✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

र — रातराणी, Wed, 06/14/2017 - 11:56
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट. मग जनरली त्याच किंवा त्याच्या पुढच्या वर्षीच्या पावसातच भिजत भिजत कळवलेला नकार. मग थांबलेलं जग, कोसळलेला पाऊस अजून काय? हेच, हेच असतं ना पाऊस म्हणजे? पाऊस, प्रेयसी, आणि नकार कवितेचा टीआरपी डायरेक ढगात. श्या पुरे झालं आता, आपण तर नाही बाबा, असलं काही लिहिणार. किती पाऊस पडला तरी, न विसरता छत्री घेऊन जाणार. अहो किती झालं तरी, निसर्गातला एक ऋतू तो. नेमेची येणारा आणि, नेमेची रडवणार्या पावसाला मी आता वाकुल्या दाखवणारं. यंदाच्या पावसाळ्यात, पाऊस कसा ओव्हररेटेड आहे हेच मला सांगायचंय. पण त्यासाठी पावसावर कविताबिविता अजिबात नाही करणार!

प्रतिक्रिया द्या
4037 वाचन

💬 प्रतिसाद (17)

कविताबिविता अजिबात नाही करणार!!

चांदणे संदीप
Wed, 06/14/2017 - 12:14 नवीन
कविताबिविता अजिबात नाही करणार!
कविता मस्तच, आवडली! Sandy
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

माम्लेदारचा पन्खा
Wed, 06/14/2017 - 12:29 नवीन
छान कल्पना !
  • Log in or register to post comments

पाऊस काय? पावसासारखा पाऊस तो!

एस
Wed, 06/14/2017 - 12:53 नवीन
तुमचं काव्यकौशल्य मात्र अंडररेटेड आहे हा! ;-) पुकप्र. :-D
  • Log in or register to post comments

वेगळीच (न) कविता !

अनन्त्_यात्री
Wed, 06/14/2017 - 16:21 नवीन
भावली !
  • Log in or register to post comments

आवडली.

प्राची अश्विनी
Wed, 06/14/2017 - 16:32 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मस्तच

पद्मावति
Wed, 06/14/2017 - 17:13 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments

हेहेहे जा तिकडंच

अभ्या..
Wed, 06/14/2017 - 17:26 नवीन
हेहेहे जा तिकडंच
  • Log in or register to post comments

नाही नाही म्हणता,

मुक्त विहारि
Wed, 06/14/2017 - 17:33 नवीन
तुम्ही पण पावसावर कविता केलीच की... अगदी पार, "अगं अगं न्हशी......" सारखी अवस्था बर्‍याच जणांची होते. बादवे, "अगं अगं न्हशी......" ही म्हण आहे, उगाच म्हशींचा अपमान करायचा आमचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद

रातराणी
Wed, 06/14/2017 - 23:13 नवीन
सर्वांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

मस्तच.

प्रचेतस
गुरुवार, 06/15/2017 - 09:10 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्त!

पिशी अबोली
गुरुवार, 06/15/2017 - 10:38 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त !

चिनार
गुरुवार, 06/15/2017 - 11:17 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

नाय नाय म्हनून तुमी पन

सतिश गावडे
गुरुवार, 06/15/2017 - 11:29 नवीन
नाय नाय म्हनून तुमी पन पावसावरच कविता लिवलीव. पन मस्त लिवलीव.
  • Log in or register to post comments

नाय तर काय,

नीलमोहर
गुरुवार, 06/15/2017 - 15:49 नवीन
ते उगाच, अशा या पाऊसवेळी, तू नसता जवळी, किंवा पाऊस माझ्या मनीचा, तुझ्या डोळ्यांत झरेल का, वगैरे हळवं दवणीय वाचून असं हसायला येतं ना, वाटतं त्या कवीला गदागदा हलवून म्हणावं, जा ना बाबा कामं कर ना, तुम्ही मात्र तसं काही केलं नाहीत ते खूप आवडलं,
  • Log in or register to post comments

मस्त.. मरो तो पावसाळा...

गवि
गुरुवार, 06/15/2017 - 16:25 नवीन
मस्त.. मरो तो पावसाळा...
  • Log in or register to post comments

वाह् व्वा!

सत्यजित...
Wed, 06/21/2017 - 00:36 नवीन
खूप छान! मस्तंच!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

अभिजीत अवलिया
Wed, 06/21/2017 - 09:54 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा