लोस बुक करु? भविश्यात होनारा अधिक लोस वाचवु कि काय करु?????

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
11 Oct 2008 - 12:09 pm
गाभा: 

सध्याचि सिचुवेशन मध्ये माज्यासारख्या गुतवनुकदाराने काय करावे??

लोस बुक करुन शेअर विकु???? आनि कापितल वाचवु????

भविश्यात होनारा अधिक लोस वाचवु कि काय करु?????

तात्या, नाना,जेनान्च कार्त मार्गदर्शन करा.....................

प्रतिक्रिया

फटू's picture

11 Oct 2008 - 12:26 pm | फटू

तुम्हाला खरंच मराठी टंकलेखन करताना काही अडचण जाणवत आहे की तुम्ही जाणूनबुजुन असंच टंकलिखित करत आहात...

काही अडचण जाणवत असेल तर मिपाकरांना विचारा हो... खुप मदत मिळेल टंकलेखन शिकण्यासाठी...
पण जर जाणूनबुजून करत असाल तर ("इफेक्ट" आणण्यासाठी ) तर कॄपया टाळा... खुप वेदना होतात हे असं मराठी वाचताना...

आशा आहे की "मग तुम्ही वाचू नका" असं तुम्ही म्हणणार नाही...

(मराठी...)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

जैनाचं कार्ट's picture

11 Oct 2008 - 12:45 pm | जैनाचं कार्ट (not verified)



हा हाल आहे अमेरीकन मार्केटचा.... बघा काय करु शकता ते !

पण जरा पण गडबड न करता शांत डोक्याने विचार करा व मग निर्णय घ्या... बीबीसी , सीएनएन, ईटी वाचा जरा मदत मीळेल !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

11 Oct 2008 - 3:48 pm | अवलिया

राजे

माहिती तर छान दिलीत फक्त एक महत्वाची गोष्ट विसरलात !
बैंका बैंकामधील डेरिव्हेटिव्हज ची फिगर, ते डेरिव्हेटिव्हज जे बैंकानी ताळेबंदात दाखवलेच नाहित ती तुम्ही दिली नाहीत ...
तो आकडा आहे... कमीतकमी ८०० ट्रिलियन डॉलर्स
दचकलात?... चालायचेच.
बघुया काय होते ते...

गृहपाठ - वर्ल्ड जीडीपी किती ट्रिलीयन आहे?

सागर's picture

11 Oct 2008 - 9:08 pm | सागर

एक सांगू इच्छितो...
अगोदरच तुम्ही ५०-६०% तोट्यात असाल तर आता मिळताहेत तेवढ्यात विकून घेऊ असा दृष्टीकोन ठेऊन काय उपयोग?

तसे असेल तर माझा तरी सल्ला असेन की शेअर्स विकू नका.

अजून काही पर्याय सुचवू शकतो

एकः
अधिक पुंजी गुंतवण्याची तयारी असेल तर (तोटा सहन करायची तयारी ठेवून)
एव्हरेज करुन घ्या तुमच्या स्टॉक्स चे आणि जेव्हा मार्केट थोडे फार स्थिरावेल तेव्हा किमान तुमची मूळ गुंतवणूक तरी परत मिळेल

दोनः
१० ते १५% तोट्यात असाल आणि होणारा तोटा सहन करण्याची ताकद असेल तर मिळेल ते घ्या

तीनः
परिस्थिती निवळेपर्यंत तुमच्या गुंतवणुकीबद्दल पूर्णपणे विसरुन जायचे. (जेव्हा स्थिती पूर्ववत होईल तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. ) पण वाट पाहणे नशीबी राहीन...

सध्या जगातील सर्वच सरकारे आणि अर्थतज्ञ डोकेफोड करुन यावर तोडगा काढत आहे, त्यांच्या बुद्धीमत्तेवर थोडा तरी विश्वास ठेवावा असे माझे मत आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असे वाटत आहे. तेव्हा मला तरी चिंता नाही.
हे मात्र माझे मत झाले. तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे आणि परिस्थिती प्रमाणे निर्णय घ्यावा हेच योग्य होईल....

मात्र एक सांगू इच्छितो, तुमच्या निर्णयाच्या विपरित घडले तर हळहळ वाटू देऊ नका. उदा: तुम्ही शेअर्स तोट्यात विकले आणि मार्केट सावरले तर उगीच हळहळ वाटून घेऊ नका.... मार्केट हे असेच असते :)

सागर

देवदत्त's picture

11 Oct 2008 - 9:32 pm | देवदत्त

ह्या अशाच सल्ल्यांची गरज आहे. वृत्तवाहिनीवाले (म्हणजे बातमीदार, गुंतवणूक सल्लागार नाही) तर काहीही झाले तरी कत्तल झाली, दंगल झाली अशा एकाच टोन मध्ये बातम्या देत असतात. त्यामुळे आधीच चिंता असलेले लोक आणखी घाबरतात.

पण मी तरी सध्या आशावादी धोरण ठेवून फक्त जागतिक बाजाराची स्थिती काय आहे ते पाहत आहे. कारण त्यावरच बँकेतील ठेवी, आमची नोकरी, पगारवाढ व इतर गोष्टी ह्यांचेही भवितव्य अवलंबून आहे.

वेताळ's picture

12 Oct 2008 - 10:17 am | वेताळ

बहुतेक पुढील आठ्वड्यात मार्केट बाउन्स होण्याची शक्यता आहे.त्यावेळी विका.
वेताळ

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 10:40 am | विसोबा खेचर

सिचुवेशन,
गुतवनुकदार,
लोस,
कापितल,
भविश्य

हे शब्द फार फार आवडले! च्यामारी तुम्ही शुद्धलेखनाची आणि प्रमाणभाषेची पार आयमायच करून टाकली आहे! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2008 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सिचुवेशन,
गुतवनुकदार,
लोस,
कापितल,
भविश्य

आम्हालाही आपले चर्चाप्रस्तावातील शब्द लै आवडले, असेच लिव्हीत राव्हा !!! :)

शुद्धलेखनचिकित्सेची सोय असलेल्या संस्थळावर इतके अशुद्ध लिहिले असते तर आपले सदस्यत्व रद्द झाले असते.
आणि अशुद्ध लिहितात म्हणून काही प्रमाणभाषेवाल्यांनी भिंतीला डोके आपटून घेतले असते. :)

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 11:01 am | विसोबा खेचर

शुद्धलेखनचिकित्सेची सोय असलेल्या संस्थळावर इतके अशुद्ध लिहिले असते तर आपले सदस्यत्व रद्द झाले असते.
आणि अशुद्ध लिहितात म्हणून काही प्रमाणभाषेवाल्यांनी भिंतीला डोके आपटून घेतले असते.

हा हा हा!

फिट आल्यामुळे वेलणकराला रुग्णालयात दाखल करावा लागला असता..! :)

आपला,
(वेलणकरप्रेमी) तात्या.

--

मिपावर शुद्धिचिकित्सक नावाचा बकवासवजा आचरटपणा नाही! :)

जैनाचं कार्ट's picture

12 Oct 2008 - 11:55 am | जैनाचं कार्ट (not verified)

फिट आल्यामुळे वेलणकराला रुग्णालयात दाखल करावा लागला असता..!

=))

अगदी हाच ईचार माझ्या टक्कु-यात पण आला हुता !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग