काफियांमध्ये केवळ अलामतच यमक साधत असते,ते स्वर-काफिये! ('अ'कारान्त स्वरकाफिया मात्र गझलेत वापरत नाहीत!) उदा.वरील रचनेतील, वारी,पंक्ती,ओवी ई. काफियांमध्ये, केवळ शेवटचा 'ई' हा स्वरच यमक साधतो आहे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Wed, 06/21/2017 - 00:22 नवीन
धन्यवाद रुपी,प्राची अश्विनी! रुपी यांनी उल्लेखिलेल्या शेराबद्दल... गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचला जावा असे अपेक्षित असले तरीही,वरील शेर,ईतर शेरांनी साधलेल्या एका समेस तोडतो आहे असे मलाही वाटलेले! हा शेर या गझलेत देवू नये असाच विचार होता,मात्र गझल पोस्ट करताना,तो खोडायचा राहून गेला!
  • Log in or register to post comments

सु॑दर...

अनन्त्_यात्री
Wed, 06/21/2017 - 09:24 नवीन
...पुनरागमन, अनेक दिवसा॑च्या प्रतीक्षेन॑तर !
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

पद्मावति
गुरुवार, 06/22/2017 - 18:24 नवीन
अतिशय सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Fri, 06/23/2017 - 00:41 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद अनंत_यात्रीजी,पद्मावतीजी!
  • Log in or register to post comments

वाह ! सुंदर

धर्मराजमुटके
Fri, 06/23/2017 - 19:47 नवीन
प्रत्यक्ष तुका ना मी पाहिला होता ना ऐकला होता मात्र विष्णुपंत पागनीसांचा 'संत तुकाराम' मी पाहिला होता 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर' या वचनाचा अर्थ तेव्हाच मी जाणिला होता
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Tue, 06/27/2017 - 23:09 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

सुंदर

जगप्रवासी
Wed, 06/28/2017 - 16:04 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

धन्यवाद जगप्रवासी!

सत्यजित...
Sun, 07/02/2017 - 00:36 नवीन
धन्यवाद जगप्रवासी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

आज आषाढी एकादशी!

सत्यजित...
Wed, 07/01/2020 - 04:05 नवीन
आज आषाढी एकादशी!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा