महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

वादळ उगा निमाले..

Primary tabs

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
17 May 2017 - 10:13 pm

छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा..
कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते!

जागून शब्द गेले..लिंपून आस गेली..
ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते..

आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे..
जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते?

वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी..
आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..!

--

माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे..
पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते??

राघव

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2017 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

सुपर्ब!

एस's picture

17 May 2017 - 11:12 pm | एस

चांगली आहे कविता.

जयंत कुलकर्णी's picture

18 May 2017 - 1:46 pm | जयंत कुलकर्णी

मस्त.... याचे रसग्रहण कोणीतरी करायला पाहिजे....

बाप रे! रसग्रहण!! अहो, शब्द जड आहेत हे मान्य आहे मला! ;-)

जोक्स अपार्ट, थोडा मोडका अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो -

कधी-कधी, आपण एखादा निर्णय का घेतो, एखादी गोष्ट का करतो ते कदाचित पूर्ण माहित नसते. आपल्याच निर्णयाचे संदर्भ आपण माहिती करून घेत नाही.
त्यामुळे त्यातून काय अपेक्षा असायला हव्यात तेही नीटसे आपल्यालाच उमजत नाही. त्यातून येणारं नैराश्य हे मुळात कारण माहित नसल्यानं येत असतं.
अशा नैराश्याचं हे वर्णन आहे; ज्याला खरंतर आपण मुळातच टाळू शकतो.

पुंबा's picture

19 May 2017 - 10:15 am | पुंबा

फार सुंदर..

यशोधरा's picture

19 May 2017 - 10:53 pm | यशोधरा

सुरेख लिहिलेस. कविता खूप आवडली.

प्राची अश्विनी's picture

20 May 2017 - 10:17 am | प्राची अश्विनी

खूप छान! आवडली.

राघव's picture

20 May 2017 - 11:45 pm | राघव

तुम्हा सगळ्यांचे प्रतीसाद वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद!